03/03/2023
आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की दि. 26.02.2023,रविवार या दिवशी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. चिन्मय बने ह्यांच्या
" विहाय नेत्रालय ", डोंबिवली (पश्चिम) चा भव्य शुभारंभ उत्साहात आणि ऐश्वर्यात संपन्न झाला. या प्रसंगी एक निवृत्त नौदल सैनिक व नंतर 35/40 वर्षे अथकपणे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी निरपेक्ष बुध्दीने कार्यरत असलेले, त्यांच्या मुलांना व समाजातील इतरही गरीब मुलांना शिक्षण व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे, सैनिक भरती सारख्या विषयावर ठिकठिकाणी मार्गदर्शन करुन तरुणांना देशसेवेत जाण्यास उद्युक्त करणे, NDF साठी निधी संकलन करणे असे बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले, डोंबिवली भूषण, महाराष्ट्र भूषण आणि यावर्षी सन्माननीय राष्ट्रपती महोदयांकडून " पद्मश्री " या उच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्री. गजाननराव माने यांच्याकडून फीत कापून नेत्रालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या मंगल प्रसंगी
1) रोटरी क्लब डोंबिवलीचे फाऊंडर प्रेसिडेंट आणि उद्योजक डाॅ राजेश कदम ,
2)डोंबिवलीतील ख्यातनाम बिल्डर व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे विद्यमान प्रेसिडेंट श्री. संजय कागदे ,
3)मैत्री फाऊंडेशनचे फाऊंडर प्रेसिडेंट डाॅ मालिनी नाडकर्णी , 4)प्रचेत पॅथॉलॉजी चे डायरेक्टर डॉ निलेश पाटील,
5) सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ हेमराज इंगळे आणि डॉ. मृदुला इंगळे ,
6)श्रीकला संस्कारच्या संचालिका आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या राणा प्रताप शाखेच्या माजी प्रिन्सिपॉल श्रीमती दिपाली काळे, तसेच 7)श्रीमती भाग्यलक्ष्मी पडसलगीकर व भारती गांगुर्डे, 8)ब्रॅकोझिन या बॅटरी इंडस्ट्रीची मशीनरी मॅन्युफॅक्चर्स श्रीमती मीरा कर्वे,
9)रेशो इलेक्ट्रॉनिक्सचे मालक श्री. मनोज क्षीरसागर
10) ब्रम्हांड नेचरोपथीचे डायरेक्टर श्री. कृष्णा कदम हे मान्यवर उपस्थित होते.
11)शिवाय TIFR च्या डेंटल डिपार्टमेंटचे HOD डाॅ विलास पवार , ज्यांना जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू श्री. वामनराव पै यांचे डेंचर बनविण्याचे सद्भाग्य मिळाले,
12)तसेच जीवनविद्या मिशनचे सचिवपद सर्वात जास्त काळ भूषवणारे उद्योजक व फायनान्शियल ॲडव्हायझर, या वर्षी चे जीवनविद्या मिशनचे जीवनगौरव पुरस्कार सन्मानित श्री. विश्राम पवार, ,कल्पतरू क्रियेशनचे ओनर वJVM चे धडाडीचे युवा कार्यकर्ते श्री. सचिन पवार,
13)JVM चे अनुभवी विश्वस्त श्री. दशरथ शिरसाट,
14)विद्यमान विश्वस्त आणि भारत बिजलीचे निवृत्त डायरेक्टर श्री. बन्सिधर राणे, JVM चे प्रबोधक श्री. प्रकाश कदम व श्री. प्रकाश भोगटे , श्रीमती रेगे काकी हे जातीने उपस्थित होते.
या प्रसंगी JVM चे नामधारक व बाहेरील मिळून जवळ जवळ 180 लोकांनी "विहाय नेत्रालय" चे अभिष्टचिंतन केले. शुभ आशिर्वाद दिले.
JVM च्या नामधारकांनी अतिशय सुरेल आवाजात सद्गुरू भावात उपासना यज्ञ केला. त्यानंतर श्री. राणेकाकांचं अतिशय सुंदर रसाळ आणि जीवन विद्येची ओळख करुन देणारे ज्ञानाच्या अमृतवर्षावात चिंब भिजवून टाकणाऱ्या प्रबोधनाने तर कार्यक्रमात कळस गाठला. सर्व वातावरणात भाव उचंबळून आला. सद्गुरू स्मरणात भक्तीचा मळा फुलला.सर्व भारावून गेले.
त्यानंतर मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आले. नंतर अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखेच्या अध्यक्ष श्री. भावेश कचरे व सचिव सुमित शिगवण आणि युवा कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून संगीत वाद्यं इतर सामग्रीची व्यवस्था केली. भावेश कचरे यांनी अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन केले. यासाठी या सर्वांची विहाय नेत्रालय मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. तसेच लीना परब, शामसुंदर परब, पूजा जांभळे यांनीही अतिशय मोलाची अशी मदत केली. त्याबद्दल त्यांचे हृदयापासून आभार.सर्व कार्यक्रमाचे चित्रिकरण करणारे श्री. प्रकाश चितळे व श्री योगेश दळवी यांचे आभार तर मानलेच पाहिजेत कारण त्यांच्या मुळेच हे सुंदर क्षण कायमस्वरूपी जतन होणार.
आपल्या आयुष्यातील काही अमूल्य असा काळ मनःपूर्वक दुसऱ्याला देणं यासारखी मोठी व सुंदर भेट दुसरी असूच शकत नाही. अशी अनमोल भेट आपण सर्वांनी 26.02.2023 ला संध्याकाळी 5.00 ते 9.30 पर्यंतच्या कालावधीत आम्हाला प्रदान केलीत. यासाठी "विहाय नेत्रालय" आपले सदैव ऋणी राहिल. या भेटीची अमिट छाप विहाय नेत्रालय च्या पुढील वाटचालीसाठी ठसठशीत पणे कोरली गेली आहे. या सर्व सुंदर भेटीसाठी आपल्या सर्वांची खूप खूप कृतज्ञता आम्ही व्यक्त करताना आपल्या पुढील भेटीसाठी आशा व्यक्त करत आहोत.
कृतज्ञता! कृतज्ञता!! कृतज्ञता!!!
सद्गुरू माऊली आणि माई माऊलींच्या चरणी, प्रह्लाद दादा मिलनताईंना कोटी कोटी वंदन.