27/12/2024
feedback for Tiger eye bracelet t🙏🙏🙏
नमस्कार मी आनंद अंबेकर , जवळपास दोन वर्ष आधीची माझी परिस्थिती अशी होती की, सर्वच बाजूचे दरवाजे बंद झालेत असे वाटत होते. कामात यश नाही की घरात समाधान नाही, मानसिक ताण सहन होत नव्हता. स्वतःवरचा विश्वास जवळपास संपलेला, कसेतरी दिवस पुढे ढकलत होतो. त्या काळात एकेदिवशी माझे काका व काकु मला किरण मावशीकडे घेऊन आले, किरण मावशी सोबत सर्वकाही मोकळेपणाने बोललो, या आधीही मी बऱ्याच ठिकाणी हात दाखवले, पत्रिका दाखवली होती. बऱ्याच अंगठ्या घालूनझाल्या होत्या आणि त्याचा काही परिणाम मला जाणवला नाही त्यामुळे या सर्वच गोष्टींवरून विश्वास ही कमी झाला होता म्हणूनच मावशींनी मला जेव्हा मला टायगर आय ब्रेसलेट दिलं तेव्हा मला असं वाटलं होतं की यांनी पण घातलं हे माझ्या गळ्यात म्हणून मी ते घेण्यासाठी टाळाटाळ करू लागलो पण माझ्या काका व काकूंनी ते मला घेऊन दिले आणि घालण्यास सांगितले. जवळपास 1 महिना मला काहीच जाणवलं नाही पण त्या नंतर ज्या घटना घडू लागल्या आणि ज्या वेगाने घडू लागल्या त्यावर मला माझ्यासोबत काय घडतंय आणि कसं घडतंय हे ही कळलं नाही, मी 1 आठवडा पुण्याला जाऊन आलो आणि काहीच दिवसात मला एका चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळाली. आज दीड वर्ष झाले याला त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची राहिली होती ती म्हणजे किरण मावशीचे आभार मानायचे राहून गेले, किरण मावशीने मला ब्रेसलेट दिले आणि सोडून दिले असे नाही तर त्या अधून मधून माझ्याशी बोलत होत्या आणि त्या एकदा काही कामाने पुण्याला आले असताना मला आवर्जून भेटून गेल्या. माझ्या आयुष्याला एक योग्य मार्गावर आणण्यासाठी मी अगदी मनापासून किरण मावशी व माझे काका काकू यांचा खूप आभारी आहे आणि नेहमीच असेन. Thank You so much....👍🙂 मावशी मी या पुढेही तुम्हाला असाच त्रास देत राहीन... 😀😃❤️ Take care....