13/11/2024
*मोरगाव/अ.येथे डॉ भारत लाडे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार*
मौजा मोरगाव येथे खास मंडई निमित्य दिनांक *12/11/2024* रोज मंगळवारला जय दुर्गा नाट्यकला मंडळ मोरगाव यांच्या सौजन्याने नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत संगीत- "अंधारलेल्या वाटा " या नाटकाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी सत्कारमुर्ती म्हणून मा. श्री डॉ भारत लाडे सामाजिक कार्यकर्ता यांनी 063अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात दहा वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे समाजशील उपक्रम राबवून ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे आरोग्य विषयक काळजी घेऊन मोफत सेवा उपलब्ध करून देणारे, गावागावात आरोग्य सेवेचा लाभ गरजूंना होण्यासाठी नेत्र आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर,ग्रामीण भागातील गरीब होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार, अनाथ मुलांना आर्थिक मदत, दिव्यांगाणा मदत असे कार्य केले आहेत. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत मोरगाव येथील जय दुर्गा नाट्य कला मंडळ मोरगावच्या वतीने डॉ भारत लाडे यांचा सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा. सौ कविताताई कापगते जि. प. सदस्य गोंदिया,सविता कोडापे सभापती पं. स.श्रीदानजी पालिवाल ,घनशाम धामट ता काँग्रेस अध्यक्ष, गीताताई नेवारे सरपंचा ग्रा. मोर.,मीनाताई शहारे, गजानन डोंगरवार सा. कार्य. ललित बाळबुधे,हितेश लाडे,रमेश झोडे पो. पा. रमेश लाडे,नंदू गहाणे, नरेश खंडाईत, लेकराम परशुरामकर,शिवराम लोदी,विद्या शहारे, मंदा शहारे, सुरेंद्र भैसारे सर, ठवकर सर, गहाणे सर , ,मुन्ना शहारे,मुरारी उईके,देवानंद शहारे,तानाजी लोदी, सुरेश लोदि, मनोहर पर्वते, मनोज घुले, कैलास चाचेरे,पतीराम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते..