...नव्या पिढीवरील सर्वांगिण संस्कारांची जाणिव आणि गरज या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सहा वर्षापुर्वी पालघर परिसरात आम्ही सर्वप्रथम "गर्भसंस्कार" केंद्राची स्थापना केली. गर्भसंस्कार केंद्राच्या नावापासुन इतर सर्व अभ्यासक्रमांपर्यंत "नाविन्यता, उद्भोधकता आणि क्रियात्मकता" या तीन गोष्टींवर आम्ही प्रामुख्याने भर दिला. "सृजन" म्हणजे नाविन्यनिर्मिती...आणि ती नाविन्यनिर्मितीही उत्तम व सामाजिक बांधिलकी, भावनात्मकता व रचनात्मकता यांनी परिपुर्ण असावी या उद्देश लक्षात घेऊन आम्ही "सृजन गर्भसंस्कार केंद्र" हे नाव निश्चित केले. वेदोक्त गर्भसंस्कार प्रक्रिया, काही वैशिष्ट्यपुर्ण आध्यात्मिक ध्यानधारणांचे तंत्र, होकारात्मक विचारसरणीची सुत्रे, मंत्र-स्तोत्रे यांचे प्रशिक्षण, आहार नियोजन व व्यायाम अशा अनेक गोष्टी आम्ही "सृजन गर्भसंस्कार केंद्रा"च्या एकुण ४ सत्रांमध्ये शिकवतो. केंद्राला मिळणारा प्रतिसाद हा उत्तम आहे. आणि गर्भसंस्कार केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या मातांचे अनुभवही चांगले आहेत. गर्भसंस्कारांचे प्रशिक्षण घेण्याचा कालावधी हा स्त्रीच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यापासुन सहाव्या महिन्यापर्यंत असतो. गर्भसंस्कार केंद्राविषयी अधिक माहिती, नावनोंदणीसाठी संपर्क साधा....
डॉ.(सौ) श्रेया सचिन परांजपे
"मर्मबंध"बंगला, आदर्शनगर,
"साई सर्व्हिसेस"च्या मागे,
वळण नाका
माहिम-मनोर हायवे, पालघर- ४०१४०४
मोबाईल- ९८२३९४४०९९