15/11/2025
यशवंत पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मान्यता...!!!!
आ. श्री बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न...!!!!
नांदेड – प्रतिनिधी
येथील युनिक एज्युकेशनल कॅम्पस, शाहीन अकॅडमी जवळ, वाघीरोड, नांदेड येथे एक दर्जेदार शैक्षणिक संकुल यशवंत पॅरामेडीकल कॉलेज संकुलास महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची मान्यता मिळाली असून आता कॉलेज हे एमएसबीएसव्हीईटी (MSBSVET) बोर्ड च्या पॅनलवर आलेले आहे. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता पीएमसिआय (PMCI) महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सलिंग मध्ये नोंद करता येऊ शकते. यशवंत पॅरॉमेडीकल कॉलेजचे उद्घाटन हे नांदेड उत्तर चे आ.बालाजी कल्याणकर यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे
यावेळी ते म्हणाले की , वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या पॅरामेडीकल शाखेचे विद्यार्थी घडविण्याचे मोठे सामाजिक कार्य होणार आहे याठिकाणी मी, वाघी रोड हसापूर येथे यशवंत पॅरामेडिकल कॉलेजच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आलो. कॉलेजला महाराष्ट्र शासनाचे मान्यता मिळाली. महाराष्ट्र शासन कौशल्य,रोजगार, उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघात असलेल्या कॉलेजला माझ्या विनंतीला मान देऊन मान्यता दिली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
तसेच नांदेड मतदारसंघातील पालक वर्ग, व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, यशवंत पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली असून वैद्यकीय क्षेत्र हे नांदेडमध्ये व्यापून भरलेला आहे वैद्यकीय क्षेत्रात अनंत नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत तरी विद्यार्थ्यांनी यशवंत पॅरामेडिकल मेडिकल कॉलेज येथील कोर्सेस चा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी बोलतांना केले
पिएमसीआय (PMCI) मध्ये नोंद म्हणजे शासकीय नोकरीची सुवर्णसंधी..!!
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागात,उदा. रेल्वे हॉस्पिटल , सुरक्षा दले, विमानतळ , पोर्ट, महानगरपालिका, नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र या सारखे सरकारी दवाखाने, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज , शासकीय हॉस्टेल अशा विविध विभागात शासकीय नोकरीसाठी पात्र ठरतो.
प्रवेशासाठी उपलब्ध कोर्सेस व पात्रता ..!
1. डिएमएलटी. लॅब टेक्नीशिएन
ü कालावधी २ वर्षे
ü पात्रता 10 वी पास
ü शासनाच्या विविध विभागात लॅब टेक्निशियन या पदांकरिता भरतीस पात्र कोर्स.
ü क्लिनिकल लॅब सुरु करता येते.
2. हेल्थ सॅनिटरी ईन्सपेक्टर…
ü कालावधी १ वर्षे
ü पात्रता १० वी पास
ü नगर पालिका, रुग्णालये, विद्यापीठ, विमानतळ, पोर्ट, रेल्वे आदि विभागात नौकरीची संधी
संपर्क:- यशवंत प्यारा मेडिकल कॉलेज, शाहीन अकॅडमी जवळ, वाघी रोड, नांदेड. शाहीद सर, शुभम सर, डॉ. नौशिन मॅडम . 7057981987