शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा

  • Home
  • India
  • Jalgaon
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून रूग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. 🔵Official

शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देणार..!!
24/09/2025

शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देणार..!!

🗓 २३ सप्टेंबर २०२५ | 📍मुंबईमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यां...
23/09/2025

🗓 २३ सप्टेंबर २०२५ | 📍मुंबई

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे ट्रक आणि आरोग्य वाहिनी आज उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.

या महाप्रलयात हतबल झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक खंबीरपणे उभे आहोत. त्यांना यातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

#अवकाळीपाऊस

लोकांचा लोकनाथ !
23/09/2025

लोकांचा लोकनाथ !

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतदिव्यांग बांधवांना आता १५०० ऐवजी २५०० रू...
16/09/2025

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत
दिव्यांग बांधवांना आता १५०० ऐवजी २५०० रूपयांचे मिळणार अर्थसहाय्य !

समाजसेवेच्या वाटचालीत आरोग्यसेवा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच संवेदनशील कार्याची जाण ठेवत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मद...
15/09/2025

समाजसेवेच्या वाटचालीत आरोग्यसेवा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच संवेदनशील कार्याची जाण ठेवत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख व आरोग्यदूत मा. श्री. मंगेशजी चिवटे सर समाजासाठी निरंतर कार्यरत आहेत.

अलीकडेच पुणे येथे नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक व संवेदनशील अभिनेते मा.श्री. नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते श्री. मंगेशजी चिवटे सरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदिका वसुंधरा भागवत यांनी उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमात मंगेश चिवटे सरांनी जलसंधारणाबरोबरच आरोग्य विषयक रचनात्मक कामात नाम फाऊंडेशन ने अधिक पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. तसेच नामच्या आरोग्य सेवेत निस्वार्थीपणे कार्यकर्ता म्हणून योगदान देण्याची तयारी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

श्री. मंगेशजी चिवटे सर यांचा हा सन्मान केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नसून समाजासाठी प्रेरणादायी संदेशही आहे.

-शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टिम जळगाव.

राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत...
12/09/2025

राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
याअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय या योजनेत समाविष्ट असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
आयुष्मान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान चालकां मार्फत तयार केली जात आहेत. लाभार्थी स्वतःही आयुष्मान ॲप किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

06/09/2025

श्री गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या कार्यकर्ते यांच्यासाठी शिवसेना युवासेना वैद्यकीय मदत कक्ष / डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतिने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे १० हजार कार्यकर्त्यांसाठी खिचडी महाप्रसादाचे वाटप.

06/09/2025

*🌺🙏✨🚩 श्री गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... ✨🙏🌺*🚩

*📢 श्री गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम निमित्त महत्त्वाच्या सूचना :-*

*🔸 सूचना १ – स्टेज उपस्थिती*
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना व युवासेना* यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणूक पथावर भव्य मंच (स्टेज) आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी *दुपारी १२:०० वा. टॉवर चौक* येथे आपल्या स्टेज ठिकाणी उपस्थित राहून मिरवणुकीच्या स्वागताला सज्ज व्हावे.

*🔸 सूचना २ – (खिचडी) महाप्रसाद वाटप*
मिरवणूकीत सहभागी झालेल्या सर्व श्रीगणेश मंडळ कार्यकर्त्यांसाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व मंडळ कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

*📍 स्थळ :* शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, जळगाव
(पांडे चौक, राधा-कृष्ण मंगल कार्यालय समोर)
*🕡 वेळ :* संध्याकाळी ०६:३० वा.

*◻️सर्वांनी पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे हि विनंती..!!*
🌸 🌸

*- शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, जळगाव*

*🌺🚩🙏✨ गणपती बाप्पा मोरया ✨🚩🙏🌺*

27/08/2025

महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव....
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

#शिवसेना #गणपतीबाप्पामोरया

कवयित्री, निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
24/08/2025

कवयित्री, निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

Address

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा कार्यालय, राधाकृष्ण मंगल कार्यालया समोर, जळगाव
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram