
14/09/2025
मुलगी...
पहिलं अपत्य काहीही झाल तरी आई-वडिलांना त्याचा आनंद असतो..
पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं होतं. माझ्या आयुष्यात आई होण्याची चाहूल लागतच आई होण्याचा आनंदासोबत एक नवीन वादळ घेऊन आलं...
नवऱ्याने मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. मुलगा झाला तर तुला माहेर वरून आणेल. मुलगी झाली तर तुला आणणार नाही. दवाखान्यात बघायला येणार नाही. असं वारंवार बोलून तो मला मानसिक त्रास देऊ लागला...
तू स्वतः एक डॉक्टर आहेस मग तू असं कसं काय बोलू शकतोस असे मी त्याला वारंवार बोलत होते. पण त्याची मानसिकता काहीतरी वेगळीच होती.
पण ह्या विचारांनी मला प्रचंड त्रास व्हायला लागला. मनात भीती निर्माण झाली.
मुलगी झाली तर काय होईल? नवरा वागवेल की नाही.. अशा दळपणाखाली माझे नऊ महिने गेले.
नवऱ्याची ही गोष्ट कोणाला तरी सांगायला पाहिजे म्हणून मी त्याच्या आते भावांना जे स्वतः दोन्ही डॉक्टर होते त्यांच्या कानावर घातली. त्यांना जेव्हा नवऱ्याचे विचार कळाले त्यांनी डोक्याला हातच लावला. मुलगा किंवा मुलगी हो ना आपल्या हातात असतं का हे त्याला डॉक्टर म्हणून कळत नाही का? असा प्रश्न त्यांनी मला केला. तू टेन्शन घेऊ नकोस तो काय त्याच्या बापाला ही बाळ बघायला यावं लागेल असं त्यांनी मला शाश्वती दिली. पण मनात खूप धाकधूक होतीच..
मुलगी झाली तर नवरा बघायला येणार नाही. मला घरी घेऊन जाणार नाही... एवढी सगळी रिस्क घेऊन नऊ महिने पार पाडले आणि एका गोंडस मुलीला जन्म दिला....
आता प्रश्न होता मुलीला बघायला तिचा बाप येतो की नाही? तिला तिच्या घरी घेऊन जातो की नाही?
पण जगाच्या लाजी खातिर आणि नातेवाईकांनी खडसावल्यामुळे सासरचे मुलगी बघायला आले. पण बापाने जवळ येऊन मुलीला साध हातातही घेतलं नाही...
आपल्या समाजात शिक्षित वर्गातही मुलगा मुलगी हा भेद अजूनही आहे. मुलगी झाली, घरात लक्ष्मी आली या आनंदात गावभर पेढे वाटणारे पण आहेत आणि मुलगा झाला नाही म्हणून त्या स्त्रीला मानसिक त्रास देणारे ही लोक आपल्या समाजात आहे....
हीच ती माझी मुलगी जी तिच्या बापाला नकोशी होती. पण तिच्या आईची ती ढाल आहे, तिचा श्वास आहे, तिचं आयुष्य आहे....love you baby🥰