29/10/2023
World Stroke Day 29th October 2023
🧠 *स्ट्रोक/अर्धांगवायू / पॅरालिसीस* -
*"गोल्डन अवर व अत्याधुनिक उपचार पद्धती"* --- --🧠
*डॉ. जयपाल रामधन घुनावत.* ⚡️
*MBBS, DNB, DM-NEURO, M.N.A.M.S*
*(मेंदु व मणका व पॅरालिसीस विकारतज्ञ)*
: भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. याची *लक्षणे भिन्न असतात आणि अचानक (१० मिनीट पेक्षा कमी वेळात) दिसतात* स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
*स्ट्रोक* म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा. याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं (ज्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्याला ‘हार्ट अटॅक म्हटलं जातं). स्ट्रोक हे जगातील मृत्यूचे *दुसऱ्या क्रमांकाचे* कारण आणि अपंगत्वाचे चौथ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह ,हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता, होमोसिस्टीन या घटकाचं जास्त प्रमाण, हृदयाच्या झडपांचे आजार ही तरुण वयातील स्ट्रोकची कारणं असू शकतात.
*स्ट्रोकचे प्रकार :*
सर्वसाधारणपणे स्ट्रोक दोन प्रकारचे असू शकतात.
१) इश्केमिक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने (रक्तवाहीनीत गाठ (थ्रोम्बस) तयार होऊन रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होतो).
२) हेमरेजिक म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने आलेला स्ट्रोक सर्वसाधारणपणे उच्च रक्तदान हे अशा स्ट्रोकचं महत्त्वाचं कारण असतं.
*याची लक्षणे काय आहेत?*
याची चिन्हे आणि लक्षणे भिन्न असतात आणि अचानक दिसतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असतात. त्यांना एफ.ए.एस.टी. म्हणून ओळखले जाते:
*चेहरा(फेस)* - डोळा आणि तोंड एका बाजूला वाकणे आणि हसण्यास असक्षम होणे.
*हात(आर्म)-* दुर्बलता किंवा सौम्यतेमुळे दोन्ही हात उचलण्यात अक्षमता.
*बोलणे(स्पीच)-* अस्पष्ट उच्चारण किंवा बोलण्याची अक्षमता असू शकते.
*वेळ(टाइम)-* गोल्डन अवर ब्रेन स्ट्रोक मध्ये सुरवातीचे ५ ते ६ तास हि सुवर्ण वेळ मनाली जाते या वेळेत जर रुग्ण मेंदू विकार तज्ञा कडे पोहोंचला तर अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केली जाते .
*तोल* अचानक तोल जाणे किंवा दिसण्यास अंधार येणे
*ब्रेन स्ट्रोक साठी केली जाणारी तपासणी*
आपल्या लक्षणांवर आधारित, वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि शारीरिक तपासणी करून डॉक्टर निदान करतात. चेहरा, हात आणि पाय यांची संवेदना, धूसर दृष्टी; गोंधळ आणि बोलण्यात अडचण याची तपासणी केली जाते. रक्त तपासणी, पल्स रेट आणि रक्तदाब तपासणे, सीटी स्कॅन, सीटी अँजियोग्राम, एमआरआय स्कॅन, गिळण्याची चाचणी, कॅरोटीड अल्ट्रासाऊंड आणि इलेक्ट्रोकर्डियोग्राम केले जाते.
*ब्रेन स्ट्रोकवरील उपचार:*
अलीकडे इश्केमिक स्ट्रोकच्या उपचारात बरीच क्रांती झाली आहे. जर स्ट्रोक झाल्याच्या साडे चार तासाच्या आत आपण रुग्णालयात पोहोचला आणि सीटी स्कॅनमध्ये रक्तस्त्राव नसेल, तर इंट्राव्हेनस टीपीए (टिश्यू प्लास्मिनोजेन अँक्टिवेटर) नावाचं रक्तातील गाठ वितळवणारं औषध दिल्यास बराच फायदा होऊ शकतो. अर्थात हे औषध देण्यापूर्वी डॉक्टर काही गोष्टींची खात्री करुन घेतात. कधी-कधी या औषधाने मेंदूत रक्तस्त्राव होणं यासारखी गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते. कधी कधी सहा ते बारा तासाच्या दरम्यान डीएसए (डीजीटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) नावाची चाचणी करुन रक्तवाहीनीतील अडथळा अचूक ओळखता येतो आणि तो अडथळा ‘मेकॅनिकल म्बेअँक्टमी’ या प्रक्रियेद्वारा दूरही करता येतो. पण याहून जास्त कालावधी झाला असेल तर अॅस्थिरिन कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं देऊन पुन्हा लकवा होण्याची शक्यता कमी करता येते. उच्च, रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान यांचे नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. हातापायाची ताकद हळूहळू सहा महिन्यांपर्यंत सुधारते. पण त्यासाठी फिजिओथेरपी खूप महत्त्वाची असते. हेमरेजिक स्ट्रोकच्या उपचारासाठी कधीकधी न्युरोसर्जरीची वेळ येऊ शकते
हॅमरेजिक स्ट्रोकचे शस्त्रक्रियेद्वारे मेंदूमध्ये पसरलेले रक्त काढून आणि मेंदूमध्ये वाढलेला दबाव व्यवस्थापित करून उपचार केले जातात.
मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये पॅरालिसीस्टच्या इलाजसाठी मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज
कॅथलॅब (DSA ) आहे तसेच स्ट्रोक थ्रोबॉलायसिस, थ्रोम्सेटॉमी, अँजिओग्राफी (DSA), अँजियोप्लास्टी (Stenting), कॅरोटिड एंडरटेरेकटॉमी
कॉयलींग व किलिपींग या सर्व सुविधा उपलब्ध आहेत २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत.