Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत

  • Home
  • India
  • Aurangabad
  • Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत

Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत 🦀Cancer & Heart ❤️‍🩹Disease free भारत🇳🇪
🏥रू१ रूपया दवाखाना सेवा
🏨मोफत शस्त्रक्रिया-8286112112

मेहनत आणि चिकाटी = यश 🚩जालना जिल्ह्यातील मौजे जळगाव सपकाळ ता.भोकरदन येथील श्री.भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आय...
08/03/2026

मेहनत आणि चिकाटी = यश 🚩

जालना जिल्ह्यातील मौजे जळगाव सपकाळ ता.भोकरदन येथील श्री.भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत 812 वी रँक मिळवत या तरुणाने मिळवलेलं यश नेत्रदीपक आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

वडील सालगडी म्हणून काम करत, तसेच घरची अवघी दोन एकर शेती सांभाळत होते; तर आईही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती. आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि शिक्षणाविषयी पुरेसे मार्गदर्शन नसतानाही भिकन यांनी अथक परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.

भिकन, तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा!!! आपल्या हातून समाजाची सेवा घडो, हीच सदिच्छा..!

| #गौरव_महाराष्ट्राचा |

🏠 *नोकरी  करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह योजना*👩‍💼 सुरक्षित व सोयीस्कर निवासाची सुविधा🏢 उपलब्ध सुविधा: ✔️ सुरक्...
28/02/2026

🏠 *नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह योजना*

👩‍💼 सुरक्षित व सोयीस्कर निवासाची सुविधा

🏢 उपलब्ध सुविधा:
✔️ सुरक्षित निवास
✔️ कॉट, अंथरूण-पांघरूण
✔️ वैद्यकीय सुविधा
✔️ नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष
✔️वाहन पार्किंग
✔️ ग्रंथालय व इनडोअर खेळ साहित्य

✅ पात्रता:
• अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त/भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग किंवा अनाथ घटकातील महिला
• महाराष्ट्राची रहिवासी
• नोकरीचे प्रमाणपत्र आवश्यक
• जवळचे नातेवाईक संबंधित महानगरपालिका क्षेत्रात नसावेत
• मासिक उत्पन्न रु ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

📌 अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

आरोग्य सुविधा दरवाढ GR ला डॉक्टर्स संघटनेचा विरोध आणि FIRST AID DOCTORS ASSOCIATION टीम सोबत सविस्तर चर्चा ................
20/02/2026

आरोग्य सुविधा दरवाढ GR ला डॉक्टर्स संघटनेचा विरोध आणि FIRST AID DOCTORS ASSOCIATION टीम सोबत सविस्तर चर्चा .............नंतर शासनाचा निर्णय मागे 📍डॉ. रोहित बोरकर ह्यांचा “रुग्ण हक्क प्रथम ”ला दुजारा 📍

https://youtu.be/nppNii7wjz8?si=A7YB2jInM6eqETg_





PolyClinic

“या नव्या निर्णयामुळे आरोग्य सेवेतील खर्च वाढून सर्वसामान्य रुग्णांवर आर्थिक ताण येणार असल्याची शक्यता आहे. गो.....

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छ .संभाजीनगर ला येतो...!!एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेश...
08/02/2026

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छ .संभाजीनगर ला येतो...!!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.

मात्र छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..

सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये ( औरंगाबादेत) होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती.

अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून छ. संभाजी नगरच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण छ .संभाजी नगरात झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते छ .संभाजी नगरात एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने छ .संभाजी नगर सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती.रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही,

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच छ.संभाजी नगरकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं.ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो.काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो.
(लेखक : अज्ञात)


ग्रामीण भागात सक्षम आरोग्य सेवा न भेटण्याचे कारण म्हणजे सरकार वेतन 📍
20/11/2025

ग्रामीण भागात सक्षम आरोग्य सेवा न भेटण्याचे कारण म्हणजे सरकार वेतन 📍


“रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवेला “LOKMAT EXCELLENCE IN HEALTHCARE AWARD 2025” सर्व रुग्णसेवा दिलेल्या रुग्णांना समर्पित “📍📍📍...
02/11/2025

“रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवेला “LOKMAT EXCELLENCE IN HEALTHCARE AWARD 2025” सर्व रुग्णसेवा दिलेल्या रुग्णांना समर्पित “📍📍📍

📍आपलाच,
डॉ रोहित बोरकर
संचालक -एक रुपयात दवाखाना सेवा

सर्व पत्रकार बांधवांचे आभार 👏

02/11/2025

आरोग्य आणि सामाजिक कार्याचा जीवनतील 98 वा पुरस्कार “LOMAT EXCELLENCE IN HEALTH CARE AWARDS 2025 ”
“🔰

पुरस्कार राज्याचे आरोग्य मंत्री
मा प्रकाशजी आबिटकर आणि
रुबी हॉल क्लिनिक सर्वेसर्वा गुरुवर्य डॉ पुरवेज ग्रांट सर , लोकमत संपादक संजय आवटे, बाविस्कर डॉ सिद्धिविनायक ग्रुप सिद्धी जैन हस्ते स्विकारताना लाखमोलाची ऊर्जा देणारा ठरला ✌️👏

“एका क्षणात दिवाळी आनंदाचा चा अंत “📍आज अहिल्यानगर -छ संभाजीनगर प्रवास दरम्यान ही माय मावली रडत असताना दिसली तर मी कार बा...
23/10/2025

“एका क्षणात दिवाळी आनंदाचा चा अंत “📍

आज अहिल्यानगर -छ संभाजीनगर प्रवास दरम्यान ही माय मावली रडत असताना दिसली तर मी कार बाजूला घेत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर मुले मुंबई आहेत. दिवाळी ते आलेच नाहीत आणि येत पण नाहीत...ह्यामुळे मन सुन्न झाल. .असे -कसे वागू शकते _जन्म दात्याना आजची तरुण पिढी 📍तसेच ह्या माय मावलीचे मानसिक ताण तणावाने आरोग्य व्यवस्थित वाटत नव्हते.
मी धीर देत त्यांचं मन हलके केले तसेच दिवाळी फराळ,औषधी आणि कपड्यांसाठी छोटीशी आर्थिक मदत केली.भविष्यात गरज भासल्यास त्यांना विपश्याना केंद्रात उपचार आणि फॉउंडेशन वतीने मदत नक्की होणार.

टिप -असे बरेच गरजू अजु बाजूला आपल्या असतात तर त्यांना शक्य होईल मदत नक्की करा 📍

Ministry of Social Justice and Empowerment, Government of India




Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत
Omkar Deshmukh
मराठवाडा जनविकास संघटना हिंगोली
Dr Jeevan Rajput

युवा सरपंच मंगेश साबळे काळ सिल्लोड भेट घेतली.शेतकरी हितासाठी ह्या लढ्याला पाठिंबा जाहीर करत डॉक्टर ह्या नात्याने काळजी घ...
07/10/2025

युवा सरपंच मंगेश साबळे काळ सिल्लोड भेट घेतली.शेतकरी हितासाठी ह्या लढ्याला पाठिंबा जाहीर करत डॉक्टर ह्या नात्याने काळजी घेण्यास सांगितले तसेच भविष्यात सर्व पदवीधर संघटना सोबत आहे. सरकारने लवकरात लवकर मागण्याचा विचार करून निर्णय द्यावा.

Ministry of Social Justice and Empowerment, Government of IndiaAhilya Healthhelpline AurangabadCMOMaharashtraMangesh Sabale

आरक्षणाचा बाजार वर्षानु वर्षे सुरूच राहणार. ...पदवीधरांनो छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात मोठा नौकरी महोत्सव. ..करिअर बघा ...
04/10/2025

आरक्षणाचा बाजार वर्षानु वर्षे सुरूच राहणार. ...पदवीधरांनो छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात मोठा नौकरी महोत्सव. ..करिअर बघा आपले आजच भेट देऊन रोजगार मिळवा 🚩🚩🚩

Ministry of Social Justice and Empowerment, Government of India

पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी.....SHARE👍पुणे शहरातील मराठवाडा भागातील विद्यार्थी आणि पदवीधरांना मोफत त्रिमाही दवाखाना सेवा...
03/10/2025

पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी.....

SHARE👍

पुणे शहरातील मराठवाडा भागातील विद्यार्थी आणि पदवीधरांना मोफत त्रिमाही दवाखाना सेवा 📍

Ahilya Healthhelpline Aurangabad
Ministry of Social Justice and Empowerment, Government of India

My Backbone POWER in सामाजिक कार्य डॉ जीवन राजूपुत सर 🚩🚩🚩छत्रपती आरोग्य हेल्पलाईन महाराष्ट्र विशेष सहकार्य तसेच 15 आगस्ट...
15/08/2025

My Backbone POWER in सामाजिक कार्य डॉ जीवन राजूपुत सर 🚩🚩🚩छत्रपती आरोग्य हेल्पलाईन महाराष्ट्र विशेष सहकार्य तसेच 15 आगस्ट पासून नागरिकांच्या सेवेत 🚩

"मराठवाड्यातील नागरिकांसाठी छत्रपती आरोग्य हेल्पलाईन एक खिडकी योजना नवसंजीवनी ठरणार-डॉ रोहित बोरकर

छ संभाजीनगर (वृत्त) -गरजू रुग्ण आणि जनसामान्य नागरिकांसाठी सत्यशिव ग्लोबल फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ रोहित बोरकर आणि सामाजिक डॉक्टर्स टीम चे कार्य महाराष्ट्र राज्यात चौफेर सुरु आहे.सत्यशिव ग्लोबल फॉउंडेशन आणि जे जे प्लस फौंडेशन संयुक्त विधमाने मराठवाड्यातील नागरिकांसाठी प्रथमच एक खिडकी आरोग्य योजना माहिती पोर्टल "छत्रपती आरोग्य हेल्पलाईन"कार्यालयाचे चे उदघाटन आमदार सौ श्वेता ताई महाले, आ. संजय जी केणेकर,प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ जीवन राजपूत हस्ते उत्सहात झाले.प्रसंगी जय उपासे सर, दीपक ढाकणे,योगेश वाणी, गजानन पालवे पाहूणे उपस्थित होते.

मराठवाड्यातील छत्रपती आरोग्य हेल्पलाईन '15 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केली करत शिबिरामध्ये बीपी, शुगर, इसीजी आणि मोफत औषधे लाभ जवळपास 200 रुग्णाना घेतला अशी माहिती आयोजक डॉ रोहित बोरकर ह्यांनी दिली आहे.
सत्यशिव ग्लोबल फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ रोहित बोरकर आणि सामाजिक डॉक्टर्स टीम चे कार्य महाराष्ट्र राज्यात चौफेर सुरु आहे. आरोग्य क्षेत्रात CSR च्या माध्यमातून प्रामाणिकपणे अल्प दरात उत्तम आरोग्य सेवा केवळ ₹1 किंवा ₹10 फीस बाह्यरुग्ण ओपीडी दवाखाना 12 शाखा निर्मिती करणारे एकमेव फॉउंडेशन होय तसेच मोफत आरोग्य शिबीर, मोफत डॉक्टर्स सल्ला, दिव्यांग शिबीर, मोफत रुग्णवाहीका,जेष्ठ नागरिकांना मोफत स्मार्ट हेल्थ कार्ड,वैद्यकीय आर्थिक मदत मार्गदर्शन ई. फॉउंडेशन मार्फत गेली 6 वर्षे जनसामान्य करिता कार्य करते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सत्यशिव ग्लोबल फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ रोहित बोरकर,डॉ विधिता चोरमले,डॉ गोविंद सारडा,सौ नीता राठोड, विजय, योगेश, राजू आदिनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

चौकट क्र. 1
"ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना डॉ रोहित बोरकर संकल्पित छत्रपती आरोग्य हेल्प लाईन नवसंजीवनी ठरणार"
-आ. श्वेता ताई महाले

“जे जे प्लस फॉउंडेशन आणि सत्यशिव ग्लोबल फॉउंडेशन चा” एक खिडकी आरोग्य योजना “हा अनोखा उपक्रम मराठवाडा नागरिकांना उपयुक्त shat:प्रतिशत ठरेल. अल्प दरात उत्तम आरोग्य सेवा हेच आमचं वैद्यकीय सूत्र आहे. - डॉ जीवन राजपूत

चौकट क्र-3
"डॉ रोहित बोरकर ह्यांचे एक रुपयात दवाखाना आणि आरोग्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. छत्रपती आरोग्य हेल्पलाईन पोर्टल ला मराठवाड्यातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी"-आ. संजय जी केणेकर

📍ठिकाण -ऑफिस क्र. 1/2,गुरु सर्जिकल मागे, कामगार ऑफिस जवळ, भाग्यनगर, बाबा पेट्रोल पंप, छ.संभाजीनगर 431001

हेल्पलाईन क्र. 8698000108/9145112108

Dr Jeevan Rajput



Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Rohit Shivram Borkar - आपला हक्काचा आरोग्यदूत:

Share