Chitanya Vadhuvar Kendra

Chitanya Vadhuvar Kendra प्रतिक्षा संपली जावई-सुनेची"चैतन्य" म?

सप्रेम नमस्कार,

श्री. सतीश सराफ,

१. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून व दैवी आशीर्वादाने प्रवृत्त होऊन.

२. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आम्ही सेवा देत आहोत.

३. आजच्या धकाधकीच्या, पळापळीच्या वातावरणात वधुवर सुचक केंद्र काळाची गरज बनली आहे.

४. आजकाल नातेवाईक, जवळचे संबंधित, पैसा व वेळ खर्ची पडेल म्हणून या भानगडीत पडत नाहीत म्हणून हे सेवाकार्य आम्ही हाती घेतले आहे.

५. अनेक पालकांना त्यांच्या मुलामुलींसाठी योग्य वधुवर निवडून देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

६. आम्ही फक्त सुचक आहोत, मध्यस्थी, पसंती व व्यवहार यात कोणताही संबंध ठेवत नाही.

७. आमच्या सेवेने आपण घरबसल्या, ऐच्छिक व पसंतीनुसार स्थळे प्राप्त करू शकता.

८. आपुलकीच्या भावनेने विश्वासार्ह सेवा.

९. विविध शहरातील विवाह संस्थांशी सल्लग्न.

१०. उत्स्फूर्तपणे आम्ही य सेवा कार्यात लीन आहोत.

22/08/2024

🎯 *विवाह एक भीषण परिस्थिती*...
😔😔😔😔😔
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.* कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
*आवडल्यास पोस्ट फाॅरवर्ड करा.*
विजय घासे,अ.नगर 🙏

आधारित.

15/06/2024

👍 फक्त बायोडाटा पाहून नातेसंबंध तयार होत नाहीत,संवाद साधा,कॉल करा.
👍 समोरच्या व्यक्तींची फोन येण्याची वाट पाहू नका,स्वतः कॉल करा.
👍 मंगल कधीच अमंगल होत नाही, विवाह हे शुभ कार्य आहे.
👍 आपली मुलगी स्टार आहे,तर त्यांचा मुलगाही सुपरस्टार आहे
👍 ९० टक्के लोक आपल्या सारखीच आहेत,सर्व गुणसंपन्न कोणीच नाही.
👍 विवाह योग्य वयातच विवाह करा, वय वाढत जाणं योग्य नाही.
👍 सूट होईल त्यांच्याशीच संपर्क करा,ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी वेळ वाया घालू नका, त्यांच्या अपेक्षा आहेत,त्यात तुम्ही असाल तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील हे लक्षात ठेवा.
👍 रंग रूपापेक्षा गुणांकडे लक्ष द्या,प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कमी असणारच आहे.त्यासाठी पुढे ॲडजस्टमेंट करा.
👍 तुम्हाला कॉल करेल त्याचा सन्मान करा,स्थळ तुम्हाला पसंत नसेल तर योग्य कारण सांगून नकार कळवा,कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारं स्थळ त्यांच्या एखाद्या नातेवाईकाकडे ही असू शकते,हा विचार करा.
👍 अमिताब बच्चन पेक्षा जया बच्चन उंचीने १२ इंच छोटी होत्या.
👍 करीना सैफ अली पेक्षा सोळा वर्षांनी लहान होती.
👍 सचिन पेक्षा अंजली तीन वर्षाने मोठी आहे.
👍 ऐश्वर्याला मंगळ होता, अभिषेकला मंगळ नव्हता
👍 दुसऱ्या मधील कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यातील दोष शोधा.
👍 सकारात्मकता बाळगा.
*पुढे पाठवा...परिवर्तन घडवा*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

==ज्या वधुवर मुला मुलींचे बायोडाटा गेली दोन चार वर्षे झाली, वेगवेगळ्या वधुवर ग्रुपवर येत आहेत , त्यांना एक विनंती आहे की , तुमच्या अपेक्षा कमी करायला हव्यात !
आजुन पण वेळ गेलेली नाही ,योग्य वेळी अपेक्षामध्ये बदल केला पाहिजे !
नाहीतर आजुन पुढे दोन चार वर्षे लग्न जमणार नाही !
तेव्हा योग्य वय योग्य अपेक्षा ठेवली पाहिजे ! तरच तुम्हाला तुमच्या योग्य स्थळ मिळतील !
नाही तर तुमचे फक्त बायोडाटाच वेगवेगळ्या वधुवर ग्रुपवर बघायला मिळेल बाकी काही होणार नाही !
तेव्हा वेळीच जागं होणं गरजेचं आहे !
गेली चार चार वर्ष तुम्हाला तुमच्या अपेक्षा प्रमाने स्थळ मिळत नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्याल ऐवढे तुम्ही नक्कीच सुज्ञ आहात !
एकदा वय वाढलं की अनेक समस्या निर्माण होतात !
लग्न होणार कधी ? मग स्थिरस्थावर होणार कधी ? मग लगेचच मुलबाळ नको म्हणून पुढे आणखीन काही वर्षे जातात !
मग मुलबाळ होण्याचे वय निघुन गेले की परत मुलबाळ होण्यासाठी दवाखाना , तंत्रमंत्र ,उपास , नवस सुरू होतात !
त्यासाठी परत लाखो रुपये खर्च करायची वेळ येते !
मग टेस्टट्यूब बेबी चे आता त्यामुळेच अनेक हॉस्पिटल झाले आहेत ,तिकडे लाखो रुपये खर्च करावा लागतो !!
काहींना त्यातूनही मुलबाळ होत नाही , मग अनाथाश्रमातुन मुल दत्तक घ्यायची वेळ सुद्धा अनेकांवर आली आहे !!
त्यामुळे किती प्रमाणात अपेक्षा ठेवायच्या ते ठरवा !! आणि वेळीच निर्णय घ्या !!
खासकरून कुंडली जुळवायच्या भानगडीत पडू नका !!
आपल्याच आजूबाजूला जरा लक्ष देऊन बघा ,
कुंडली जुळलेली अनेक लग्नं मोडली आहेत !
अनेक जण विधुर विधवा झालेल्या पण दिसतील !!
तेव्हा कुंडली जुळवण्यापेक्षा , मनं जुळतात तिथं चांगली सोयरीक जमते !!
अनेक प्रेमविवाह यशस्वी झालेली सध्या दिसत आहेत ,त्यांनी काय कुंडली बघून प्रेम केलेले असते का ??

==================

🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹      ♦️ *विचारपुष्प*♦️*लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा,* *सध्याच वैवाहिक ज...
10/09/2023

🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹

♦️ *विचारपुष्प*♦️

*लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा,*

*सध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे*.. *नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या* *आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात. अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेले आहे. आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे*...
*त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेकीला पत्र*
*प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद* .
*लेक लाडकी माहेरची होणार सुन तु सासरची* " *यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी*..
*पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत*
*दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे*.
*बेटा ,विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे.तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होईल .हे पाऊल घरात टाकताना तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होईल..हे लक्षात ठेव. आणखी एक ,सुख हे बूमरँग सारख असतं ,दुसऱ्याला दिल की फिरून ते आपल्यापाशी येतं*
*तु समजूतदार आहेस. पण माझ्यातल्या आईला काळजी वाटते म्हणून हा पत्रप्रपंच*.
*बेटा , विवाह यशस्वी होण्याचं गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळवण्यात नसून योग्य जीवनसाथी बनण्यात आहे*.
*संसार सुखाचा करण्यासाठी दोघे एकमेकांचे सोबती व्हा, बारीक-सारीक तडजोडी स्वीकारा. हट्टीपणा कमी केलात तर सगळेच हट्ट पुरवले जातील. कुटुंबातील सदस्यांचा आदर राख , प्रेमाने वाग ते ही मग तुला आपली मानतील, प्रेम, सुख तुला ही नक्कीच मिळेल*.
*महत्त्वाचं मोबाईल , फेसबुक व्हाट्सअप, चॅटिंग पासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न कर. त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा घरांमध्ये संवाद ठेव .थोड अवघड जाणार आहे पण सवय कर*.
*एक राहिलंच, फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा सासुबाईंशी संवाद ठेव . छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगण्यापेक्षा सासूबाईंचा सल्ला घे. मला तर काय तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच पण नकळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवले. त्यापेक्षा तू सासुबाईंशी मैत्री कर त्याच तुझ्या हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. माझे व पप्पांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच*..
*तुझे बालपण , अल्लडपणा संपून आता तू गृहिणी होणार आहेस. तुझ्या आगमनाने त्या घरची तू भरभराट करशील दोन्ही घराण्याचे नाव उज्वल करशील हे नक्कीच*..
*बेटा ,तुला वाटेल आधुनिक काळात मी पत्र लिहिले आहे पण हेच पत्र तुझ्या कायम सोबत असेल मोबाईल मधील मेसेज सारखे डिलीट होणार नाही.. तुला खूप खूप आशीर्वाद*...
*तुझीच लाडकी*
*आई उर्फ मम्मी*
*****

📜 *दैनिक पंचाग व आध्यात्मिक माहितीसाठी

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

WhatsApp Group Invite

17/11/2022

ठरले.अरेंज्डओळखीतल्या एका मुलीचे लग्न ठरले.अरेंज्ड मॅरेज. मुलगा मुलगी दोघेही उच्च शिक्षित आणि चांगला जॉब असलेले.

एंगेजमेंट झाली.
मित्र मैत्रिणींच्या गृप मधे चर्चा करताना एका मित्राने चिडवले, की असं कसं सरळ लग्न ? नुसता बायोडाटा बघून ? काही दिवस लिव- इन मधे रहा. लग्न जरा पुढे ढकल.

मुलीला पटले. पण तिचे आईवडील चिडले सल्ला देणा-या मित्रावर.

मुलीने मात्र या सल्ल्यावर विचार केला.
मुलगा पण तसा नवीन विचारांचा. तो तयार झाला लीक ईन मधे रहायला.

मग आईवडिलांना संमती द्यावीच लागली.

दोनच महिन्यांत मुलीला मुलाच्या विचित्र स्वभावाची जाणिव झाली. अतिशय आक्रमक स्वभाव, आणि घाणेरड्या शिव्या देण्याची सवय.
तिने थोडाफार प्रयत्न केला तिच्या बाजूने त्याच्यात सुधारणा करण्याचा. त्याला समजावण्याचा.
पण परिणाम उलट झाला.

त्याने चक्क मारझोडच सुरू केली.

मुलीने मग सगळी परिस्थिती व्यवस्थित आई वडिलांच्या लक्षात आणून दिली.
लग्न मोडले.

मुलीचे आई वडील जे त्या मित्रावर चिडले होते तेच आता त्याचे आभार मानताना थकत नाहीत.

मुलींनी वेळीच सावध होणे, आणि निवड चुकलीय हे लक्षात येताच नात्यातून मोकळं होणे खूप गरजेचे.

भावनिक गुंते जीवावर बेतू देऊ नयेत.

पूर्वीसारखी नात्यागोत्यातून स्थळं मिळणे आता कठीण आहे. मेट्रोमोनी साईट्सवर फक्त बायोडाटा कळतो, माणूस नाही. जग बदलंलय, गरजा बदलल्यात, काही बदल अपरिहार्य होत जाणार यापुढे. स्विकारावे लागतील.
पण परिस्थिती कितीही बदलली तरी मुलींनी आपला आत्मसन्मान जागृत ठेवावा. मुख्य म्हणजे डोळसपणा गमावू नये कधीच.
प्रेम, नातं, लग्न, सहजीवन या सा-या पुन्हा पुन्हा मिळू शकणा-या गोष्टी आहेत.
जीव ही एकच गोष्ट आहे जी पुन्हा नाही मिळत.

फार कष्टाने इथवर आला आहात, सुखरूप असा.

04/11/2022

🔸️विषय- #विवाह_विलंब_वैवाहीक_जीवन
🔹️संदर्भ आधार- सप्तम स्थान.
🔸️लेखक- ज्यो. गजानन परब.

🚩️सनातन भारतीय संस्कृती मध्ये विवाह संस्काराला 'सोळा संस्कार मधील एक महत्वपूर्ण संस्कार मानला आहे.. तर योग्य वेळी विवाह न होणे हे मुलांसाठी समस्या बनतेच पण आईवडील आणि नातेवाईक यांना एक प्रकारे टेंशन चे काम बनते.
🔹️अगोदरच्या काळात आईवडील, नातेवाईक मुलींच्या विवाहा विषयी खूप चिंतित असायचे, पण आजकाल मुलांच्या विवाह कार्या साठी आईवडील चिंतित होताना आपण जास्त पहातो.सांगायचे झालं तर आज काही लोक विवाह न जमल्या मुळे आविवाहित अवस्थेत पण जगत आहेत.

♦️पूर्वीच्या काळी विवाह निच्छित कसा व्हायचा तर “हा मुलगा आहे, त्याच्या बरोबर तुला विवाह करायचा आहे” किंवा मुलाला पण, “ही मुली आहे तिच्याशी तुला विवाह करायचा आहे” अशा पद्धतीत विवाह ठरले जायचे, म्हणजे घरातील नातेवाईक किंवा प्रौढ व्यक्ति सुचवतील त्या प्रमाणे, त्यांच्या सल्ल्याने विवाह व्हायचे.

🔸️आज काल झाले काय तर मुला-मुलींची निवड पसंती (choice) हा विषय प्रामुख्याने पाहायला मिळतो.
आज मुलींच्या पसंतीला जास्त महत्व आले आहे, त्यामुळे मुलांच्या विवाह जमण्यास कुठेतरी जास्त अडचणी येत आहेत, त्याच बरोबर मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण पण वाढले आहे , मग त्या प्रमाणे अपेक्षा, त्यामुळे मुलींना योग्य आणि अनुरूप मुलं मिळत नाहीत, विलंब होतो, याचा अर्थ असा नाही की मुलींनी उच्च शिक्षण घेऊ नहे.

🔹️ त्यात ही अति अपेक्षित आणि अती चिकित्सक पणे पहाणे, मग मुलगा असाच हवा आहे, तसाच हवा, मग तो हेच करतो, तेच करतो. आजकाल मुलं-मुलीतर आपल शिक्षण आणि त्याच बरोबर करिअर ह्यासाठी विवाह टाळा-टाळ करतात, विवाह विलंब करतात, मग करिअर करू नये का? असही नाही आवश्यक हे, तर हे पण विवाह विलंब होण्याचे आज कारण बनत आहे. अति अपेक्षांच्या बातीत कुठेतरी समंजस पणा, तडजोड आवशक असते.

♦️मुलां साठी पण काहीवेळा विषय असाच होत असतो करिअर उशिरा सेटल झाल्याने विवाहाची योग्य वेळ निघून गेलेली असते, तर काही वेळा घरातील परिवारीक जबाबदार्‍या पण कारण बनत असते, त्यात मुलांची परिस्थिति नसेल, योग्य अपेक्षित जॉब नसणे, करिअर सेटल नसणे, स्वतंत्र व्यक्तीगत घर नसणे, अशा प्रकारचे सर्वच विषय मुलांसाठी विवाह अडथळे आणि विलंब बनत आहेत.

🔸️काही वेळा आपण कितीही सुंदर असोत, कितीही कमवत असो, आणि तुमच्या नजरेत तुम्ही पूर्ण पणे विवाहसाठी योग्य असाल तरीही विवाह योगाची वाट पहावी लागते. मुली असो वा मुलगा असो विलंब विवाह दोघांसाठी आणि आई-वडीला साठी समस्या बनून जातात, स्थळ शोधताना एकतर आपली जेवढी क्षमता असते त्याचा आसपास पण मुलगा मिळत नाही, मुली मिळत नाही, तर काही-वेळा फॅमिलीच्या पसंती ना पसंतीत पण विवाह जुळता-जुळता मोडला जातो, ही सर्व सामान्य वाटणारी पण आज कालची आसामन्य कारणे बनत आहेत.

🚩 विवाह कारक ग्रह-

✅ गुरु- सर्व गुण संपन्न, धन, धर्म, ज्ञान, सुख समृद्धी, विवाह, संतती, भाग्य देणारा ग्रह सर्व ग्रहात अत्यंत फलदायी, सर्वमंगळ कार्याचा काराक असा गुरु कुंडलीत कुयोगात, दूषित असेल, असमर्थ असेल तर खास करून स्त्रियांसाठी विवाह विलंब होण्यास महत्वाचे कारण ठरते, आणि गुरू मंगलकार्याचा कारक असल्याने विवाह योग खास करून गुरुच्याच गोचर भ्रमणात घडतात.

✅ शुक्र- आजच्या भौतिक जागात आणि वैवाहिक जीवनात शुक्राची जागा सर्वोच आहे, व्यक्तिला भोग,एश्वर्य आणि सुखी जीवनाच्या आधारासाठी शुक्र शुभ आणि बलवान असणे आवशक असते, शुक्र कुयोगात असेल तर जातक विवाहित होऊन पण वैवाहिक सुखात कमतरता भोगत असतो, खास करून शत्रू, नीच राशीत आणि काही अयोग्य नक्षत्रात असलेला शुक्र पीडित असतो, उदा. मूळ नक्षत्रातील शुक्र वैवाहिक दृष्टीने अशुभ योगकारक ठरतो.

🚩विवाह विलंब होण्याची दैविक कारण कोणती असू शकतात-
1) कुलाचार- आपल्या कुलदेवतेचा मानपान, भेटी, आपल्या परंपरागत रीतिरिवाज, आपली संस्कृती याकडे दुर्लक्ष करणे.

2) निर्वंशाची( निपुत्रिक ) आडकाठी म्हणजे आपला घरचा निर्वंशिक असणे आणि त्याची आतृप्तता. एखाद वेळी जमीन मालमत्ता आपण विकत घेतो, ती जर अविवाहित आतृप्त गेलेल्या व्यक्तीची असेल तरी ही अडचण निर्माण होऊ शकते.

3) नियमित श्राद्ध कर्मांकडे दुर्लक्ष करणे , पितृदोषतुन अतृप्तता म्हणजे घराण्यात अकाली, अपघाती मृत्यू झालेल्यांची वासना शिल्लक राहणे.

4) ब्रम्ह सबंदिक बाधा असणे.
अशा प्रकारच्या दैविक विषय विवाह विलंब होण्यास जास्त प्रभावित करतात.
पहाण्यात आले की पितृदोष निवारण करून एका वर्षा आत विवाह पण जुळले आहेत. मग यासाठी योगाची वाट पहावी लागली नाही.

🍂आता आपण जन्म पत्रिके नुसार पाहुयात कोण-कोणते योग विवाह विलंब होण्यास कारण बनतात.

🔸️स्त्री कुंडलीत सप्तम भाव कारक, विवाह कारक देवगुरू बृहस्पती यांची स्थिति. स्त्री कुंडलीत गुरु निर्बली असेल, कुयोगात असेल.

🔹️ पुरुषाच्या कुंडलीत भाव कारक, विवाह काराक म्हणून शुक्र कुयोगात, निर्बली असेल तर विवाह विलंब होण्याचे कारण बनते.

👉दोघांच्या ही पत्रिकेत गुरु, शुक्र स्थिति आवश्यक आहेच, दोन्ही कुंडलीत विवाह कारक, संतती कारक गुरु असतो , दोन्ही कुंडलीत दांपत्य कारक, प्रेम कारक शुक्र असतो.

♦️ सप्तम स्थानात पाप ग्रह स्थित असतील, जसे शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपचून शत्रू राशीचा रवी.

🔸️सप्तमात कोठूनही पाप ग्रहांची दृष्टी पडेल.

🔹️ सप्तम भाव पापकर्तरी योगात असेल. म्हणजे सप्तमाच्या मागच्या आणि पुढच्या भावात पाप ग्रह स्थित असतील. असेल तर विवाह योग न येण्याची समस्या उद्धभवते.

♦️ सप्तमेश कुयोगात, अशुभ दृष्टीत असेल.

🔸️सप्तमेश 6,8,12 या त्रिकस्थानात असेल, 6, 8 ,12 या भावांचे स्वामी खास करून पाप ग्रह असून सप्तमात असतील.

🔹️सप्तमाचे अष्टम म्हणून दूतीय स्थान आणि सप्तमाचे षष्ठ स्थान म्हणून द्वादश स्थान कुयोगात असतील.

♦️सप्तमात कुंभ राशी किंवा मकर राशी असल्यास सुद्धा विवाह उशिरा योग होण्याची श्क्यता असते.

🔸️काही वेळ तर असेही पाहण्यात आले की सप्तमेश शनीच्या राशीत असतील तरीही विवाह योगात उशिराच झाला.

🔹️सप्तमेश नीच राशीत असेल, अस्त असेल, डिग्रीवाईज अतिशय निर्बली असेल अश्या कुठच्याही योगात वैवाहिक सुखात कमतरता राहते.

🔸️ जन्म कुंडलीत सप्तमेष दूषित असेल परंतु नवमाशी सुस्थिति असेल तरी बर्‍या पैकी विवाह योग जमतात.

❓या व्यतिरिक्त विवाह योग योग्य वेळी घडणे यासाठी कोणते योग लाभदायी ठरतात.

🔹️ सप्तम भाव व सप्तम भावाचा स्वामी म्हणजे सप्तमेश बलीष्ठ होऊन त्रिकोण स्थानात स्थित असणे.

♦️परूषांच्या कुंडलीत शुभ व बलवान शुक्र असणे .

🔸️ स्त्रि कुंडलीत गुरू, व सप्तम स्थान, सप्तमेश , गुरू अशुभ आणि पाप ग्रंहाच्या प्रभावाने मुक्त असणे .

🔹️सप्तमेश आणि सप्तम स्थानावर जेवढ्या शुभ ग्रंहाचा प्रभाव असेल तेवढेच विवाह योग योग्य वेळात घडतात. .

♦️ शुक्र ,गुरू, बुध शुभ आणि शुभ बली चंद्र ने युक्त असेल कींव्हा द्रुष्टी असेल..तर योग्य वेळात विवाह योग घडतो.

🟢पाहुयात विवाह योग कालनिर्णय किंवा गोचरी नुसार विवाह योग केव्हा घडेल-

♦️सर्वात प्रथम हे सांगेन आपल्या घरचे रिरीतीवाज, परंपरा, श्राद्ध कर्मे, कुलदेवी दर्शन, मान पान यांचा विसर झालेला असेल, वास्तूत दोष असतील, कुंडलीत सप्तमावर आणि सप्तमेशावर अत्यंत प्रभावित करणारा कुयोग असेल अश्या स्थितीत ज्योतिष शास्त्र विवाह योग नियमानुसार जरी ज्योतिषाने विवाह योग काडून दिला तरी तो चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते, हा अनुभव आहे. त्या मुळे अशा प्रकारचे घटना कुंडली नुसार सखोल जाणून घेऊन योग्य उपाय योजना करणे आवशक ठरते. काही वेळा जातक शोशल मिडीयात सांगितलेले उपाय व जाहीरीती उपाय पण करतात पण त्यात यश येत नाही . कारण विवाह विलंब याबद्दल काय नेमक कारण असेल त्यानुसार उपाय योजना करणे आवश्यक असते.

🔸️विवाह योग गोचर❗

1) सर्वात प्रथम विवाह कारक ग्रह गुरु गोचर भ्रमणानुसार गुरूचा संबंध कुंडलीत प्रथम स्थानातून, तृतीय, पंचम, सप्तम, नवम आणि एकादश स्थनातून होईल अश्या छोट्या पण महत्वाच्या काळात विवाह योग घडून येतात. त्यात ही एकादश, प्रथम, तृतीय आणि सप्तम या स्थानातून गोचर प्रबळ योग ठरतात.

2) त्याच प्रमाणे गुरु चे गोचर भ्रमण सप्तमेशावरून होईल, सप्तमेशावर दृष्टियोग होईल, शुक्रावरून , चंद्रा वरुन गोचर होईल अश्या स्थितीत विवाह योग घडतात. पण ह्याच गोचर भ्रमणात गुरु पाप ग्रहसह फार अंशात्मक युतीतून भ्रमण करत असेल तर विवाह योगा साठी अनुकूल स्थिति बनत नसते.

3) त्याच प्रमाणे शुक्राचे भ्रमण सप्तमातून, सप्तमेशा वरुन, लग्नावरून वरुन होत असेल तरीही विवाह योग घडतात. शुक्राच्या महादशेत आणि सप्तमेशाच्या अंतर दशेत विवाह योग घडून येतात. चंद्र महादशेत पण सप्तमेश ची अंतरदशेत विवाहयोग्य घडतो.

4) सप्तमेशची महादशा असेल आणि त्यात शुक्र किंवा गुरु यांची अंतर्दशा येत असेल तर विवाह योग घडतात. पण हीच दशा वयाच्या 50 व्या वर्षी येत असेल तर मग ? तर अशा स्थितित हा नियम योग्य नाही मग सप्तम स्थानात स्थित ग्रह, सप्तम स्थानात ज्या शुभ ग्रहांची दृष्टी पडते त्यांच्या महादशेत विवाह योग घडून येतात. तर हे प्रामुख्याने पाहिले जाणारे गोचर योग आहेत.
धन्यवाद 🙏
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहीतीसाठी ❗ज्योतिष आणि अध्यात्म ❗या ग्रुपला आवश्य भेट द्या.

.
🍂
Gajanan Parab.
Whtsp- 9403435853.

24/09/2022

विषय :- गुणमेलन (ज्योतिषशास्त्र)
लेखक :- देवेंद्र माणगावकर
संदर्भ :- कुंडली विश्लेषण (श्री. माधव पेठे)
“खरे तर आमच्या कुंडल्या उत्तम जुळल्या होत्या मग ही परिस्थिति का ओढवली?” वैवाहिक समस्येविषयी मार्गदर्शनाला आलेले बहुतेक जातक किंवा त्यांचे पालक हा प्रश्न हटकून विचारतात. गुण उत्तम जुळले म्हणजे कुंडल्या उत्तम जुळल्या असे नसते. वैवाहिक सौख्य लाभेल की नाही, सुसंवाद असेल की नाही, पुढील सहजीवन वैगेरे संदर्भात सर्व बाबी उभयतांच्या पत्रिकेत पाहून कुंडल्या जुळवाव्या लागतात. सप्तम स्थान म्हणजेच विवाह स्थान बिघडले असेल, वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र, सप्तमेश अनुकूल नसतील-कुयोगात असतील तर वैवाहिक समस्या उद्भवतील असे संकेत कुंडली देते, अशा ग्रहस्थितीत जोडीदाराच्या कुंडलीत पण असेच प्रतिकूल योग असतील तर वाद-विसंवाद विकोपाला जाण्याची शक्यता असतेच! फक्त दोन्ही कुंडल्या मंगळाच्या आहेत किंवा दोन्ही कुंडल्या मंगळाच्या नाहीत, गुण 18 पेक्षा जास्त जुळत आहेत आणि नाडी एक नाही एवढेच पाहून कुंडली जुळवली असता नेहमीच नव्हे पण काही वेळेस पश्चाताप करण्याची पाळी येते.
■ देवेंद्र माणगावकर■
संपर्क Whats app 9137509269
(कुंडली मार्गदर्शन)

09/08/2022

**विवाहासाठी गुणमिलन व कुंडली कुंडली मिलन करणं का आवश्यक आहे??? :-

सध्याच्या काळात लोक विवाह जुळवताना वंश, जात, पोटजात, सामाजिक दर्जा, आरोग्य,अव्यंगत्व, आर्थिक स्थिती, रूप, शिक्षण, नोकरी इ अनेक गोष्टी निरखुन पारखुन घेतात. प्रथम दर्शनी सर्व काही एकमेकांना पोषक असल्यास, पसंती असल्यास नंतर मग पत्रिका जुळते का ते पहायला येतात.विवाह जुळविताना वधु-वरांच्या पत्रिकेचे गुणमेलन करून दोघांच्या कुंडल्या जुळतात की नाही हे पाहण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
याउलट आम्हांला विवाह करताना पत्रिका पहावयाची नाही, आमचा ज्योतिषावर विश्वास नाही. ३६ गुण जुळून सुध्दा घटस्फोट होतातच की ?मग गुणमिलन व कुंडली मिलन करून काय फायदा??जे नशिबात लिहिले आहे ते घडणारच आहे तर मग का कुंडली दाखवून विवाह करावा??असे अनेक प्रश्न व आपले विचार मांडणारे लोकही समाजात भरपूर आहेत.
मग आता प्रश्न पडतो, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडली जुळवून लोकांनी विवाह करावा की वास्तविकतेच्या आधारावर परस्पर पसंतीने करावा?तर याबाबत माझे असे मत आहे की हा प्रत्येक व्यक्तीच्या श्रध्देचा प्रश्न आहे. कारण श्रध्दा असल्याशिवाय इच्छित फळ प्राप्त होत नाही.कारण ज्योतिष हे अंधारमय जीवनात प्रकाश दाखविणारे शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्राचा उपयोग भविष्य सांगण्यापेक्षा भविष्य घडविण्यासाठी व लोकांना फक्त मार्ग व दिशा दाखवण्यासाठी नक्कीच होतो. कारण पूर्वजन्मीच्या पापपुण्याच्या आधारे या जन्मी आपणास दुःख किंवा जीवन जगावे लागते.ते बदलत नाही, ते दुःख भोगल्याशिवाय या जन्मातून मुक्तता होत नाही. अशावेळी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीतील संभाव्य गोष्टींचे मार्गदर्शन लोकांनी घेतल्यास त्यावर मार्ग, उपाय काढता येईल व भविष्यात घडणाऱ्या परिणामाची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करता येईल.कारण कुंडलीवरून विवाह,वैवाहिक सौख्य,संतती सुख,जोडीदाराचा स्वभाव,आरोग्य,आर्थिक स्थिती,व्यसन इत्यादी गोष्टींसंदर्भात दोघांच्याही कुंडलीत जे काही दोष असतील त्या दोषांचे उपाय केल्यास हमखास या दोषांची तीव्रता आपण कमी करू शकतो.त्यासाठी अगदी वेळेवर एखाद्या जाणकार ज्योतिषीकडून दोघांच्याही कुंडल्या तपासून घ्याव्यात.
कुंडली पाहुन विवाह जुळविणे यामागील लोकांचा मुख्य उद्देश वधूवरांचे भावी वैवाहिक जीवन परिपूर्ण, आनंदमयी व प्रगतीकारक जावे हाच असतो. थोडक्यात भावी वैवाहिक समस्या उत्पन्न न होता उत्तम वैवाहिक सौख्य, संतती सौख्य इ. मिळावे हीच लोकांची धडपड विवाहापूर्वी कुंडली पाहण्यासाठी असते.
म्हणून काळजीपूर्वक सखोल वधु-वरांच्या पत्रिका पाहुन त्या एकमेकांस पोषक आहेत की नाही, त्यांनी लग्न करावे की नाही इ. अभ्यासपूर्वक सांगता येते.सध्याच्या काळात वाढते घटस्फोटाचे प्रमाण, स्त्रीयांवर अत्याचार, छळ, स्त्रीयांना मारझोड,हुंड्यासाठी स्त्रीहत्या किंवा मानसिक छळ, वैवाहिक मतभेद व असमाधानामुळे होणा-या आत्महत्या,वाढत्या कोर्टकचे-या व त्यांचा होणारा मानसिक त्रास इ. अनेक गोष्टी समाजामध्ये भीषण रूप घेत असलेल्या पहावयास मिळतात. वरील सर्व घटना कुंडली मिलन व गुण मिलन करून निश्चितच टाळता येऊ शकतात किंवा आपण वैवाहिक सौख्याशी संबंधित असणारी तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. त्यामुळे विवाह जुळवताना किंवा विवाह करण्यापूर्वी प्रत्येकांनी कुंडली पाहुनच विवाह करणे योग्य होईल.
पत्रिका पहाण्याचे अनेक फायदे आहेत सामान्यतः ज्या व्यक्तीशी आपले जन्माचे संबंध येणार त्याची फारच थोडी माहिती एकमेकांना असते किंबहुना कधी कधी चुकीची माहिती पण आपणास दिली जाते.
आजकाल कोणालाही फारसा वेळ नसल्याने येणाऱ्या स्थळासंबंधी लोक खूप खोल व खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. व वरवर चांगले दिसणारे स्थळ विवाहानंतर वाईट किंवा चुकीचे
वाटते नंतर मग घटस्फोटाचा विचार केला जातो.
अशा प्रसंगी जर भावी जोडीदाराची कुंडली मिळाली तर त्या कुंडलीवरून ब-याच गोष्टीचे अचूक ज्ञान ज्योतिषाला होऊ शकते व वास्तविकता समोर मांडता येते.
जोडीदाराच्या कुंडलीवरून त्याला भावी जीवनात वैवाहिक सौख्य, आरोग्य, आयुष्य, संततीसौख्य,संपत्ती,करीअर, वास्तूसुख, वाहनसुख, व्यसन,मानसिकता इ.कसे आहे?हे बघता येते.अशा प्रकारे जर विवाहापूर्वी कुंडली पाहिल्यास नक्कीच फायदा होईल.
यासाठी गुणमिलनाबरोबर एकमेकांच्या कुंडलीचे मिलन केल्यास व कुंडलीतील दोषांचा सखोल अभ्यास करून त्यावरील उपाय केल्यास नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या वैवाहिक जीवनात होईल.उलट मी तर गुण मिलनापेक्षा कुंडली मिलनाला जास्त महत्व देतो.माझ्या पाहण्यात अशी बरीच जोडपी आहेत की ज्यांनी कुंडली मिलन न करता फक्त गुण मिलनावरून विवाह केलेला आहे.अशा वेळेस ज्यांचे 36 गुण जुळून सुधा घटस्फोट झालेला आहे किंवा वैवाहिक जीवन असमाधानी आहे अशी बरीचशी जोडपी पाहण्यात आलेली आहेत.माझ्या 18 वर्षांच्या अनुभवावरून व अभ्यासावरुन माझ्या जातकांना मी अगदी ठामपणे असे सांगतो की तुमचे गुण मिलन अगदी 10/12 जरी जुळेलत परंतु दोघांची कुंडल्या वैवाहिक सौख्याशी संबंधित पूरक असतील तर त्यांना अगदी कुठलीही शंका मनात न ठेवता विवाह करा म्हणून सल्ला देतो.परंतु ज्यांचे 36/32/30/28 असे गुण जर जुळत असतील परंतु दोघांच्या कुंडल्या वैवाहिक सौख्यशी संबंधित पूरक नसतील तर त्यांना हा विवाह करू नका असा सल्ला पण अगदी आत्मविश्वासानेच देतो.असे पाहण्यात आलेले आहे की बरेच जातक फक्त गुण मिलन बघूनच विवाह ठरवतात.त्यात त्यांचीही काही चूक नसते म्हणा कारण त्यांना जसे त्यांच्या गुरुजींनी सांगितले तसे ते करतात.कारण बहुतेक करून बरेच जातक पत्रिका अशा गुरुजींना दाखवतात जे फक्त पौरोहित्य करतात.कारण आपण पाहतो की जसे प्रत्येकाचा एक फॅमिली डॉक्टर फिक्स असतो अगदी तसेच प्रत्येकाचा आपला एक पुरोहित फिक्स असतो.छोट्या/मोठ्या धार्मिक विधीला आपण त्यांनाच सांगत असतो.मग जातकांना काही अडचण आली की ते आपल्याच पुरोहितला विचारतात.काही अपवाद सोडून बऱ्याच पौरोहित्य करणाऱ्या पुरोहिताला ज्योतिषाचे ज्ञान अजिबात नसते.कारण पौरोहित्य हे एक वेगळं सेक्शन आहे तर ज्योतिष हे एक वेगळं सेक्शन आहे.फक्त गुण मिलन हे कोणताही पुरोहित पंचाग पाहून सांगू शकतो.परंतु तो कुंडलिचे विश्लेषण नाही करू शकत.निश्चितच काही पुरोहित असे पण आहेत की त्यांनी ज्योतिषाचा पण अभ्यास केलेला आहे.परंतु यांची संख्या फारच कमी आहे.परंतु ते तुम्हाला ओळखण अवघड असतं.मग अशावेळेस तुम्हाला एखाद्या योग्य आणि जाणकार ज्योतिषाकडे(जो फक्त ज्योतिषीच आहे) जाऊनच कुंडली मिलन करून घेतलेले कधीही चांगले.परफेक्ट कुंडली मिलन करून केलेला विवाह कधीच वैवाहिक सौख्यत बाधा आणत नाही किंवा अशी जोडपी घटस्फोटाचा विचार चुकून सुद्धा मनात आणणार नाहीत,हे मी अगदी ठामपणे सांगू इच्छितो.
अजून एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांचे लग्न झाले आहे पण त्यांनी विवाहापूर्वी गुण मिलन आणि कुंडली मिलन केलेले नाही आहे आणि विवाहानंतर ज्यांना वैवाहिक सौख्यामध्ये असमाधान आहे,पती पत्नीत मतभेद आहेत,पती पत्नी दोघांचेही अजिबात पटत नाही अशांनी दोघांतील संबंध भयंकर चिघळण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाला दोघांच्या ही पत्रिका दाखवून वेळीच उपाय करून घेतलेले कधीही चांगले .माझ्या अनुभवात अशी बरीच जोडपी आलेली आहेत ज्यांनी वैवाहिक असमाधानामुळे विरक्त होण्यापर्यंतची अगदी टोकाची भूमिका घेतलेली असते.विवाह म्हणजे काही बाहुला बाहुलीचा खेळ नाही आहे.पतिपत्नीत मतभेद असले तरी विवाह तोडने हा पर्याय नक्कीच नाही.अशा जातकांना एकच सांगतो की तुम्ही विवाह मोडण्यासाठी जेवढे प्रयत्न करत असतात त्यापेक्षा कुंडलीतील दोषांचे उपाय करून ते वाचवण्याचे प्रयत्न करा.उपाय केल्यानंतर त्यांना आपला संसाराचा गाडा सुखाने नक्कीच चालवता येईल यात शंका नाही.
वरील बाबींचा विचार केल्यास असे लक्षात येते की जाणकार ज्योतिषाकडे विवाहपूर्वी कुंडली बघुन विवाह जमविणे केंव्हाही चांगले.
(संदर्भ व लेखक :- डॉ.विकास खिलारे...संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ,सातारा)

**कृष्णा पाठक**
**ज्योतिष भास्कर**
**व्हाट्सअप्प नंबर:-9822788076**

23/07/2022

मुलांचे विवाहायोग्य वय झाले की पालकांच्या जीवाला घोर असतो. योग्य स्थळ योग्य वयात मिळून मुले मार्गी लागावीत अशी किमान अपेक्षा पालक या नात्याने अर्थातच वाजवी असते. जसजसे दिवस-महीने-वर्षे जाऊ लागतात आणि कुंडल्या-जुळत नाहीत तेव्हा धीर खचू लागतो. प्रेमविवाहाच्या बाबतीत प्रश्नच नसतो पण जुळवून केलेल्या विवाहाच्या बाबतीत कुंडल्या जुळत नसतील तर विवाह जुळविणे हे जोखमीचे असते म्हणून धाडस होत नाही आणि कुंडल्या जुळत नाहीत या कारणास्तव उत्तम स्थळे हातातून निसटतात याबद्दल हळहळ वाटत राहते. प्रत्येक समाजातील रिवाजाप्रमाणे गोत्र-देवक महत्वपूर्ण असते. शिवाय कुंडली समाधानकारक रित्या जुळत असेल तरी वरील बाबीमुळे स्थळ नाकारावे लागते. कुंडल्या जुळल्या तरी पुढचे सोपस्कार, वधू-वरांची पसंती, दोन्ही कुटुंबियांची पसंती, इतर अपेक्षा, विवाहाची बोलणी असे अनेक टप्पे यशस्वी रीतीने पार पडावे लागतातच. मुलाचे शिक्षण, त्याच्यावर असलेल्या जबाबदार्या, स्वत:चे घर आहे की नाही, नोकरी प्रायवेट की सरकारी तसेच पगार या बाबी महत्वपूर्ण असतातच तसेच मुलीसंदर्भात पण मुलीचे शिक्षण, नोकरी इत्यादि अपेक्षा असतातच. विवाहा संदर्भात सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्या असे क्वचितच घडते. कोठेतरी अपेक्षांना मुरड घालून तडजोड ही निदान काही प्रमाणात काही बाबतीत करावीच लागते. गुण जुळत असले तरी एक नाडी, षडाष्टक, मंगळाचा जाब या इतर अनेक बाबी असतातच ! कुंडली आणि अपेक्षा जुळणे या दोन पातळींवर कसरत सुरू असते वय आणि मनस्ताप दोन्ही सम पातळीवर वाढत असतात. विवाह होईल की नाही झालाच तर किती उशिरा हा प्रश्न चिंता वाढवीत असतो, अशा वेळी काही वेळेस अचानक योगायोगाने एखादे स्थळ येते आणि विवाह कधी कसा जुळून आला ते समजतही नाही सारे स्वप्नवत घडते आणि सुखद धक्का बसतो. कुंडलीत विवाहाचा योग असतो आणि कारक ग्रहांच्या दशा-अंतर्दशा असतात तेव्हा शुभ गुरु गोचराच्या कालावधीत गुरुची दृष्टी अधिकाधिक कारक स्थान – कारक ग्रहांवर पडते तेव्हा विवाह योग अत्यंत प्रभावी असतो. विवाह जुळतो आणि पालक सुटकेचा निश्वास टाकतात. काही अनिष्ट ग्रहमान विलंबास कारणीभूत असतात, सप्तम स्थानाशी शनिचा संबंध पण विलंब दर्शवितो. पितृदोष आणि कुलदैवतांच्या दर्शनास वर्षानुवर्षे जाणे होत नसते अशी काही कारणेही निदर्शनास येतात. संबंधित उपाय-उपासना विवाह जुळण्यास सहाय्यभूत ठरतात.

■ देवेंद्र माणगावकर■

संपर्क Whats app 9137509269

18/07/2022

दोन्ही बाजूंची इच्छा..... !

हल्ली दिवसेंदिवस घटस्फ़ोटांचं
प्रमाण वाढतच चाललं आहे ,असं
सगळ्यांनाच वाटतं.पूर्वी चुकून
एखाद्या जोडप्याचा घटस्फ़ोट व्हायचा आणि ती गोष्ट म्हणजे एखादी सनसनाटी न्यूज असावी
तशी वाटायची सर्वांना.घटस्फ़ोट
झालेल्या पुरुषाला काहीच फरक पडायचा नाही.पण घटस्फोटित स्त्रीकडे मात्र जणू ती एखादी गुन्हेगार असावी ,तसंच पाहिलं जायचं.तिच्या आईवडिलांना पण
समाजात मानहानी पत्करावी लागायची..त्या मुलीबद्दल आणि तिच्या आईवडिलांबद्दल सर्वांच्या नजरेत कळत नकळत एक प्रश्नचिन्ह उमटायचंच.

पण जसजशा मुली शिकत गेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या,आत्मनिर्भर झाल्या तसतसा हळूहळू काळही बदलत गेला.

आजकाल 'घटस्फ़ोट' ही गोष्ट तितकीशी स्फोटक वाटत नाही. ओळखीमधे..नात्यामधे..शेजारी पाजारी...बघावं तिथे घटस्फोटित तरुण तरुणी दिसतात.आणि आता ना त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना त्यात कमीपणा वाटतो ना आजूबाजूच्या लोकांनाही
त्यात विशेष काही वाटतं.जी गोष्ट सर्रास
सगळीकडे घडताना दिसते त्याबद्दल कुतूहलही तितपतच उरतं.

पूर्वीच्या काळचे सगळे संसार
सुखाचे होत होते, असं अजिबातच नाही.पण तेव्हा बायकांना स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं.सासर कसंही असलं,नवरा कितीही त्रास देत असला तरीही मुलींना मुकाट्याने सारं सहन करावं लागायचं.

कारण तेव्हा स्त्रियांकडे शिक्षण नव्हतं,त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नव्हत्या आणि माहेरचाही त्यांना पक्का आधार नसायचा. त्यावेळी घरात एखादीच मुलगी नसायची. पाठोपाठच्या आणखीही 2-3
मुली लग्नाच्या असायच्या.त्यामुळे
जर आपली मोठी मुलगी परत आली तर त्यामुळे बाकीच्या मुलींचं लग्न होणं कठीण जाईल, ही भीती आईवडिलांना वाटायची

...त्यामुळे नव-याशी पटत नसलं...सासरी जाच होत असला तरीही मुलीने कशीबशी तडजोड करून का होईना पण
नव-याकडेच राहावं अशीच माहेरच्या लोकांची अपेक्षा असायची.एकदा मुलीचं लग्न करून दिलं की आपली जबाबदारी संपली.आता मुलीने काहीही झालं तरी तिथेच राहायचं..कितीही छळ होत असला..जावई कसाही असला तरीही सारं सहन करायचं.काहीही झालं तरी सर्वांशी जुळवून घ्यायचं..अशीच अपेक्षा असायची.
कारण समाजही सासरहून परत आलेल्या मुलीला दूषणंच द्यायचा.

पूर्वीपासून, अगदी शतकानुशतकं
' वरमाय ' हे फार मोठं प्रस्थ होत आलं.खूप मुलींच्या वाट्याला सासरी छळ यायचा.नवरा मुलगा म्हणजे अगदी आईच्या ताटाखालचं मांजर... ! आईच्या हो मध्ये हो मिसळणारा.अगदी बायकोला घेऊन फिरायला जायचं असलं तरीही आईसाहेबांची
परवानगी लागायची.पण ते कधी कोणाच्या डोळ्यावर आलं नाही.

सासर म्हटल्यावर सुनेसाठी कडक शिस्त...त्या घरचे नियम...वगैरे वगैरे असायचंच.लग्नसमारंभातले
मानपान... वादविवाद सगळं मनात धरून, कितीतरी सुनांचं
'माहेर ' कायमचं बंदच व्हायचं.

पण हळूहळू काळ बदलत गेला. ..मुलींना त्यांच्या आईवडीलांच्या घरी मुलांच्या इतकंच स्वातंत्र्य मिळू लागलं. मुलीही मुलांच्या बरोबरीने
शिकू लागल्या.भरपूर पगाराच्या नोक-या करू लागल्या.त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत गेला.त्यांची स्वतःची ठाम मतं
तयार झाली.लग्नानंतर त्यांना काही त्रास झाला,नव-याचं आणि
त्यांचं पटेनासं झालं तर त्यांचे आईवडील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू लागले.

आपल्या मुलीचा जर सासरी छळ
होत असेल,तर सासरचं घर सोडून
येण्याच्या तिच्या निर्णयालाही,
आईवडिलांचा ठाम पाठिंबा मिळू
लागला..अगदी तिने घटस्फोटाचं
पाऊल उचलायचं ठरवलं तरीही.. !

आणि याच वेळेस पिक्चरमधे
"' मुलीच्या आईचा'' प्रवेश झाला!
मुलींना मिळू लागलेल्या स्वातंत्र्याचा...वाढत्या घटस्फोटांचा सर्वजण असा अर्थ काढून मोकळे झाले, की '
" मुलींच्या आया" त्यांच्या संसारात हस्तक्षेप करायला लागल्या म्हणूनच घटस्फ़ोटांची संख्या वाढायला लागली.... !'

बदलत्या काळानुसार ,पूर्वी
मुलीच्या सासरी पाणीही न पिणारे
आई वडील आता मोकळेपणाने तिच्या घरीही ये जा करू लागले.
त्यांना जर तिच्या सासरची मंडळी चांगली वाटली तर तिच्या आईच्या
मनात मुलीचा संसार मोडावा अशी इच्छा उगीचच का निर्माण होईल... ?असा विचार कोणीच केला नाही.

आजकाल मुलींना जर वेगळा
संसार थाटायचा असेल तर त्या शक्यतोवर आईच्या घराजवळच
घर घेतात....कदाचित त्या असा विचार करत असतील की
'पुढेमागे बाळ झाल्यावर त्याला
हक्काने आईकडे ठेवून
आपल्याला नोकरीवर जाता
येईल..सासू-सास-यांकडे ठेवून
जायचं तर तेवढा मोकळेपणा वाटणार नाही.'

पण मला नाही वाटत की 'मुलींच्या आया,' त्यांना आपल्या
जवळच घर घ्यायचा सल्ला देत असतील. उलटपक्षी, "मुली आपल्यावर स्वतःच्या बाळांना टाकून बिनधास्त नोकरीवर जातात '' हे ब-याचशा आयांना
कठीणच वाटत असेल. मोठ्या वयात नातवंडांना सांभाळणं
त्यांना झेपतही नसेल.पण 'आपलेच दात आणि आपलेच ओठ'...मग सांगणार तरी कोणाला.....?

पण या सगळ्याचं खापर मात्र मुलीच्या आईच्या डोक्यावर फोडलं जाऊ लागलं..."सून घरात काम करत नाही...तिची आई जबाबदार...सून सकाळी लवकर उठत नाही..तिच्या आईचीच चूक.
मुलाने आणि सुनेने वेगळा संसार थाटायचा ठरवलं.. तिला तिच्या आईचीच फूस..म्हणजे सुनेची कुठलीही गोष्ट पटली नाही किंवा पसंत पडली नाही तर त्याला सुनेची आईच जबाबदार.

पूर्वीच्या काळी जशी कोणतीही सासू म्हटली की ती कजागच असणार असं मानलं जायचं, तसंच आता सुनेची आई म्हणजे 'खलनायिकाच' असणार असंच गृहीत धरलं जातं.

खरं तर ,' तर सासू म्हटल्यावर
ती खाष्टच असते ' किंवा
सुनेची आई आपल्या मुलीला
'चुकीचेच सल्ले देत असते " यापैकी कोणतंही विधान हे 'त्रिकालाबाधित सत्य नाहीच
असू शकत.

अगदी पूर्वीच्या जमान्यातही,
सुनेला लेकीसारखी माया देणाऱ्या
कित्येक सासूबाई असतीलच की!
आणि आजकालच्या तर बहुतेक सर्वच सास्वा सुनांशी खूपच छान
वागतात त्यांना सांभाळून घेतात.
कधी मुलगा आणि सून यांचं भांडण झालं तर सुनांची बाजू
घेऊन आपल्या मुलांनाही चार शब्द सुनावतात,हे जितकं खरं आहे ना

तितकंच 'आजकाल मुलींच्या आया वाईटच असतात... हल्लीच्या मुलींच्या आया त्यांचे कान भरतात...त्यांना वेगळं व्हायला उद्युक्त करतात... सासरच्या मंडळींबद्दल त्यांचं मन कलुषित करतात...!' असा निष्कर्ष काढणंही चुकीचं आहे.

असं कशासाठी करतील त्या..?
त्यांना देखील आपल्या मुलीचा संसार आनंदात चालला आहे, हे पाहायला आवडतच असेल ना?
त्यामुळे त्या देखील मुलींना सासरी चांगलं वागायची,सासू-
सास-यांचा मान राखायची
शिकवण देतच असतील की. हल्ली तर ब-याच ठिकाणी
विहिणी-विहिणी एकमेकींच्या
सख्ख्या मैत्रिणी झाल्याचंही आढळून येतं.

तेव्हा एक गोष्ट सर्वांनीच समजून
घेतली पाहिजे,की मुलींच्या आया "त्यांचा संसार तोडणा-या असतात" असंही नव्हे आणि मुलांच्या आया "त्यांच्या संसारात
भांडणं लावून देतात"असंही नव्हे.

आपल्या मुलांचा संसार सुरळीत
आणि सुखासमाधानात व्हावा...
आपल्या नातवंडांच्या वाट्याला
आई- वडील दोघांचंही भरपूर प्रेम
मिळावं..दोन्हीकडच्या आजी
आजोबांची माया मिळावी..आणि त्यांना एक छान..सुरक्षित..आनंदी
असं बालपण मिळावं ,अखेर हीच
तर दोन्हीही बाजूंची इच्छा असणार....खरं की नाही...!!!

मंगला खानोलकर

Address

A/6,Amrut Sai Plaza Station Road Silk Mill Colony Area Opp Railway Godown
Aurangabad
431005

Opening Hours

Monday 11am - 1pm
5pm - 8pm
Tuesday 11am - 1pm
5pm - 8pm
Wednesday 11am - 1pm
Thursday 11am - 1pm
5pm - 8pm
Friday 11am - 1pm
5pm - 8pm
Saturday 11am - 1pm
5pm - 8pm

Telephone

+919823966616

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chitanya Vadhuvar Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chitanya Vadhuvar Kendra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram