06/07/2023
। गुरुंचा आशीर्वाद।
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा।इतरांचा लेखा कोण करी।
आज आषाढ वद्य चतुर्थी(संकट चतुर्थी)या शुभमुहूर्तावर शुभयोगे,व माझ्या जिवनातील एक अविस्मरणीय दिवस..! आमच्या "रमाई हाँस्पीटल" व आमचे राहते घरी प्रत्यक्ष आमचे दैवत,गुरु असलेले गुरुमाऊली ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी भेट देऊन आमचे हाँस्पीटल व राहते घराला त्यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत करून आम्हाला शुभाशीर्वाद दिले...!हा आमच्या सर्वांसाठी अत्यंत शुभ व महान योग श्री गणपती व श्री.गजानन महाराज यांच्या क्रुपाशिर्वादाने आला असे मला मनोमन वाटत आहे..!
माझ्या मनामध्ये अत्यंत प्रामाणिक पणे ईच्छा होती की,आपल्या गुरुंचे (संताचे) पाय आपल्या घरी लागावे परंतु ह.भ.प.श्री चैतन्य महाराजांच्या व्यस्त शेड्यूल मध्ये आपला नंबर लागतो का नाही याबाबत मी साशंक होतो.. म्हणून मी माझ्या मनामध्ये मनापासून प्रार्थना केली की महाराज मला असे वाटत आहे की,तुम्ही आमच्या घरी यावे..!व तसा माझ्या मनातील विचार घेवून मी थोरले पाटांगण येथे वै.धुंडीराज महाराज पाटांगणकर यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या त्रिदिवसीय संत रामदास्वामींचा दासबोधातील ब्रम्हनिरुपण समासातील प्रवचन मालिकेसाठी ह.भ.प.श्री चैतन्य महाराज देगलूरकर आले होते,व त्यानिमित्ताने मी प्रवचन श्रवण करून महाराजांचे दर्शन घेतले व माझ्या मनातील ईच्छा त्यांना सांगितली आणि काय आश्चर्य! या मनीचे त्या मनी म्हटल्याप्रमाणे त्यानी मला होकार दिला..!आणि आज सकाळी आमचे गुरुबंधू वर्गमित्र,तथा महाराजांचे अत्यंत घनिष्ट शिष्य श्री रामराजे राक्षसभुवनकर यांचा मला सकाळी सात वाजताच फोन आला की महाराज आपल्या घरी येऊ इच्छित आहेत मग काय माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही मी इतका आनंदुन गेलो की मला माझाच विश्वास वाटत नव्हता की माझी प्रामाणिक इच्छा संतांनी ऐकली व जानली..! व ते माझ्या घरी येण्यासाठी तयार झाले..!हा दैवयोगच माझ्यासाठी म्हणावा लागेल..!प्रवचनासाठी "ब्रम्ह निर्गुण निराकार। ब्रम्ह निःसंग निर्विकार।ब्रम्हास नाही पारावार। बोलती साधु.।।" याची प्रत्यक्ष अनुभूती यापेक्षा वेगळी ती माझ्यासाठी काय असू शकते..!ही माझ्या मनीची भावना,ईच्छा फक्त संत आणि साधुच जाणवू शकतात याची मला साक्षात आज प्रचितीच आली आहे..!आणि माझी श्रद्धा आणि भक्ती द्विगुणितच नाही तर शतगुणित झाली आहे असे मला नम्रपणे वाटत आहे..!व त्याबद्दल मी श्री चैतन्य महाराजांना साष्टांग दंडवत करीत आहे..!साधु संत येती घरा तोचि आम्हासाठी दिवाळी दसरा..!या संतांच्या अभंगाची आज जाणीव झाली व आमचे घर मित्रपरिवार नातेवाईक यांनी आज संतांच्या आगमनाने व पावन पदस्पर्शाने व दिव्य दर्शनाने अक्षरशः दसरा दिवाळीचाच आनंद सोहळा साजरा करून महाराजांच्या शुभाशीर्वादाने पावन झाल्याची भावना मनोमनी होउन आम्ही सर्व जन आज क्रुतक्रुत्य झालो आहोत..!
प्रवचनाचा विषय परब्रह्म आहे..! माझी इतका गहन विषय समजण्याची पात्रता नाही परंतु माझ्या सरळ साध्य स्वच्छ मनाला असे वाटते की,"आजी मी ब्रम्ह पाहिले।आज मी ब्रम्ह पाहिले।"आणि हा आधिकार फक्त आणि फक्त गुरूंचाच आहे..!(बोलती साधू..।) त्यामुळे मी त्यांच्या चरणी अत्यंत लिनतेने नतमस्तक होतो..!
गुरु परमात्मा परेशु।ऐसा ज्याचा द्रुढविश्वास..। श्री गुरूंच्या चरणी सा.दंडवत करतो..!🙏