Dr. Sanjay D. Sonawane

Dr. Sanjay D. Sonawane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Sanjay D. Sonawane, Hospital, Ahmednagar.

26/06/2024

https://www.youtube.com/watch?v=onoVfuiM4_8

औचित्य २५ जून चे
+++++++++++++++
आज काल विविध दिन साजरे केले जातायेत जसे योग दिन , प्रेम दिन ,मधुमेह दिवस , एड्स दिवस ... इत्यादी इत्यादी तसे पहिले तर प्रत्येक दिन हा काही न काही खास असतोच नाही का ?
काही दिवस गुलाबी आठवण देऊन जाजत तर काही प्रेमाची साठवण तर काही काळाकुट्ट अंधार प्रत्येकाचे दिन विशेष वेगळेच नाही का ?
कुणाचा दिवस गुलाबी , कुणाचा दिवस , कुणाचा सप्तरंगी आसो .. काळ बदलतो तसा रंग हि बदलतो मंग तो आयुष्याचा असेल कि जगण्याचा आपणास भासेल आसे काही नाही .. खरे तर आपल्या आयुष्यात तर रंगांची व्याप्ती खूप आहे .
तरुणपणी प्रेमात पडल्यावर गुलाबी रंग ,लहानपणी आभ्यास न् केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमठवलेल्या पाच बोटांचा लाल रंग, इच्छित हट्ट वडिलांनी पुरवल्यानंतर फुलणारे चेहऱ्या वरील हास्याचे रंग ,राग आल्यानंतर लाल बुंध होणारा चेहरा, अपमानाने काळानिळा होणारा चेहरा , दुसऱ्याची प्रगती पाहून काळा ठक्कर पडणारा चेहरा , दुखद प्रसंगी डोळ्या समोर येणारा काळा कुट्ट अंधार ...... इत्यादि .
खरंच कित्ती व्याप्ती आहे रंगाची आपल्या भावनिक , वैवाहिक, सामाजिक जीवनामध्ये . रंग आणि आयुष्य यांचे जवळचे नाते आहे. खरंच रंगाशिवाय जीवनात रंगच उरत नाही ना ? रंग शिवाय आयुष्य खरंच बेरंगच होऊन जाते .
खरंच रंगाचा आयुष्याशी कित्ती जवळचा संमध येतो काही उत्सव आसो वा वास्तविक जीवन खरंच जीवनात रंगच नसेल तर जीवन अवघे बेरंगच होऊन जाते सारे आयुष्य नाही का ?
आयुष्याच्या वाटचालीत रंगाचा आणि आपला पावालोगणित समंध येतो जसे की प्रत्येक कृती मध्ये विविध रंगाच्या छट्टा उसळतात काही जाणवतात तर काही अनुभवावे लागते . पण त्याचे आस्तित्व आपल्याला जाणवत राहतेच .
मित्रांनो आपण विचार करत आसल आपण औचित्य २५ जून चा विषय चर्चा करत आहोत आणि मधेच हे रंगांचे रंग काय चाललाय .. हो याच रंगाच्या कमतरतेने होणार्या आजाराशी समन्धित एक आजार एक त्वचा विकार आहे त्याच्या आनुसंधाने आपण बोलणार आहोत ..
मित्रांनो आत्ता आपण मुद्ध्यावारच येउयात ...
जेव्हा आयुष्यातील रंग निघून जातो त्यावेळी मनुष्य मानसिक दुष्ट्या कित्ती कित्ती हतबल होतो नाही का ? आज आपण आशाच एका शाररिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये शरीरात आसनारी रंग द्रव्ये हळू हळू कमी होत जातात आणि त्यामध्ये पांढरेपणा दिसू लागतो ....... आणि खरंच आयुष्य बेरंग होऊ लागते होय , मी पांढरे दाग , कोड , leucoderma , vitiligo विषयीच बोलत आहे .
गोऱ्या रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरादाग दिसू लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो ,कळत न् कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखात आसते पण आपण विचार न करता दुखावत आसतो ,तो पाहिलाच मनाने खचलेला आसतो आशा व्यक्तींना खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज आसते , पण आसे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते ही खेदाची बाब आहे, कृपा करून आसे करू नका ..
मित्रांनो प्रत्येक माणसात काही ना काही व्यंग , कमतरता असतेच काही दिसतात तर काही दिसत नाहीत , त्यामुळे आशा व्यक्तींना जमले तर सहकार्य करा त्यांचे वैगुण्य दाखवुन त्यांना दुखवू नका
औचित्य २५ जून चे :-
मित्रानो आपणास कल्पना असेलच कि २५ जुन ह दिवस प्रख्यात पॉप सिंगर मायकल जाक्सन यांच्या स्मरणार्थ जागतिक पांढरे डाग (कोड ) दिन ( world vitiligo ) म्हणुन साजरा केला जातो .
आपना सर्वांना कल्पना असेलच पण पुन्हा थोडक्यात ज्या मित्रांना याविषयी माहिती नाही त्यांची साठी पुन्हा सांगत आहे .
मायकल जाक्सन हे नाव परिचित नसलेला मनुष्य या जगात सापडणे तरी मुश्कील आहे या प्रख्यात पॉप सिंगर ने तर तरुणाईला तर भुरळच पडलेली आहे. पॉप संगीतात तर तो एक मैलाचा दगड आहे , किंबहुना तो तरुणांच्या गळ्यातील ताईत च आहे . त्याची dengerous ,black and white या गाण्यांनी तर पुर्ण तरुणाई थरारली ..
मायकल जाक्सन याने पॉप संगीतात खूप मोठे योगदान दिले . वरकरणी खुप श्रीमंत , आलिशान घरात आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या, त्याचे अप्रतिम नृत्य आणि गाणे पाहून तर मायकल ला पहिल्या नन्तर कुणालाही हेवा वाटणे साहजिकच होते .. परंतु त्याला खंत होती त्याच्या आजाराची एका छोट्याश्या आजाराने त्याला पोखरून , आस्वस्थ्य करून सोडले होते तसे वैद्यकीय दृश्या तर आजार नव्हताच पण सामाजिक दृष्ट्या खुपच नाराज होता तो ... तो त्रासला गेला होता या .. कोड ,, पांढरे डाग , vitiligo leucoderma या आजाराने या साठी त्याने जगभरात अनेक ठिकाणी खुप खुप उपचार केले पण काही फारसे त्याला यश मिळाले नाही . त्यामुळे मानसिक दृष्ट्या कमजोर होऊन काही मानसोपचार तज्ञांच्या साह्याने औषोधोपचार चालु होते पण सुरुवातीला त्याला फरक वाटला नंतर औषधाची मात्राही वाढत गेली आणि दुदैवाने २५ जुन २००९ रोजी ( Propofol and benzodiazepine ) औषधाची मात्रा जास्त खाण्यात गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला .
त्याच्या स्मरणार्थ जागतिक Vitiligo Research Founadation USA ( जागतिक पांढरे डाग (कोड) संशोधन संस्था ) यांच्या वतीने २५ जुन जागतिक पांढरे डाग (कोड) दिन म्हणुन साजरा केला जातो जग . या दिवशी जगभरात या वर विविध जनजागृतीपरभरातविविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात किंबहुना यावर जन-जागृती ही केली जाते .
मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहेच कि मी गेल्या 17 वर्षांपासून यावर संशोधन करत आहे आहे यावर बऱ्यापैकी यशही संपादन केले आहे . यावर जनजागृती साठी आपण फेसबुक , ब्लॉगच्या माध्यमतून , युट्युबवर ही खुप जनजागृती केली आहे.
इंटरनेटवर MAHARASHTRA LEUCODERMA SOCIAL GROUP या ग्रुप चे उद्घाटन ५-६ वर्षांपुर्विच १५ ऑगस्ट रोजी मा. विजयसिंह होलम सर यांचे हस्ते तर २-३ वर्षांपूर्वी पांढरे डागांवर आधारित संकेत स्थळाचे उद्घाटन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर भाई यांचे हस्ते २५ जून २०१३ रोजी ..
इंटरनेटवर सुंदर मी होणार , पांढरे दाग – एक सामाजिक समस्या , आरोग्यम् धनसंपदा (http://drsanjaypatil.blogspot.in ) यावर माहिती दिलेली आहे . Online Cosultation , Android App आदी आपण रुग्णांसाठी दिले आहे .
पांढरे डाग हा विकार नेमका काय आहे आणि यात नेमके काय होते
पांढरे दाग हा काही संसर्ग जन्य आजार नाही कि वैद्यकीय दृष्ट्या काही आजार नाहीच आगदी थोडक्यात शरीरात झालेल्या गुंगागुंतीच्या प्रक्रीये नंतर त्वचे मध्ये असणाऱ्या रंग देणाऱ्या पेशी कमी झाल्याने किव्हा कुमकुवत झाल्याने त्याचं कार्य मंदावल्याने शरीरातील रंग द्रव्ये रंग कमी होतात आणि त्वचा पांढरी दिसू लागते आणि हाच पांढरे दाग , कोड , vitiligo, leucoderma या नावाने संबोधित केले जाते ..
आशावेळी रुग्नानाची कोंडी होते काय करावे हेच सुचत नही , अनेक उपचार करून ही फरक न झाल्यामुळे आगदी सुशीक्षीत रुग्ण सुद्धा अंधश्रधेला बळी पडतात आणि शेवटी निराशाच वाट्याला येते आणी शेवटी निराशाच पदरी पडते. ...
या सर्व प्रश्नांची उक्कल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत
या आणि आशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कडे आहेत आणि आम्ही ह्या लेखाच्या आधारे तुम्हाला देत आहोत.
हा लेख तुम्हा;ला विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी मायकल जाक्सन च्या स्मरणार्थ २५ जून हा जागतिक पांढरे डाग (कोड ) दिन म्हणुन पाळावयाचे ठरवले आहे . या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती पर योजना कार्यक्रम राबवतात किबहुना त्याचे अविरत कार्यक्रम चालूच आसतात . कोड. पांढरे दाग . leucoderma , vitiigo या नावाने वैद्यकीय शास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररिक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेषतः मुलीमध्ये त्यातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी आडचण आहे ,त्या शिवाय ज्या व्यक्तीना पांढरे दाग कोड या आजाराने त्रास आहेत त्या समाजापासून दूर उपेक्षित राहतात. या लोकांमध्ये एकेल कोंडेपना , शापित आयुष्य व्यतीत करतात .
कोडावर, पांढरे डागांवर कुठलेही औषधी नाही , हा दैवी कोप आहे वगैरे समजुतीही आपणाकडे रूढ आहेत .
पांढरेदाग कोड .Leucoderma , Vitiligo म्हणजे काय , तो कसा होतो ,अनुवांशिक आहे का ? यावर आशा उपचार करायला हवेत इतके गंभीर आजार आहे का ? या आणि अनेक नानाविध प्रश्नानी रुग्न गोंधळला जातो काय करावे आणि काय नाही यातून तो पूर्ण गोंधळला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल , तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणाम कारक इलाज कसे होऊ शकतील. हे आपणास या लेखाच्या मध्यातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न.
इतकच नाही तर याचा हेतू आहे रुग्णांना निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा , तुम्ही पांढरे डागांवर सहज विजय मिळवू शकता , तुम्हाला वाटते त्याहूनही अधिक ते सोप्पे आहे ते ..
टीप -- सकारात्मक विचार करा पण त्याच बरोबर पांढरे दाग हा गंभीर आजार आहे. याची ही जाणीव ठेवा , त्यावर उपचार केलेच नाही किव्हा केलेले उपचार योग्य नसतील तर ते धोक्कादायक ठरू शकतो .
आपले सामाजिक कर्तव्य :-
मित्रानो आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आशी रुग्ने दिसल्यास त्यांना हिणवु नका त्यांना मानसिक आधार द्या त्यांना आपलेसे करा, कराल ना ? मित्रानो एवढे माझ्यासाठी ..... ?? हि रुग्ण एक तर पहिलेच या विकाराने तसेच सामाजिक अवहेलनेने त्रस्त आसतात त्यांना आधार द्या त्यांना आपलेसे करा हा आजार संसर्गजण्य नाही आणि यापासून कुठलीही शाररीक कमजोरी आठवा उणीव येत नाही हि या व्यक्ती हि सर्वसामान्य आयुष जगू शकतात याची जाणीव करून द्या ..
शंका समाधान :-
आक्रोश करूनही काही उपयोग नाही , मांत्रिक तांत्रिक कडे जाऊन ही काही फारसा उपयोग नाही. ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळया आहेत असा समज करून घेऊ नये ,या आजाराने शाररिक , बौद्धिक , मानसिक क्षमतेवर कुठलही परिणाम होत नाही. त्यांची बुद्धीमत्ता ही अन्य व्यक्तीप्रमानेच आसते . भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे, हा गैरसमज आंध्रश्रद्धा रुढी परंपरेतून कायम राहिली आहे.ही बाब दुर्दैवी बाब आहे. आगदी सुशीक्षित माणसेही गंडेदोरे आणी अंगारा-धुपार्याचा मार्ग या कोड निवारण्यासाठी आवलंबन करतात हि खेदाची बाब आहे
कोड विषयी समज गैर समज
++++++++++++++++++++
वैद्यकीय दृष्ट्या कोड हा काही आजार नाही . कारण यापासून कुठलाही त्रास होत नाही किव्हा जीविताला ही काही धोका नाही तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे .पांढरेदाग असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे कित्ती आवघड आसते हे त्या कुटुंबाच ज्ञात आसते .त्या कुटुंबावर कलंक लावला जातो समाजात त्यांची आवहेलना केली जाते ज्या व्यक्तीला कोड आहे, त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे. या न्युनगंडात तों वावरत आसतो . किबहुना तो समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आसतो .त्याचा आत्मविश्वास पूर्णपने धसाळलेला आसतो.हे सर्व सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना मानवंदना देतो अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. मायकल जाक्सन , भारताचा वीख्यात क्रिकेट पट्टू एकनाथ सोनकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला .
भारतीय समाजात अनेक गैरसमजुती आहेत . समाजातील काही भोंदू बाबा , देवालाशी, मंत्रीक तांत्रिक कोड आसलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना याबाबद वाट्टेल ते सांगतात , कुलदेवतेचा किव्हा अन्यदेवाचा कोप ,त्यामुळे हे संकट कोसळल्याची भीती घालतात त्यामुळे अनेक धार्मिक विधी , उपवास , व्रत वैकल्ये , मंत्र तंत्र आणि धार्मिक विधी उपचारामुळे कोड बरा होईल असा सल्लाही देतात त्यासाठी प्रचंड पैसा ही उकतात . काही झाडपाल्यावाले वैदू , तुमडी , जळवा आदी अघोरी उपचार ही करतात तसेच काही झाड पाल्याची औषधी ही देतात याचाही काहीही उपयोग होत नाही . कोडवर योग्य वैद्यकीय उपचार करून घेणेच योग्य आहे , ग्रामीण भागात तर कोडच्या , पांढरे डागाच्या बाबतीत खुपच गैरसमज आहेत. यासाठी सामाजिक प्रबोधन फार महत्वाचे व गरजेचे आहे , प्रबोधन करून त्यांना सामान्य जन-प्रवाहात आणणे गरजेचे आहे .कोड बाधित व्यक्तींना आपल्याला काहीतरी असाध्य आजार झाला आहे असा मनोगंड आसतो, त्याचे त्यांना योग्य शास्त्रीय मार्गदर्शन व कारण समजावून सांगून मनोगंड दूर करणे करणे इष्ट आहे .
मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा , कोडचा त्रास खूप जाणवतो आशा मुलींचे विवाह जमने खुपच आवघड जाते, काही वेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचारही समाजात केला जातो, आशा मुलींचे आयुष्यही बरबाद झाल्याची उदाहरणे समाजात आहेत . बऱ्याच वेळा उतार वयात ही लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेते की हा असाध्य आजार असाध्य नाही .
मंगळी मुलगी तशीच कोडची मुलगी कुटुंबाला शाप ? स्वीकारतात हे मी पाहिले आहे, हे योग्य नाही कोड असणाऱ्या व्यक्तींनी समाजात अनेक उतुंग यशाची शिखरे गाठली आहेत .हे लक्षात घेऊन आपण सर्वजन मिळून या कोडची कीड दूर करू या ....
त्वचेवर बऱ्याच प्रकारचे पांढरट किव्हा पांढरे दाग येतात सर्व पांढरे दाग म्हणजे कोड अथवा पांढरेदाग आसू शकत नाहीत बऱ्याच वेळा अनेक आजारामध्ये जसे की पितीरीयासीस अल्बा ( pitiriasis Alba ) पोस्ट इंफ्लामेटरी (post inflamatory )
हय्पोपिग्मेंतातैओन ( hypopigmentation ) , ईदिओ पथिक हायपो पिग्मेंतातीओन ( Idiopathic Hypopigmentation ) भाजल्या नंतर जन्मजात , नँवस , पांढरे दाग यात समाविष्ट होतात . पांढरे दाग आहेत की बाकी काही याचे निदान तज्ञ डॉक्टर कडूनच करून घेणे योग्य आहे .
कोड म्हणजे काय ?
===============
आगदी सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर शरीरात असणारा रंग
कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते,यालाच पांढरे दाग म्हणतात
त्वचे मध्ये असणारया मेलानीन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास काळा , सावळा. निम गोरा , गोरा रंग येतो . तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्याक्षम होतात, व्यवस्तीत कार्य करत नाहीत, आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे दाग दिसू लागतात .
पांढऱ्या डागांचे विशेषतः प्रमाणानुसार चार प्रकार पडतात
======================================
१) लोकालईझड – यामध्ये एकाच ठिकाणी दाग येतात आणि स्थिर असतात
२) सेग मेंटल -- एका पट्ट्या मध्येच येतात .. दोन्ही बाजुं सारखेच असतात
३) अक्रोफेसिअल – या मध्ये शारीरच्या टोकाच्या भागाकडे हे दाग असतात म्हणजे हाताच्या बोटांकडे, ओठांवर , तळहात , टाळ पाय , आशा ठिकाणी आसतात
४) जनरल -- पूर्ण शरीरावर आसतात ..
कोडचे कारण
+++++++++
एखाद्याला कोड का होतो हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे . कोडमध्ये जंतू विषाणू नसतात. कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो ,हा काही दैव दैवतांचा शाप नाही की भूतबाधा ही नाही...
याला शास्त्रीय कारण एवढेच सांगता येईल की मेलानीन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात एँनटी मेलानोसाईट प्रतीद्रव्ये तयार होतात आणि ही प्रती द्रव्ये मेलानीन निष्क्रीय करतात व मेलानीन तयार होत नाही ही प्रतीद्रव्ये का तयार होतात हा संशोधनाचा विषय आहे . आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालू आहे
आपल्याच शरीराती काही पेशी आपलीच ओळख विसरतात आणि अनोळखी पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया चालू होते आनि तेथूनच हा आजार बळावतो ...
गेल्या १७ वर्षांपासून मी या विषयावर आभ्यास करत आहे आणि बयाच श्या गोष्टी अनुभवातून समोर येत आहेत .
कोडावरील उपचाराचे यश अपयश
+++++++++++++++++++++++++
१) एकाच घरात दोन पेक्षा जास्त व्याकीनांना ही बाधा आसेल तर वेळ लागतो
२) बऱ्याच वर्षांपासून जुनाट झालेल्या आजाराला वेळ आगतो
३) पांढरे दगनावर काले केस असल्यास लवकर फरक पडतो
४) अंगावर जास्त प्रमाणात असल्यास वेळ लागतो
५) वयाच्या ४० वर्षांनतर उशिरा फरक पडतो
६) उपचारासाठी काही महिने वर्ष हा कालावधी आतो त्यामुळे रुग्ण बरोबरच डॉक्टरांनी ही संयम पाळणे हे गरजेचे आसते ...
आमचे सामाजिक उपक्रम आपणही यात सहभागी होऊ शकता :-
१) आनेक वृत्तपत्रातून तून याविषयी लिखाण आणि प्रबोधन
२) आकाशवाणी वरून हल्लो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्याक्रमात सहभाग
३) फेसबुकवर Maharashtra Leucoderma Social Group
४) फेसबुकवर सुंदर मी होणार आणि पांढरे डाग सामाजिक समस्या यावर पेजेस www.facebook.com/leucoderma
५) 2003 यावर आधारित सुंदर मी होणार विसिडी प्रकाशित
६) यावर आधारित blog www.drsanjaypatil.blogspot.in आणि www.cureleucodermablogspot.in
७) online consultattion
८) सुंदर मी होणार android app
९) इंटरनेट वर या विषयी मोफत मार्गदर्शन ..
या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून विविध राज्यस्तरीय पुरस्कार
१) आदर्श् बहुजन मित्र
२) समाजभूषण
३) समाज प्रबोधन २००८ मा. कलेक्टर शेखर गायकवाड यांचे उपस्थितीत
४) कार्यगौरव पुरस्कार .. मा. गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांचे हस्ते
५) संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार /... मा. वसंत राव पुरके यांचे हस्ते
६) पद्मभूषण डॉ.रजनीकांत आरोळे स्मुर्ती गौरव पुरस्कार .... मा. राम शिंध्ये यांचे हस्ते
७) समाज रत्न पुरस्कार .. आकोला येथे मा. आ. संजय गवांदे , मा. गजल नवाज भीमराज पांचाळ व इतिहास तज्ञ प्रा. संजय सोनवणी यांचे हस्ते ..

World Vitiligo Day - June 25thVitiligoWorld🌎Vitiligo MaharashtraVitiligo Viral Marathi - व्हायरल मराठी
Every'one

Address

Ahmednagar
414607

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

9822287376

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sanjay D. Sonawane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Sanjay D. Sonawane:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category