
19/11/2024
*"जप असा करावा.... सेवा अशी असावी .. जी स्वामीपर्यंत पोहोचते"......*
मिराशी आजींनी डोळे पुसून माळ पिशवीत ठेवली.डोळे मिटून नमस्कार केला व हातावर भार देऊन उठल्या.सांधेदुखीनं लवकर उठता येत नव्हतं..अन् तेथील सर्वजणांचा निरोप घेऊन बाहेर पडल्या..!
थोड्यावेळानं स्वामींच्या मठातून चौघीजणी बाहेर पडल्या.एकमेकींचा थोड्यावेळ निरोप घेण्याआधी पाराखाली उभ्या राहिल्या...!
"मिराशी आजींना काही करायला नको..नुसती माळ जपायची आणि जायचं "एकजण म्हणाली....
"बरोबर आहे.......!!
"प्रसाद असतो त्यावेळीही भाजी निवडतात,पण नंतर..
स्वयंपाक शिजेपर्यंत लक्ष नाही... सगळं आपणच करायचं..!
या समितीवर त्यांना घेऊ नका असं मी आधीच सांगितलं होतं..?
" दुसरी म्हणाली.
"नाहीतर काय ..!
पण काय करणार..?
"ज्यांनी मंदिर उभं केलं त्यांची कन्या ना.!!
..बरं म्हणून अगदी काडीलाही हात लावायचा नाही का....?
" पहिली म्हणाली..
"त्यांना सांधेदुखी आहे गं..वयही जास्त आहे..,
ते पहा की...!
नेहमी का नावं ठेवायची..?
तिसरी मधेच म्हणाली...
"झालं का तुझं सुरु..?
तुला खुप पुळका आहे...!
आपलंही वय पंन्नाशीला टेकलंय नं...?
करतोच न आपण *"स्वामीसेवा"*........?
रोज सतरंजी घाला..आरती ,पूजा...!
स्वामींची सर्व सेवा आपणच करतो...!"
दुसरी म्हणााली...
"जाऊ दे गं..स्वामींना आपली सेवा रुजू होतेय ना..?
मग बस झालं..
मिराशी आजींना कशाशीही देणं घेणं नसतं....माळ जपायची..,
ती पण
एकच...?
झालं..मग *"अश्रूधारा"* सुरु.....!!"
चौथी म्हणाली...
त्यावर तिघी हसल्या.
"नाटकं नुसती "
पहिली मान उडवत म्हणाली..!
"चला गं निघूया "
पहिली म्हणताच,सगळ्या चप्पल स्टँडंपाशी वळल्या..
त्यांना मोठ्याने खळाळुन हसण्याचा आवाज आला.......
त्या सर्वजणींनी वळून पाहिलं..
समोरील कदंबाच्या वृक्षाखाली एक अतिशय वयस्कर उंचपुरे गृहस्थ बसले होते.
पांढरी शुभ्र दाढी..डोळे निळसर झाक असलेले....
मान वृद्धत्वानं किंचीत हलतेय....
त्यांचं लक्ष वटवृक्षाच्या फांद्यांकडं...ऊर्ध्वदृष्टी..
ते हसतच होते..व पुटपुटत होते...
*"हं...*
*काम करत नाही.. नुसती माळ ओढते.....*
*बिनकामाची नुसती बाहेरुन.....*
*"आंत" मात्र तयार.....! मोत्यांचा सर जणु.....*
*"मायमाझी"*
ह्याचा अर्थ कुणालाही कळला नाही. चौघी एकमेकींकडं पहात राहिल्या.
तिघींना राग आला..
पण
एकजण त्या बाबांपाशी गेली म्हणाली...
"आजोबा तुम्ही बोलणं ऐकलंत आमचं..?
तुम्ही काय बोलताहेत..?
आणि हसायला काय झालं...?
तुम्हाला काय माहिती आहे मिराशी आजींबद्दल...?"
त्या गृहस्थांनी तिच्याकडं पाहिलं नाही...!! आणि ते म्हणाले.....
*"सोनं आहे ..सोनं".....*
*"लख्ख चकाकणारं" सोनं..*
*लोकं मूस पाहताहेत....*
"असं म्हणून ते पुन्हा हसायला लागले...
मग मात्र ती स्त्री त्यांच्यापाशी बसली... बाकीच्या तिघींनी तिला हाका मारल्या..
वेड्यासारखं काय करते म्हणून...... चल लवकर वेळ होतोय ,त्यांच्या नादी नको लागूस..असं म्हणत त्या चप्पल घालून लांब जाऊन बसल्या....
"आजोबा..मी अज्ञानी आहे.मला सांगा नं अर्थ "...?
तिनं आर्जवतेनं विचारलं....
*"तुमच्या मिराशी आजी..बिनकामाच्या नाही...!! ...*
*रोज जप करतांना मनानं "अक्कलकोटला" येते....*
*स्वामींचं मस्तक मांडीवर घेते..आणि डोक्यावर हांत फिरवत म्हणते.....* - "माझ्या बाळाला सगळं सहन करावं लागतं. प्रापंचिक कामंच घेऊन येतात लोकं......?
नाही झाली तर बोलतात..तुमच्यामुळं नाही झालं......
आणि काम झालं तर विसरुन जातात....?
दिवसभर वणवण करतं बाळ माझं..
कोणाकडून अपेक्षा नाही...
थकतं.....
पण,,,
पण कुणीही त्याला कुशीत नाही घेत...
कितीही थकलास म्हणून.....
कुणी आजोबा म्हणतं...
कुणी आई...तरीही लांबच ठेवतात..!!
म्हणूनच
म्हणलं......
*"मायमाझी"..!!"*
हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं ..आणि शेवटच्या शब्दानं अंगभर कंपित झाली.....
*"मायमाझी....? "*
तोपर्यंत ते आजोबा ऊठले...आणि..
गतिमानतेनं चालू लागले..
तिनं अंत:करणापासून हांक मारली.....!
*"स्वामी"* ssss ..!!"
त्यांनी एकदाच वळून पाहिलं.....
आणि
*..त्यांचे डोळे तेजानं झळाळून गेले.....अन् ती मूर्ती डोळ्यासमोर अदृश्य झाली.....!!*
ती त्या ठिकाणी उमटलेल्या *"पाऊलखुणांवर"* कोसळली...!!!!
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
🔱जयशंकर🚬🚬🚬आदेश🌹🌹🙏🌹🌹🚩