01/07/2025
२१ वर्षांची शुद्ध आयुर्वेद सेवा — एक विश्वासाची वाटचाल
शुद्ध आयुर्वेदिक औषध, पंचकर्म आणि योग यांचा आधार घेत, गेली २१ वर्षे आम्ही श्रीविश्वाई आयुर्वेदीय चिकित्सालय – पंचकर्म व योगोपचार केंद्र, चिखली येथे रुग्णसेवा अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने करत आहोत.
पोटाचे विकार,मधुमेह, संधिवात,आमवात,पाठीच्या मणक्याचे आजार, त्वचाविकार,केसांच्या समस्या,सौंदर्याच्या समस्या, अॅलर्जी, हार्मोन बिघाड(PCOS, Thyroid), स्त्रीयांचे विविध आजार,वंध्यत्व, गर्भ संस्कार,लहान मुलांचे आजार,सुवर्ण प्राशन संस्कार, व्यसनमुक्ती चिकित्सा व समुपदेशन, मानस आजार
यांसारख्या जटिल आजारांवर नैसर्गिक, सुरक्षित व मूळ कारणांवर उपाय करणारी चिकित्सा हीच आमची खासियत आहे.
आमचा विश्वास आहे – "रोग बरा करणे हेच नव्हे, तर रोग न होऊ देता संपूर्ण आरोग्य देणे हीच खरी चिकित्सा आहे."
म्हणून आयुर्वेदीय स्वास्थवृत्त(दिनचर्या, ऋतूचर्या,जेवण-पाणी- व्यायाम- निद्रा,आचार रसायन इत्यादी) बद्दल तसेच
योगोपचार( यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान),बद्दल सतत जण जागृती करणे त्यांना जण सामान्य पर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही निरंतर करत आहोत.
हीच प्रेरणा घेऊन, आम्ही आयुर्वेदाचा शुद्ध आणि प्राचीन आत्मा जपण्याचा प्रयत्न केला आहे — आणि रुग्णांचा वाढता विश्वास हीच आमची खरी पावती आहे.
२१ वर्षांच्या या सेवेस प्रवासाला तुमच्या विश्वासाची साथ लाभली — त्याबद्दल मनापासून आभार!