05/04/2025
रविवारी पाडव्याच्या सुमुहूर्तावर आरोग्यम् लॅबोरेटरीचा स्थलांतर सोहळा पार पडला. आमच्या आधीच्या जागेच्या बरोबर समोर रस्त्याच्या पलीकडे अतिशय सुंदर, प्रशस्त आणि हवेशीर जागा मिळाली.
आ. शेखर निकम सर व आ. भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार रमेश भाई कदम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह चिपळूणातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर्स, मित्रपरिवार नातेवाईक व हितचिंतक ह्या सर्वांनी सोहळ्याला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या. मीराताई पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांच्या नेहमीच्या नीटनेटक्या शैलीमध्ये केले. मा. श्री शेखर सर व मा. श्री भास्करशेठ दोघांनाही लॅब खूप आवडली. कोकणातील एक उत्तम आणि अद्ययावत सुविधा असे त्यांनी लॅबचे कौतुक केले. भाषणांमधूनही त्यांनी मी, अश्विनी, माझे आई-बाबा तसेच आरोग्यमच्या सर्व कर्मचारी वर्गाबद्दल गौरवोद्गार काढले.
चिपळूण मध्ये गेल्या 16 वर्षांचा व्यावसायिक प्रवास एखाद्या roller coster ride प्रमाणे होता. परंतु पेशंट्सचा विश्वास, सर्व डॉक्टरांचा पाठिंबा आणि मित्रमंडळी, स्नेहीजन यांच्या मदतीमुळे प्रत्येक वेळेस आम्ही संकटांमधून तावून सुलाखून निघालो. नवीन लॅबच्या प्रशस्त, वातानुकूलित जागेमध्ये आम्ही आता Histopathology (बायोप्सी/cancer testing), मायक्रोबायोलॉजी (Bactec blood culture), बायोकेमिस्ट्री, immunoassy (hormones, vitamins, cancer markers) आणि haematology (7 part cell counter with auto loader) ह्या शाखांमधील अद्ययावत तंत्रज्ञान व यंत्रसामग्री इन्स्टॉल केली आहे. ह्या मशीन्सच्या तसेच आमच्या well qualified staff च्या मदतीने आम्ही आमच्या सेवा अधिक जलद गतीने, अधिक अचूक आणि पेशंटला अधिक आरामदायक पद्धतीने देऊ शकू. हा सर्व विस्तार करताना आम्ही आमच्या तपासण्यांचे दर एक रुपयाने सुद्धा वाढवलेले नाहीत. आमच्या सेवांचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना घेता यावा हा यामागील हेतू आहे.
नावाजलेले आर्किटेक्ट श्री संदीप मोरे सर यांनी अत्यंत कौशल्याने आमच्या स्वप्नातील लॅबोरेटरीला मूर्त स्वरूप दिले. नवीन जागेमध्ये लिफ्ट व पार्किंगची सुविधा असल्यामुळे पेशंटचा convenience वाढेल असा आमचा विश्वास आहे. यापुढेही आपले आमच्यावरील प्रेम व विश्वास असाच कायम ठेवून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन मी यानिमित्ताने सर्व पेशंट आमचे मित्र डॉक्टर्स आणि हितचिंतक यांना करत आहे.
डॉ. अश्विनी गणपत्ये
डॉ. तेजानंद गणपत्ये
आरोग्यम् staff