Dr Amit Pawarr

Dr Amit Pawarr about life, happiness & health.

स्वराज्य निर्माण करणारे,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचं शौर्य, कार्य, कर्तृत्व...
19/08/2023

स्वराज्य निर्माण करणारे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचं शौर्य, कार्य, कर्तृत्व पराक्रम, विचार आणि राजकीय चातुर्य आजही, ५०० वर्षांनी सुद्धा जनमानसात मनामनात आहे....
स्वराज्याचा विचार आणि मुहूर्तमेढ शहाजीराजे भोसले यांनीच केली, या बापमाणसाने कृतिशील विचार दिला, आणि तो घरामध्ये रुजवला. स्वराज्याची संकल्पना सुरू झाली.. आपल्या स्वराज्यामध्ये सुद्धा बाप माणसाचे म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे अनन्य साधारण महत्व आहेच आणि ते अधोरेखित होते..
प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुटुंबा मध्ये
प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप माणूस असतोच, प्रत्येक यश किंवा उत्तुंग भरारी ही त्यामागे असणाऱ्या बापमाणसामुळेच असते, त्या बापमाणसाला sophisticated असा मेंटोर (mentor ) हा शब्द वापरला जातो,
पण आमच्यासाठी वजनदार शब्द म्हणजे बाप माणूसच..

हाच बापमाणूस,
प्रसिद्ध व्याख्याते आमचे मित्र मा. गणेश शिंदे यांनी अतिशय भावनिक मार्मिक पौराणिक आणि इतिहासातील असंख्य दाखले देऊन.. नगरकरांच्या मनात बाप माणूस अधोरेखित केला.

नगर बदलतंय टीमचे
आणि प्रसिद्ध व्याख्याते माननीय गणेश शिंदे यांचे आभार.....

_Dr. Amit Pawar

17/10/2022

एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही.

मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."

यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?

"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.

मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "

त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"

हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही."

म्हणून "अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"...!

हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक गृहस्थ रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला व...
10/10/2022

हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक गृहस्थ रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?" तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." गृहस्थ म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो" थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील " गृहस्थ घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला. सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता. गृहस्थ माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"

तात्पर्य:
जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. आश्वासन देताना नक्कीच विचार करत जा. 🙏

" One may walk over the highest mountain one step at a time. "
09/10/2022

" One may walk over the highest mountain one step at a time. "

संयम आणि शांतता = यशप्राप्ती हे सूत्र शिवणारा अवलिया Happy Birthday Mahi....
07/07/2022

संयम आणि शांतता = यशप्राप्ती हे सूत्र शिवणारा अवलिया

Happy Birthday Mahi....

किती छान सुट्टीत ला गृहपाठ....पालकांसाठी सुट्टीतला गृहपाठ पालकहो, नमस्कार!! मागच्या अनेक महिन्यात आम्ही तुमच्या मुलांची ...
03/05/2022

किती छान सुट्टीत ला गृहपाठ....
पालकांसाठी सुट्टीतला गृहपाठ
पालकहो, नमस्कार!! मागच्या अनेक महिन्यात आम्ही तुमच्या मुलांची काळजी घेतली. सुट्ट्या लागल्या. आता तुमची मुले पूर्ण वेळ तुमच्यासोबत असतील. सुट्टीचा हा कालावधी फलदायी आणि आनंदमय जाण्यासाठी या काही टिप्स.
1. तुमच्या मुलांसोबत दिवसातील कमीत कमी 2 जेवणे घ्या. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्व पटवून द्या आणि अन्न वाया न जाऊ देण्याची शिकवण द्या.
2. जेवणानंतर मुलांना त्यांचं ताट धुवू द्या. अशी कामे केल्याने मुले कोणतेही काम लहान दर्जाचे नसते हे शिकतात.
3. त्यांना तुम्हाला स्वयंपकात मदत करू द्या. त्यांना सॅलड वगैरे सारख्या सोप्या गोष्टी स्वतः बनवू द्या.
4. मुलांना 5 नवे इंग्रजी शब्द शिकवा आणि ते वहीत लिहून ठेवा.
5. तुमच्या 3 शेजाऱ्यांना मुलांसह भेट द्या आणि त्यांच्याशी छान मैत्री करा.
6. मुलांना आजी आजोबांची भेट घालून द्या आणि त्यांना एकमेकांसोबत मनसोक्त वेळ घालवू द्या. त्यांचे एकत्र फोटो काढा. त्यांचं प्रेम तुमच्या मुलांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.
7. मुलांना तुमच्या कामाच्या ठिकाणी न्या. त्यांना हे कळू द्या की तुम्ही कुटुंब चालवण्यासाठी किती काम करता ते.
8. मुलांना घेऊन सण साजरे करा. त्यांना सणांचं महत्व सांगा.
9. मुलांना घेऊन जत्रा बघा.
10. मुलांना बागकाम शिकवा. लहान लहान कुंड्यांमध्ये स्वयंपक घरात लागणार्‍या भाज्या कशा उगवता येतील ते शिकवा. आपण पेरलेल्या बिया अंकुरित होताना पाहून त्यांना आनंदित होऊ द्या.
11. मुलांना तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगा. तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा. मुलांना त्यांचं मूळ कळू द्या. मोठे झाल्यावर हाच मुलांसाठी खूप मोठा वारसा ठरतो.
12. मुलांना बाहेर खेळू द्या. त्यांचे कपडे खराब होऊ द्या. त्यांना थोडं फार लावुन घेऊ द्या. कधी तरी थोडं फार लागल्याने काही होत नाही. नुसते बसून राहण्यामुळे मुले आळशी बनतात.
13. त्यांना एखादा पाळीव प्राणी पाळू द्या - कुत्रा, मांजर, पक्षी, मासा इत्यादि
14. त्यांना लोकगीते शिकवा.
15. मुलांसाठी रंगीत चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके आणा.
16. त्यांना चित्रे रंगवू द्या. त्यांना कागदाच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवायला शिकवा.
17. मुलांना टीव्ही, मोबाईल, कंप्यूटर सारख्या गोष्टींपासून दूर ठेवा. पुढचं पूर्ण आयुष्य त्यांना ते करता येईल.
18. मुलांना चॉकलेट, बिस्किट, केक, चिप्स, समोसा, कोका कोला अशा गोष्टी खायला देणे टाळा.
19. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. काही वर्षांनी तुमची ही मुले खूप मोठी होतील. त्यांच्या बालपणात सुंदर रंग भरा.
तुमचा वेळ ही तुमच्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाची गिफ्ट आहे.
मुलांच्या सुट्टीसाठी अनेक शुभेच्छा..

Unknown

21/04/2022

फ्लॅट आले घरे गेली
नाती मात्र फाटत गेली,
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
मुले सारी विसरून गेली.

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
सारी 'extremely busy' झाली
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..
हॉटेलिंगची फॅशन आली
घरची जेवणे बंद झाली..

Modular च्या kitchen मध्ये
मुरंबा,लोणची बंद झाली

खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकीही सोडून दिली

फेसबुक, गुगल, सगळे असून
डिप्रेशन ची पाळी आली
प्रत्येकाला शुगर, बीपी ..
हार्ट चीही गोळी आली !

इंटरनेट ने क्रांती केली !
मोबाईल ने जादू केली !
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसं आता मग्न झाली..

माणसं जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली !
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला जवळच कोणी नाही..
दु:ख ऐकायला आपलं कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरलीच नाही.

एकमेकांकडे जात जा
विचारपूस करत रहा
कसला मान आणि अपमान
नाती आपली जपत जा.

🙏🏻

21/04/2022

जबाबदारी शांत असते,
अपेक्षा
' दंगल '
घडवतात.

Address

Ahmednagar
Ahmednagar
414003

Telephone

+919371919999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Amit Pawarr posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Amit Pawarr:

Share