16/12/2025
आर्वी :-
श्री संत लहानूजी महाराज संस्थान श्री क्षेत्र टाकरखेडा, ता. आर्वी जि. वर्धा व रेडक्रॉस सोसायटी, आर्वी यांच्या विद्यमाने भव्य मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रीया शिबीर रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ सकाळी १० ते २ पर्यंत सांस्कृतिक हॉल, श्री संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेडा येथे संपन्न झाले
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत लहानुजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचेअध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वीचे संस्थापक डॉअरुण पावडे, कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम चे डॉ अजय शुक्ला , इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वी चे उपाध्यक्ष प्रा राजाभाऊ तेलरांधे, सचिव डॉ अभिलाष धरमठोक, डॉ प्रमोद जाणे, नंदकिशोर दिक्षित, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
आर्वी,टाकरखेड़ा,नांदपुर, लाडेगाव, परतोडा ,शिरपूर, जळगाव, धनोडी ,एकलारा,टोना ,वर्धमनेरी ,देऊरवाडा इत्यादी परिसरातील जवळपास 222 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम चे डॉ अजय शुक्ला, डॉ अक्षय ठाकूर,डॉ ऐश्वर्या शिंदे डॉ आकाश इंगोले, डॉ मुस्कान सोमानी, डॉ सचिन ताकसांडे राजू लोंडे या चमूने तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिये करीता 40 रुग्ण कस्तुरबा हेल्थ रुग्णालय सेवाग्राम येथे पाठविण्यात आले
याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य अनिल भट,नवल किशोर अग्रवाल , प्रा रमेश जवंजाळ,डॉ शामसुंदर भूतडा,डॉ अनिता भूतडा,डॉ उमेश गुल्हाने,प्रवीण देशमुख, ,प्रमोद पाटणी , प्रा अभय दर्भे, सुशील सिंह ठाकूर, प्रेम सिंग राठोड, श्रीकांत कलोडे, लक्ष्मण आगरकर,उदय बाजपेयी, सोमेश्वर साठोणे, इत्यादी उपस्थित होते
श्री संत लहानुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे,संचालक डॉ सतीश ठाकरे अनिल अनासाने, पदाधिकारी व कर्मचारी तसेच राहुल जामखुटे, मंगेश इंगोले ,ऋषिकेश लोखंडे, प्रज्वल ढेरे, अक्षय नेमाडे ,ज्ञानदेव नेमाडे ,समीर बोरकर,नितीन हरणे,आशिष मानकर, शिवाजी देशमुख व लहानु अभ्यासकांच्या विद्यार्थ्यां व कला, वाणिज्य व विज्ञान व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले