Bhargava Liver and Digestive Diseases Clinic

  • Home
  • Bhargava Liver and Digestive Diseases Clinic

Bhargava Liver and Digestive Diseases Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhargava Liver and Digestive Diseases Clinic, Medical and health, .

01/02/2023
गंधर्व speaks जोशी काका - डॉक्टर, मला गेल्या 5 वर्षांपासून अल्सरेटिव्ह कोलायटिस चे निदान झाले आहे. सुरुवातीला चमचाभर नंत...
19/12/2022

गंधर्व speaks

जोशी काका - डॉक्टर, मला गेल्या 5 वर्षांपासून अल्सरेटिव्ह कोलायटिस चे निदान झाले आहे. सुरुवातीला चमचाभर नंतर अर्धी वाटी असे शौचाबरोबर रक्त जायचे.मग कधी रक्तमिश्रित आव जायची.खूप त्रास व्हायचा. अधूनमधून पोटात पीळ बसल्याप्रमाणे दुखत राहते. मग पीळ सुटला की बरे वाटते. निदान होण्याआधी वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहिले पण फारसा उपयोग व्हायचा नाही. इतरही अनेक औषधोपचार केले. पूर्वी बऱ्यापैकी गुटगुटीत शरीरयष्टी असणारा मी आता फारच बारीक झालोय. फार निराशा येते. यांवर काही उपाय आहे का? मी पूर्वीसारखा होईन का?

गंधर्व(आयुर्वेद तज्ज्ञ) - काका, अल्सरेटिव्ह कोलायटिस या व्याधीचे नैदानिक दृष्ट्या आंत्राच्या कोणत्या स्थानी झाला आहे यावरून साधारण 3 प्रकार दिसतात. व्याधीची तीव्रता अत्यधिक असेल तर पूर्ण बृहद् आन्त्र यामध्ये व्यापले जाते ज्याला pancolitis असे म्हणतात. या व्याधीच्या अनुषंगाने काही रक्ताच्या विशिष्ट तपासण्याही व्याधीची तीव्रता पाहण्यासाठी उपयुक्त ठरतात.

जोशी काका - अच्छा. डॉक्टर, हल्ली मला मधूनच खोकल्याची प्रचंड उबळ येते. पण याचे प्रमाण वरचेवर वाढले आहे. या अल्सरेटिव्ह कोलायटिसशी काही संबंध असेल का याचा? पूर्वी असे होत नव्हते.

गंधर्व - नक्कीच संबंध असतो. जशी या व्याधीची तीव्रता किंवा जीर्णता वाढत जाते तसा हा व्याधी केवळ आंत्रापुरता मर्यादित राहत नाही. फुप्फुस, सांधे, डोळे, यकृत यांसारख्या अवयवयांवर त्याचा विशेष परिणाम होतो व तज्जन्य अवयवांची विकृती निर्माण होऊ शकते.

जोशी काका - अच्छा. बरं झाले निदानाविषयी सविस्तर सांगितले ते. पण यावर उपाय काय? हा बरा होतो का?

गंधर्व - योग्य प्रकारे आयुर्वेदीय उपचार केल्यास यामध्ये चांगला फरक दिसून येतो. व्याधी अवस्थेनुसार चिकित्सा करावी लागते. काही वनस्पतिज द्रव्य, रसकल्प, सिद्ध घृत यासारख्या औषधांचा त्यामध्ये उपयोग होतो. स्थानिक चिकित्साही यामध्ये करावी लागते. पथ्यपालनाचा महत्त्वाचा सहभाग यामध्ये असतो.पण याकरिता clinically trained आयुर्वेदीय वैद्याकडून उपचार घ्यावेत.

जोशी काका - नक्की डॉक्टर. मी नक्की याकरिता आयुर्वेदीय उपचाराचा मार्ग स्वीकारेन आणि महत्त्वाचे म्हणजे पथ्यपालनाकडे यापुढे अधिक लक्ष देईन.

वैद्य चिन्मय फोंडेकर

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhargava Liver and Digestive Diseases Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram