08/10/2021
नमस्कार,
1. सकाळी उठल्यानंतर काही वेळ मुठ बांधता न येणे
2. सकाळी उठल्यानंतर कंबरेतून वाकताना दुखणे
3. सकाळी शौचास बसता न येणे
4. सकाळी सकाऴी सांधे, शरिर आखडणे.
5. थंडीच्या दिवसात मनगट,गुडघे ,बोट दुखणे
6. खांद्यापासुन हात वरती करता न येणे
7. टाच दुखणे
8. गुडघे ,बोटांचे सांधे सुजने, दुखणे स्पर्शाला गरम वाटणे.
9. सांध्यात पाणी भरणे, लाल होणे .
10. बोटे वाकडी होणे, सांध्यांमध्ये विकृती येणे.
11. छोटे-मोठे किंवा सर्व सांध्यांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होने, ठसठस करणे
12. पाठीच्या मणक्यांची सांधे दुखणे, ठसठस करणे
13. पाठीतील मनक्यांच्या सांध्यांच्या विकृतीमुळे हातपायाला मुंग्या येणे,चक्कर येणे
अशाप्रकारच्या तक्रारी सहन करत आज आपण आणि आपल्यासारखे अनेकजण जगत आहेत. वेदनाशामक औषधी किंवा स्टेरॉइड आदि औषधी घेतल्यानंतर तात्पुरते बरं वाटत, परंतू दिर्घकाळ या औषधीच्या सेवनाने किडनी, ह्रदय व यकृत आदि महत्वाच्या अवयवांवर होणारे दुष्परिणाम सर्वांनांच माहिती आहे. अशा रुग्णांच्या प्रयोगशालेय तपासण्यापातून अनेक वेळा असे लक्षात येत कि, विकृत झालेल्या शारीरिक व्याधी क्षमत्वामुळे (immunity system) हे व्याधी होतात.
मग चिकित्सा म्हणुन अशा रुग्णांनमधे व्याधी क्षमत्वाला दाबणारे immune suppressant औषधींचा वापर केला जातो. ज्याचा परिणाम म्हणुन शरीर अधिक आजारी, कमकुवत होते. अशा दिर्घकाळ टिकणाऱ्या व तीव्र वेदनाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनसाठी आयुर्वेदीय चिकीत्सा, योग्य आहार-विहार, योगासने, पंचकर्म, अग्निकर्म आदि उपक्रमानी चांगला व कायमस्वरुपी इलाज होऊ शकतो.
हि रुग्णांची गरज लक्षात घेऊनच आमचे गुरुवर्य कै.डॉ.अतुल निरगुडे सर याच्या जन्मदिन व गुरुपुष्यंमृतयोग याचे औचित्य साधुन श्रेयस आयु-आयुर्वेद चिकित्सालयात
दि.28/10/2021 वार .गुरुवार रोजी
स.10ते सायं.4 पर्यंत
शिबीराचे आयोजन केले आहे.
वैशिष्ट्यः-
1) वयोमर्यादा 15 ते 65
2) रुग्ण तपासणी मोफत.
3) रक्तलघवी लॅब तपासणीमध्ये 50 टक्के सुट
4) MRIआवश्यक असणाऱ्या रुग्णांनमध्ये 500 रुपयांची सुट
टिपः-
1. पुर्व रुग्ण नोंदनी असल्याशिवाय तपासणी होणार नाही.
2. रुग्ण नोंदनीची अंतीम तारिख 25/10/2021 .
3. पुर्वीचे सर्व रिपोर्ट व MRI Films आणि महत्वाची कागदपञे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
स्थळः- श्रेयस आयु-आयुर्वेद चिकित्सालयात व पंचकर्म केन्द्र
फ्लॅट क्र.102, कीर्ती कुंज, शारदा कॉलनी,
अंबा हनुमान जवळ, कॉकसिट कॉलेजच्या मागे, अंबाजॊगाई रॊड, लातुर.
संपर्कः- WWW.shreyasayu.com 02382-228848, 9422611488