Yashwantrao Jadhav Memorial Hospital Beed

Yashwantrao Jadhav Memorial Hospital Beed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashwantrao Jadhav Memorial Hospital Beed, Hospital, YJM hospital and research centre Shahunagar Beed, Beed.

26/04/2026
22/02/2024

यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बीड येथे मोफत प्रोस्टेटच्या ऑपरेशन झालेल्या रुग्णाचा अभिप्राय.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9423919909

आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन अरोग्य योजना अंगीकृत यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च...
28/11/2023

आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन अरोग्य योजना अंगीकृत यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, सम्राट चौक, शाहूनगर,बीड यांच्यावतीने जिजाऊ हॉस्पिटल ढेकनमोहा ता.जि.बीड येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 38 रुग्णांना मोफत तपासणी व मोफत गोळ्या- औषधी देण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे सर,सय्यद सर, आरोग्य मित्र गोरे सर यांचा सत्कार करण्यात आला.

08/11/2023

बीड शहरातील पहिले बालरोगतज्ज्ञ उच्च विद्याविभूषित (एम.डी.बोलरोग)अत्यंत साधे राहणीमान आणि ऊच्च विचारसरणी तसेच शुद्ध आचार,शुध्द विचार,निष्कंलक चारित्र्य,सदैव कार्यमग्न,चिंतनशीलता या पंचसूत्रीचा आपल्या जीवनात सातत्याने पालन करणारे सत्यमेव जयतेचे खरेखरे पुरस्कर्ते प्रभू रामचंद्राच्या सत्यवचनासारख्या अवघड व्रताचे आजच्या युगामध्ये देखील अनुपालन करणारे आणि आपल्या आईवडीलांनी ठेवलेल्या "सत्यवान" या नांवाचा सार्थ अभिमान ठेवून त्याप्रमाणे नावलौकिक मिळवणारे डॉक्टर तथा आमच्या वडीलभावासमान असणारे बीड जिल्ह्यातील प्रतिथयश जेष्ठ आणि श्रेष्ठ बालरोगतज्ज्ञ म्हणजे आमचे डॉ.सत्यवान जाधव सर..! सरांचा आज जन्म वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना आमच्या कडून लक्ष लक्ष शुभेच्छा व अभिनंदन..! सदैव हसतमुख राहून बालरुग्णाची सेवा करून अनेक गंभीर व क्लिष्ट आजाराचे आपल्या वैद्यकीय ज्ञानानुसार योग्य निदान करून अनेक बालरुग्णांना जीवदान देवून प्रत्येक बालकांच्या चेहऱ्यावरील "आसू" मिटवून "हासू" फुलवून बालकांना रोगमुक्त करून सर्व नातेवाईक आणि आईवडीलांच्या चेहऱ्यावर देखील हासू फुलवून तान नाहीसा करणारे तसेच गोरगरीब पिडीत वंचित बालरूग्णासाठीचे त्याकाळातील जिल्हा रुग्णालयाचे सर्वेसर्वा "मसिहा"होते हे आज मला येथे मोठ्या अभिमानाने सांगितले पाहिजे..!
रुग्ण सेवेच्या व्यतिरिक्त सरांना वाचनाची प्रचंड आवड आहे ते सतत आपल्या फावल्या वेळात विविध विषयांच्या पुस्तकाचे त्यामध्ये विशेषतः कथा कादंबरी, पु.ल.देशपांडे वि.वा शिरवाडकर,रंजित देसाई,प्र.के.अत्रे, विश्वास पाटील,अशा नावाजलेल्या लेखकांची विविध प्रकारचे पुस्तके त्यांनी वाचनालयातून घेऊन वाचलेली आहेत आजच्या मोबाईलच्या काळातही त्यांनी आपला वाचनाचा छंद जोपासला असुन आजतागायत त्यात खंड पडलेला नाही ही खरोखरच आजच्या नवीन पिढीला आवर्जून सांगण्यासारखी विशेष बाब आहे असे मला वाटते..!
बीड जिल्ह्यातील त्यांनी आय.ऐ.पी.चे अध्यक्ष म्हणून मानाचे स्थान भुषवलेले आहे तसेच आय.एम.ए.चे सुध्दा अध्यक्ष स्थान भूषवून आपल्या नेतृत्वाची आगळीवेगळी छाप उमटवली आहे..!त्यांनी आजपर्यंत विविध माध्यमातून केलेली समाजसेवा,रुग्णसेवा, तसेच सामाजिक बांधिलकीच्या सेवेला चंपावती नगरीतील सुजाण नागरीक कदापिही विसरू शकणार नाही अशा हसतमुख उत्साही,आनंदी राहणाऱ्या डॉ सत्यवान जाधव सरांना दिर्घायुरारोग्य लाभून त्यांनी आपली बालरुग्णाची सेवा तसेच आपले आवडते छंद सदैव जोपासून लोकजागृती आणि लोकसेवा अविरतपणे करीत राहावी हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून पुनश्च एकदा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन..!💐🎂
डॉ. राम देशपांडे
बालरोगतज्ज्ञ बीड

16/04/2023

दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व बडजाते हॉस्पिटल शिरूर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन बडजाते हॉस्पिटल शिरूर येथे करण्यात आले होते.यावेळी यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल बीड चे अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिनव जाधव सर यांचा डॉ.बडजाते परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. डॉ.जाधव यांच्या शिबिराच्या उपस्थितीबद्दल डॉ.रमणलाल बडजाते यांनी आभार मानले. यावेळी हाडांच्या आजाराचे एकूण 95 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

Address

YJM Hospital And Research Centre Shahunagar Beed
Beed
431122

Telephone

+919689625194

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao Jadhav Memorial Hospital Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yashwantrao Jadhav Memorial Hospital Beed:

Share

Category