13/09/2023
मैत्रीचे २५ वर्ष
खरं सांगायचं तर मला डेंटल कॉलेजच्या २५ वर्ष पूर्णझाल्यानिमित्त गेटटुगेदरला जायची इच्छा नाही होती. पण मोटे म्हटला धवल येतोय ये. आणि धवलला भेटायची संधी गमवायची नाही होती. धवल सद्या आम्ही जे करतोय त्याचा ध्रुव तारा आहे. त्याला आदर्श ठेवून प्रवास करणार तर नक्कीच यशस्वी होणार. मग विचार आला हा येतोय तर तू का मनापासून जात नाही आहेस? काही तरी नक्कीच नाविन्य पूर्ण भेटेल व कोरी पाटी सारखा आलो . या एका विचाराने प्रत्येकाकडून काही तरी घेऊ, शिकण्यासारखे खूप आहे आणि गेटटुगेदरला आलो याचा आनंद जास्त आहे.
धवल आमच्या सोबतच शिकलाय. आता अमेरिकेत डेंटल प्रॅक्टिस करतोय व अवाका इतका मोठा आहे कि " डिजिटल डेन्टिस्ट्री" या विषयावर आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सेमिनार मध्ये स्पीकर म्हणून बोलावले जाते . पैशांच्या भाषेत त्याला काही कंपन्या ७००० अमेरिकन डॉलर पर्यंत एका तासाचे देतात. याचा विषय माझा आवडता टॉपिक. हा आमचाच वर्गमित्र, याच्या मेहनतीवर एक वेगळा लेख लिहता येईल. असे म्हणतात मनापासून तुम्हाला काही हवे असेल तर नक्कीच भेटते आणि योगायोगाने त्याचे लेक्चर ऐकण्याची संधी मिळते तर मला ती कुठल्याही प्रकारचे गमवायची नाही होती. मी बायकोला इतकेच बोललो " धवलचे लेक्चर आहे मी 1 दिवस आधी जातोय. खरे तर त्याला काहीच गरज नाही होती इतक्या लांब यायची आज त्याच्या जवळ सर्व काही आहे. पण व्यक्ती जितका जास्त मोठा होतो तितकाच तो नम्र होतो असं मला जाणवले.संपूर्ण दिवस त्याच्या सोबत घालवला कदाचित त्याला बोर केले असेल पण खूप बारीक सारीक गोष्टी व्यवसायाच्या आत्मसात करता आल्या ज्या टिप्स मिळाल्या त्या वेगळ्याच. त्याचा नम्रपणा , आपल्या विषयातले ज्ञान , हातचे न राखून भरभरून देणे , उंचीवर असूनही कणभर पण नसलेला गर्व. दिवसभरात एकदाही असे वाटले नाही की याला हा जे काही करतोय याचा गर्व आहे. हा आपल्यातलाच एक आहे. नाहीतर फुशारक्या मारणाऱ्यांची काहीच कमी नाही. "परदेशी " पण देशीच आहे. नुसता देशी नाही तर तन मन धनाने पण देशी आहे. खरे तर आम्ही २ तास का असेना त्याचे लेक्चर ठेवायला हवे होते. या माणसांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. जे काही शिकलो, "धन्यवाद" म्हणून ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही.
रूम देताना ठरवले होते जो रूम पार्टनर मिळेल तो घ्यायचा, हा हवा, तो नको असं अजिबात नाही. म्हणून शेवटी सत्यम व नरेश यांच्या सोबत होतो. सत्यमचे अध्यात्मिक रूपचा मी मागच्या गेट टुगेदर पासूनच फॅन झालोय. अध्यात्म माणसाला किती बदलू शकतो ते म्हणजे 'सत्यम '. नरेश सोबत पुन्हा एकदा इंटरशिप नंतर रूम पार्टनर म्हणून अनुभव मिळाला. "दुर्लक्ष करणे" हे आत्मसात केल्याने जीवनाला कशी कलाटणी मिळते हे या माणसापेक्षा कोणीच चांगले सांगू शकत नाही. हा खूपच कमी लोकांसोबत व्यक्त होतो.
मोटे हा आमच्या सर्वंचा जोडून ठेवणारा एकमेव व्यक्ती. मोटे शिवाय आम्ही सर्व एकत्रच येवू शकतो का? याचे उत्तर मला तरी नाही मिळाले.मी जेव्हा कधी ही याला भेटलो मला मोटे अजूनही लोणितच असल्याचे जाणवते व मी पण लोणीत असल्याचे भास होतो. लोणीतून याला वेगळेच करता येणार नाही. या माणसात काही तरी जादू आहे हा सर्वंना आपलासा वाटतो. नुसता वाटतोच नाही तर सर्वांना बांधून ठेवतोय. मोटे, तुझ्या शिवाय हे गेट टुगेदर केवळ अशक्य होते.
विनीत, ओळख आधी पासूनच होती पण या 3 दिवसात या माणसाची डेप्थ नव्याने समझली. इतका शांत, संयमी तोलून बोलणार याच्याशी आधीपासूनच घट्ट मैत्री असायला हवी होती हे आवर्जून वाटले. या दिवसात नवीन "विनितची " ओळख झाली.
विजय हा आहे तसाच आहे शरीराने पण व मनानेपण सादा सरळ. पुन्हा ते कॉलेज मधील दिवस व त्या जुन्या जिमच्या आठवणी जाग्या झाल्या. एकदा पुन्हा तुझ्या सोबत जिम मध्ये जाऊन वोर्कआउट करायची इच्छा अनावर झाली.
मृदला तू गेटटुगेदर साठी घेतलेली मेहनत दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. पप्पू सोबत स्वागत मधील जेवण, विशाखा कडून आयुष्य एन्जॉय करायचे असते, सोनियाचा तोच कॉन्फिडन्स, उज्वला व जमानाची अजूनही किंचितही न बदलेली मैत्री प्रत्येकाकडून काही तरी नावीन्यपूर्ण शिकायला मिळाले. काहींचे नाव घेता आले नसेल पण या वेळी प्रतेकासोबत एन्जॉय केलेय.
क्रांती तुझे नाव घेतले नाही तर कसे होईल? तुझ्या सोबत मारलेल्या गप्पा आपल्या कॉलेज दिवसातील चार वर्षातील निख्खळ मैत्रीची आठवण देवून गेल्या.
ललित तुला भेटायची इच्छा अपूर्ण राहिली. सर्वांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या मस्ती केली. डॉक्टर म्हणून तर प्रघल्भ झालोच पण माणूस म्हणून खूप गोष्टी नव्याने आत्मसात करता आल्या. असं म्हणतात ' दुनियामे दो हि तरह के अच्छे दोस्त होते है एक "क्लास" वाले और दुसरे "ग्लास" वाले.' आठवणींना एक मोठा ठेवा घेवून परत आलो. पुढील बरीच वर्ष हा आठवणींचा ठेवा आयुष्यात शिदोरीसारखा कामात येईल. मनापासून गेलो व एन्जॉय केले. पुन्हा ते कॉलेजचे मंतरलेले दिवस आठवले.