Ichalkaranji Engineering Association

Ichalkaranji Engineering Association Ichalkaranji Engineering Association (IEA) established in the year 1977-78 for the betterment of engineering industry in Ichalkaranji and surroundings.

Today more than 250 active engineering units are members of IEA and are benefitted.

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन येथे स्वर्गीच पंडीतराव दाजी कुलकर्णी ( काका ) यांचे ४ थे पुण्यस्मरणा निमित्त असोसिएशन येथे...
06/07/2024

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन येथे स्वर्गीच पंडीतराव दाजी कुलकर्णी ( काका ) यांचे ४ थे पुण्यस्मरणा निमित्त असोसिएशन येथे फोटो पूजन प्रसंगी उपस्थित मा. श्री. एस. व्ही. कुलकर्णी, श्री. डी.एम. बिरादार, श्री. काशिनाथजी जगदाळे, अध्यक्ष, श्री. विक्रम बुचडे, सेक्रेटरी, श्री राहुल सातपुते, श्री मिलिंद बिरादार संचालक श्री अमोद कुलकर्णी, श्री रोहन कुलकर्णी, श्री. नंदकिशोर मुसळे, श्री. नागेश पूजारी, श्री. धनाजी भाटले, श्री. शिवाजी लोखंडे श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. समीर कुलकर्णी श्री विद्याधर श्वोत्री व इतर काकाप्रेमीं सभासद मान्यवरांचे हस्ते फोटो पूजन कार्यक्रम संपन्न झाले.

The 4th memorial ceremony of the late Panditrao Daji Kulkarni (Kaka) was held at the Ichalkaranji Engineering Association. The photo-worship ceremony was attended by Shri S.V. Kulkarni, Shri D.M. Biradar, Shri Kashinathji Jagdale, President, Shri Vikram Buchde, Secretary, Shri Rahul Satpute, Shri Milind Biradar Director Shri Amod Kulkarni, Shri Rohan Kulkarni, Shri Nandkishor Musale, Shri Nagesh Pujari, Shri Dhanaji Bhaltle, Shri Shivaji Lokhande Shri Prashant Kulkarni, Shri Samir Kulkarni Shri Vidyaadhar Shwotri and other Kaka-loving members.

04/07/2024
इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशनमध्ये “इंजिनिअर्स  डे” निमित्त  भारतरत्न डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमा पूजन आणि रक्तद...
28/09/2023

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशनमध्ये “इंजिनिअर्स डे” निमित्त भारतरत्न डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमा पूजन आणि रक्तदान शिबिर संपन्न.

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन मध्ये “इंजिनिअर्स डे” निमित्त भारतरत्न डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विक्रम बुचडे मार्गदर्शक माजी अध्यक्ष. प्रकाशराव सातपूते, मा.श्री. डी.एम. बिरादार.मा.श्री. अनिल कुडचे. यांनी भारतरत्न डॉ. एम विश्वेश्वरय्या बद्दल उपस्थिताना माहिती दिली त्यांच्या अनेक पैलूंना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रकाशराव सातपूते व मा.श्री. डी.एम. बिरादार. यांनी संस्थेचा आढावा घेतला व उपस्थित उद्योजक व रक्तदाते यांचे स्वागत केले तसेच लायन्स ब्लड बँकेचे अध्यक्ष ला.विजयकुमार राठी यांनी पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला.
इंजिनिअर्स डे निमित्त असोसिएशन आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे स्व. बाळासाहेब दाते ब्लड बँक यांचे संयुक्त विधमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरामध्ये संस्थेचे सेक्रेटरी, मा.श्री. राहुल सातपुते जॉ.सेक्रेटरी मा. श्री. मिलिंद बिरादार, खजिनदार मा.श्री.कुणाल जगदाळे, संचालक मा.श्री.अमोद कुलकर्णी मा.श्री.निलेश कुलकर्णी मा.श्री. नागेश पुजारी,मा.श्री. धनाजी भाटले , मा.श्री.शिवाजी लोखंडे. आणि सभासदानी उत्सपुर्त पणे सहभाग घेवून एकूण ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच संस्थेचे संचालक श्री निलेश कुलकर्णी यांचेमार्फत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाविस्कर साहेब यांचे शुभ हस्ते उद्योजक सभासदाना मोफत गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, संचालक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा.श्री. मिलिंद बिरादार यांनी केले.आभार प्रदर्षण मा.श्री.राहुल सातपुते यांनी केले.
कार्यक्रम संपन्न होणेसाठी सर्व संचालक,पदाधिकारी, ऑफिसस्टाफ, यांनी परिश्रम घेतले.
---------------------------------------
Ichalkaranji Engineering Association, blood donation camp was organized on the occasion of Engineers Day and the statue of Bharat Ratna Dr. M. Visvesvaraya was worshiped.

On the occasion of Engineers Day, the statue of Bharat Ratna Dr. M. Visvesvaraya was worshiped at the Ichalkaranji Engineering Association. On this occasion, the president of the association, Shri Vikram Buchade, former president Prakashrao Satpute, Shri D.M. Biradar, and Shri Anil Kudche gave information about Bharat Ratna Dr. M. Visvesvaraya and highlighted his many aspects.

The program began with an overview of the association by senior guide Prakashrao Satpute and Shri D.M. Biradar. They welcomed the entrepreneurs and blood donors present. Lions Blood Bank President La. Vijaykumar Rathi also honored the office bearers with bouquets.

A blood donation camp was organized jointly by the association and the Lions Club of Ichalkaranji's late Balasaheb Date Blood Bank on the occasion of Engineers Day. In this camp, the secretary of the association, Shri Rahul Satpute, joint secretary Shri Milind Biradar, treasurer Shri Kunal Jagdale, directors Shri Amodh Kulkarni, Shri Nilesh Kulkarni, Shri Nagesh Pujari, Shri Dhanaji Bhatle, Shri Shivaji Lokhande, and members participated enthusiastically and a total of 85 blood donors donated blood.

Also, on behalf of the director of the association, Shri Nilesh Kulkarni, the book "Goshta Paisa Paani" was distributed to the entrepreneur members free of cost by the chief guest of the program, Dr. Bawiskar Saheb.

All office bearers, directors, and entrepreneurs were present in large numbers at the event. The program was conducted by Shri Milind Biradar. Shri Rahul Satpute expressed his gratitude.

All directors, office bearers, and office staff worked hard to make the event a success.

Here are some additional details about the event:

The statue of Bharat Ratna Dr. M. Visvesvaraya was worshiped to pay tribute to the great engineer and statesman.
A blood donation camp was organized to help save lives.
A book on entrepreneurship was distributed to members to encourage them to start their own businesses.
I hope this is helpful. Let me know if you have any other questions.

सस्नेह निमंत्रण"अभियंता दिन"समारंभशुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023  रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता i)   भारतरत्न डॉक्टर  विश...
14/09/2023

सस्नेह निमंत्रण
"अभियंता दिन"समारंभ

शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता
i) भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे फोटोचे पूजन
ii) मान्यवरांचे मनोगत
iii) रक्तदान शिबिर उद्घाटन
iv) प्रमुख पाहुणे डॉक्टर बाविस्कर साहेब यांचे नात्यांमधील इंजिनीयरिंग ह्या विषयावर व्याख्यान
v) संचालक माननीय निलेश कुलकर्णी यांचे तर्फे सर्व सभासदांना गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक भेट
vi) सीएनसी ट्रेनिंग विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप.

तरी असोसिएशनच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र व आग्रहाचे निमंत्रण.

कळावे ,
आपले स्वागतोत्सुक
अध्यक्ष
श्री विक्रम बुचडे,
सर्व पदाधिकारी व संचालक इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन
--------------------------------------------------------------

Sincere Invitation

Engineer's Day Celebration
Friday, September 15, 2023 at 10:00 AM

1)Worship of the photo of Bharat Ratna Dr. Visvesvaraya
2) Speeches by dignitaries
3) Inauguration of blood donation camp
4) Lecture on "Engineering in Relationships" by Dr. Bavskar
5) Presentation of the book "Goshta Paise Panyachi" to all members by Honorable Nilesh Kulkarni, Director.
6) Distribution of certificates to CNC training students

All members of the association are cordially invited to attend the event on time and enhance its glory.

Regards,
Yours sincerely,
President
Mr. Vikram Buchade

All office bearers and directors of Ichalkaranji Engineering Association

संवादामध्ये सुस्पष्टता पाहिजे ! कार्पोरेट ट्रेनर: विनय गोसावी इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, इचलकरंजी येथे  नुकताच उद्यो...
14/09/2023

संवादामध्ये सुस्पष्टता पाहिजे ! कार्पोरेट ट्रेनर: विनय गोसावी

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, इचलकरंजी येथे नुकताच उद्योजक आणि एच.आर.स्टाफ यांचेसाठी असोसिएशन तर्फे “कम्युनिकेशन & इंटरपर्सनल स्किल्स” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्पोरेट ट्रेनर विनय गोसावी आणि कार्पोरेट कौन्सिलर डॉ. लीना साने यांचे मार्गदर्शन लाभले. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शंकरराव दाजी कुलकर्णी उद्योग भवन खंजिरे इस्टेट शहापूर इचलकरंजी येथे हि कार्यशाळा संपन्न झाली.
सुरवातीस संस्थेचे जेष्ठ सल्लागार उद्योजक मा.श्री.काशिनाथ जगदाळेसो यांनी संस्थेच्या कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला. उपस्थित उद्योजकांचे आणि प्रमुख पाहुण्याचे ओळख व स्वागत संस्थेचे सेक्रेटरी श्री. राहुल सातपुते यांनी करून दिले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे श्री विनय गोसावी आणि डॉ .लीना साने यांनी आपल्या प्रात्यक्षिक मनोगतामध्ये व्यवसायिक टीम कौशल्य कसे प्राप्त करावे. तसेच मानवसंसाधनाचा वापर आणि मनुष्यामध्ये असणारे संवेदना कशाप्रकरे जपावेत. याची अनेक उदाहरण चित्रफितीद्वारे प्रकाशित केले. संवादामध्ये सुस्पष्टता पाहिजे. मेकैनिकली यशस्वी असणारी व्यक्ती कम्युनिकेशनमध्ये मेकेनिकली वागुणूकीचा वापर करणे कसे चुकीचे आहे हे हि स्पष्ट केले. त्याकरिता मनुष्याने संवेदनशील राहून यशस्वी व्हावे व आपली उधीमता वाढवावी. या बाबत सर्वाना समजेल असे कथेद्वारे आणि खिलाडी वृत्तेने प्रात्यक्षिक उदाहरणासह सभासदांना समजावून सांगितले. आणि पटवून दिले. व्यक्तीमध्ये संवादा करिताचा पुरेसा आत्मविश्वास, निर्णय क्षमता कशी वाढवता येते हे हि सखोलपणे माहितीद्वारे व प्रात्यक्षिकपणे करून दिली. सदर कार्यक्रमामध्ये पाहुण्याचा सत्कार श्री काशिनाथ जगदाळे आणि संचालक श्री नंदकिशोर मुसळे यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यशाळेस इचलकरंजी, हातकणगले, जयसिंगपूर व परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजक सभासद आणि एच.आर.स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला. तसेच सदर कार्यशाळेस संचालक श्री.शिवाजी लोखंडे, optima जॉब चे संचालक श्री. अमित मगदूम हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. धनाजी भाटले यांनी केले.
------------------------------------
Communication Should Be Clear! Corporate Trainer: Vinay Gosavi

Recently, a workshop on "Communication & Interpersonal Skills" was organized by the Ichalkaranji Engineering Association for entrepreneurs and HR staff. The workshop was conducted by corporate trainers Vinay Gosavi and corporate counselor Dr. Leena Sane. The workshop was held at the Shankarrao Daji Kulkarni Industrial Building of the Ichalkaranji Engineering Association in Khanjire Estate, Shahapur, Ichalkaranji.

At the beginning of the workshop, senior consultant entrepreneur Kashinath Jagdale gave a brief overview of the association's work. The association's secretary Rahul Satpute welcomed the present entrepreneurs and guests.

The workshop's main speakers, Vinay Gosavi and Dr. Leena Sane, demonstrated how to acquire professional team skills in their practical speeches. They also shared many examples of how to use human resources and how to preserve the sensitivity in humans.

They emphasized that communication should be clear. They also explained how it is wrong for a person who is mechanically successful to use mechanical communication skills in communication. For this, humans should be sensitive and successful, and they should increase their initiative. They explained and proved this to the members with practical examples through stories and a sporting spirit in a way that everyone can understand.

They also explained in depth how to increase the self-confidence and decision-making ability of a person in communication. The guests were honored by Kashinath Jagdale and director Nandkishor Musle at the event.

A large number of entrepreneurs and HR staff from the engineering sector in Ichalkaranji, Hatkanangale, Jaisingpur and surrounding areas attended the workshop and benefited from it. Shivaji Lokhande, director of Optima Job, was also present at the workshop. Director Dhanaji Bhatle expressed his gratitude on behalf of the association.

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक 25/ 8/ 2023 रोजी उद्योजक आणि एच आर या...
23/08/2023

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक 25/ 8/ 2023 रोजी उद्योजक आणि एच आर यांचे करिता असोसिएशन मार्फत संवाद आणि परस्पर कौशल्य या विषयावर सेमिनार आयोजित केला आहे तरी याचा लाभ घ्यावा
-----------------------------------------------
This is to inform all members of the Ichalkaranji Engineering Association that a seminar on "Communication and Interpersonal Skills" will be organized by the association for entrepreneurs and HR professionals on Friday, 25 August 2023. Please take advantage of this opportunity."

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन येथे समय नही है ? या विषयावर कार्यशाळा संपन्न इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, आय.आय.एफ.कोल्...
02/08/2023

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन येथे समय नही है ? या विषयावर कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, आय.आय.एफ.कोल्हापूर चाप्टर आणि स्लीमा हातकंणगले यांचे संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे नुकताच टाईम मॅनेजमेंट गुरु श्री अखिल बाहेती यांचा Time management skills for high effectiveness हा कार्यकम आयोजित केला होता. समय नही है ? या पुस्तकाचे लेखक श्री अखिल बाहेती यांचे या विषयावर मार्गदर्शन लाभले. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शंकरराव दाजी कुलकर्णी उद्योग भवन खंजिरे इस्टेट शहापूर इचलकरंजी येथे हि कार्यशाळा संपन्न झाली.
सुरवातीस संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रम बुचडे यांनी संस्थेच्या कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला. उपस्थित उद्योजकांचे आणि प्रमुख पाहुण्याचे ओळख व स्वागत संस्थेचे जॉ.सेक्रेटरी श्री मिलिंद बिरादार यांनी करून दिले. प्रमुख पाहुणे श्री अखिल बाहेती यांनी आपल्या प्रात्यक्षिक कार्यशाळेस मनोगतामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये कशाप्रकारे वेळेचा सदुपयोग करावा आणि यशस्वी व्हावे या बाबत सर्वाना समजेल असे कथेद्वारे आणि खिलाडी वृत्तेने प्रात्यक्षिक उदाहरणासह सभासदांना समजावून सांगितले. व आपला दिनक्रम कसा असावा आपण आपले आयुष्य सकरात्मक विचार आणि आचरण यांची सांगड कशी घालता येवू शकते हे हि उदारणासह पटवून दिले. व्यक्तीमध्ये पुरेसा आत्मविश्वास, निर्णय क्षमता कशी वाढवता येते हे हि सखोलपणे माहितीद्वारे व प्रात्यक्षिकपणे करून दिली. सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक श्री रविंद्र नाकील यांना उद्योग अनुभव प्रतिष्ठान ठाणे तर्फे “उद्योग भूषण” (SME) पुरस्कार मिळाले बद्दल, संस्थेचे सभासद श्री. बाहुबली चौगुले यांची नांदणी सहकारी बँक संचालक पदी निवड झालेने आणि श्री संजय शिंदे यांची रोटरी क्लब, शिरोळ च्या अध्यक्ष पदी निवड झाले बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
सदर कार्यशाळेस इचलकरंजी, हातकणगले, जयसिंगपूर व परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला. तसेच सदर कार्यशाळेस संस्थेचे माजी अध्यक्ष श्री डी. एम. बिरादार ,श्री. काशिनाथ जगदाळे आय आय एफ चे अध्यक्ष व आय.ई.ए.चे उपाध्यक्ष श्री महेश दाते, खजिनदार श्री. कुणाल जगदाळे संचालक श्री.अभिजित सातपुते, हे उपस्थित होते. सूत्र संचलन व आभार प्रदर्शन संस्थेचे जॉ.सेक्रेटरी श्री. मिलिंद बिरादार यांनी केले
-------------------------
Time Management Skills for High Effectiveness Workshop Held at Ichalkaranji Engineering Association

The Ichalkaranji Engineering Association, the I.I.F. Kolhapur Chapter, and Slima Hatakangale jointly organized a workshop on Time management skills for high effectiveness by Time management guru Shri Akhil Baheti in Ichalkaranji. Shri Akhil Baheti, the author of the book Time Management Skills for High Effectiveness, guided the participants on the subject. The workshop was held at the Shankarrao Daji Kulkarni Industrial Building in Khanjire Estate, Shahapur, Ichalkaranji.

The workshop began with a brief overview of the organization's work by the organization's president, Shri Vikram Buchade. The organization's joint secretary, Shri Milind Biradaar, introduced and welcomed the present entrepreneurs and the chief guest. The chief guest, Shri Akhil Baheti, delivered a speech in his demonstration workshop on how to use time effectively in daily life and in the journey of one's life. He explained to the members how to use time effectively and be successful in everyday life and in the journey of one's life. He also explained how to live a life of positive thoughts and actions. He also explained how to increase self-confidence and decision-making ability in an individual.

In the program, the organization's director Shri Ravindra Nakil was awarded the “Udyog Bhushan” (SME) award by the Udyog Anubhav Pratisthan Thane, the organization's member Shri. The special felicitation was given to Bahubali Chaugule for being elected as the director of Nandni Cooperative Bank and Shri Sanjay Shinde for being elected as the president of Rotary Club, Shirol.

A large number of entrepreneurs from the engineering sector in Ichalkaranji, Hatakangale, Jayasinghpur and the surrounding areas attended the workshop and benefited from it. The organization's former president Shri D. M. Biradaar, Shri. Kashinath Jagdale, President of I.I.F. and Vice-President of I.E.A. Shri Mahesh Date, Treasurer Shri. Kunaal Jagdale, Director Shri. Abhijit Satpute, were present. The felicitation session was conducted and the thanks were given by the organization's joint secretary, Shri. Milind Biradaar.

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशच्या ४३ व्या वार्षिक सभेमध्ये नूतन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड इचलकर...
01/08/2023

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशच्या ४३ व्या वार्षिक सभेमध्ये नूतन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी: इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनची ४३ वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच संपन्न झाली. सदर सभेमध्ये त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनिल कुडचे यांचे अधिपत्याखाली बिन विरोध पार पडली. सदरची निवडणूक हि संस्थेचे जेष्ट मार्गदर्शक श्री.एस.व्ही.कुलकर्णी श्री.प्रकाश सातपुते, श्री.डी.एम. बिरादार आणि श्री.काशिनाथ जगदाळे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली.
संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.विक्रम बुचडे, उपाध्यक्षपदी श्री. महेश दाते, कार्यवाहपदी श्री.राहुल सातपुते, सहकार्यवाहपदी श्री.मिलिंद बिरादार, कोष्याध्यक्षपदी श्री. कुणाल जगदाळे यांची पदाधिकारी पदी व संचालकपदी श्री. अमोद कुलकर्णी, श्री.निलेश कुलकर्णी , श्री. रविंद्र नाकील, श्री. अभिजित सातपुते, श्री. नागेश पुजारी, श्री.नंदकिशोर मुसळे, श्री.धनंजय भाटले, श्री. असीम कुलकर्णी , श्री. रोहन कुलकर्णी, श्री. विनायक बिडकर, श्री. शिवाजी लोखंडे. यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांचे संस्थेचे जेष्ट मार्गदर्शक श्री.एस.व्ही.कुलकर्णी श्री.प्रकाश सातपुते, श्री.डी.एम. बिरादार आणि श्री.काशिनाथ जगदाळे यांचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला. आणि भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.
सत्काराला उत्तर देताना संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री. विक्रम बुचडे यांनी संचालकांना आणि सभासदांना विश्वासात घेवून काम करू संस्थेचा पारदर्शी कारभार करीत सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या प्रगती साठी सदैव प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष मा.श्री.एस.व्ही.कुलकर्णी, यांनी आपल्या मनोगतामध्ये सभासदांना कार्यक्षम राहणे व स्पर्धांत्मक युगामध्ये नवीन भारत कसा असेल या बाबत मार्गदर्शन केले. मा.श्री. प्रकाशराव सातपुते, यांनी आम्ही नव्या युवा संचालकांचे पाठीशी आहोत असे सांगितले.सभेचे सूत्र संचलन श्री.राहुल सातपूते आणि आभार प्रदर्शन श्री. कुणाल जगदाळे यांनी केले सभेस संस्थेचे सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.

*एक अनोखी कार्यशाळा*इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन आणि स्लिमा यांच्या संयुक्त विद्यमान...
24/07/2023

*एक अनोखी कार्यशाळा*

इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन आणि स्लिमा यांच्या संयुक्त विद्यमाने, *टाईम मॅनेजमेंट गुरू श्री अखिल बाहेती यांचा ' Time management skills for high effectiveness'* हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ह्या सेमिनार मधून आपल्याला बरेच टूल्स शिकता येईल ज्यामुळे , *'समय नही हे?'* ह्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी मदत होईल.
सर्वांनी वेळेत उपस्थित राहून ह्या सेमिनार चा लाभ घ्यावा.

बुधवार दिनांक 26 जुलै,2023 रोजी
वेळ : दुपारी 4 ते 6
स्थळ: शंकरराव दाजी कुलकर्णी उद्योगभवन, खंजीरे इंडस्ट्रिअल इस्टेट, शहापूर, इचलकरंजी.

रजिस्ट्रेशन साठी
श्री अनिल मगदूम - 98909 25603
श्री अभिजीत नाईक - 9673285534
श्री. अजय मनवाडे-
9881247707

यांच्याशी संपर्क साधावा.

Hello all..We have arranged a lecture series on" Women Empowerment through Entrepreneur " Key note Speaker:  Mrs. Jiya Z...
27/04/2023

Hello all..

We have arranged a lecture series on

" Women Empowerment through Entrepreneur "

Key note Speaker:

Mrs. Jiya Zanvar
Executive Director
-Zanvar Group-

Date: 28th April 2023
Time: 2:30pm
Venue: Sharad Institute of Technology College of Engineering.

Join us to learn about the inspiring transition of Mrs. Jiya Niraj Zanvar from software specialist to executive director of the Zanvar group of companies.

how she used her engineering expertise to set up systems and run one of Maharashtra's largest foundries.

How she successfully balances her personal and professional life will be interesting to learn.

For more details contact:

Abhijeet Satpute
9890902111

Milind Biradar
9527688282

Your presence will grace the Seminar..🙏🏻

नमस्कार, उद्योजक मित्रांनो!आपल्याला आपल्या दैनंदिन व्यावसायिक भेटी, चर्चा आणि मुलाखती विषयी काही प्रश्न मनात येत असतील.ज...
19/04/2023

नमस्कार, उद्योजक मित्रांनो!

आपल्याला आपल्या दैनंदिन व्यावसायिक भेटी, चर्चा आणि मुलाखती विषयी काही प्रश्न मनात येत असतील.

जसे कि...

१) समोर असलेल्या व्यक्तीमध्ये पुरेसा आत्मविश्वास आहे का नाही हे तुम्हाला पटकन समजते का?

२) तुमच्या बोलण्यात समोरील व्यक्ती रस घेतोय का नाही हे तुम्हाला सहजपणे जाणवते का?

३) तुम्हाला असे वाटते की तुम्ही चुकीच्या पद्धतीने हस्तांदोलन (शेक हॅन्ड) करत आहात?

४) तुम्हाला कधी जाणवते का कि तुमची देह-बोली इतरांना चुकीचा संदेश देत आहे ते?

५) आपले राज्य, प्रांत आणि देशाबाहेरील लोकांसोबत कशी देह-बोली हवी आहे?

आपल्याला ह्या आणि अशाच काही जरुरी मुद्द्यांवर नक्की जाणून घ्यायचे आहे का?

आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याच भाषेत द्यायला येत आहेत देह-बोली अभ्यासक...

श्री. सच्चिदानंद रुद्राक्ष स्वामी
(आंतरराष्ट्रीय मानांकित पहिले भारतीय देह-बोली विषयक लेखक)

तारीख: २३-एप्रिल-२०२३,
वेळ: ४:३० ते ६:३०,
स्थळ: IEA सभागृह

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन येथे निर्यातक्षम कंपनी कशी बनवावी यासंबंधी कार्यशाळा संपन्न.इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन,...
04/04/2023

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन येथे निर्यातक्षम कंपनी कशी बनवावी यासंबंधी कार्यशाळा संपन्न.

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमॅन कोल्हापूर चॅप्टर आणि स्लिमा यांचे संयुक्त विद्यमाने इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शंकरराव दाजी कुलकर्णी उद्योग भवन खंजिरे इस्टेट , शहापूर इचलकरंजी येथे निर्यात क्षम कंपनी कशी बनवावी यासंबंधी कार्यशाळा संपन्न झाली.

सदर कार्य शाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शन माननीय श्री प्रकाश राठोड .मॅनेजिंग डायरेक्टर, कॅस्प्रो ग्रुप ऑफ कंपनीज, कोल्हापूर यांनी केले .

सदर कार्यशाळेत फक्त स्थानिक बाजारपेठेचा विचार न करता, संपूर्ण जग हे तुमचे बाजारपेठ होऊ शकते, या दृष्टीने प्रयत्न करा आणि त्यासाठी उद्योजकाने स्वतःला सिद्ध होण्यासाठी आपल्या कारखान्यांमध्ये कोणत्या मशिनरी घ्याव्यात,कोणत्या सिस्टीम्स बसवाव्यात आणि कुशल मनुष्यबळ कसे निर्माण करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.

आय आय एफ चे चेअरमन माननीय श्री सचिन शिरगावकर यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री महेश दाते यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि उपस्थितांचे स्वागत केले.

सदर कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री एस व्ही कुलकर्णी, माजी अध्यक्ष श्री डी एम बिरादार , श्री काशिनाथ जगदाळे , श्री अनिल कुडचे . संस्थेचे विद्यमान संचालक श्री अमोद कुलकर्णी,श्री कुणाल जगदाळे, श्री धनंजय भाटले,श्री अभिजीत सातपुते, श्री शिवाजी लोखंडे इतर मान्यवर श्री मयूर लक्षमेश्वर, श्री अभिजीत कुडचे श्री.विनय मगदूम आणि विशाल मोरे आणि उद्योजक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सोबत कॅसल स्मार्ट स्टोरेज, इचलकरंजी यांच्यावतीने स्टोरेजच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित केले होते. याचाही लाभ सभासदांनी घेतला .

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे खजिनदार श्री मिलिंद बिरादार यांनी केले.

Address

Ichalkaranji

Telephone

+912302441855

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ichalkaranji Engineering Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ichalkaranji Engineering Association:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram