"Kelkar Clinic"

  • Home
  • "Kelkar Clinic"

"Kelkar Clinic" Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from "Kelkar Clinic", Family doctor, .

-"Kelkar Clinic" is an OPD set up with Day Care facilities.
-"Kelkar Clinic" has facilities like ECG, Nebulizer, Glucometer, Pulse Oximeter, etc.
-24×7 service on SOS basis.

21/04/2025
15/03/2025

नमस्कार,

आपणांस डायबेटीस आहे का? डायबेटीसमध्ये उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी रक्तातील शर्करा/साखर तपासली जाते हे आपणांस माहिती असेलच.

त्याचबरोबर 3 महिन्यांची सरासरी साखर पातळी (sugar level) तपासणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी आवश्यक तपासणी म्हणजे HbA1C होय.

*केळकर क्लिनिक* येथे लवकरच आम्ही HbA1C तसेच BSL (blood sugar level) मोफत तपासणी शिबिर आयोजीत करीत आहोत.

अधिक माहितीसाठी केळकर क्लिनिक या व्हाट्सअप्प चॅनेलला follow करा.

चॅनेलची लिंक 👇

https://whatsapp.com/channel/0029VaIrhX52kNFoeQJuGc30

या लिंकवर जाऊन वरती उजव्या कोपऱ्यात follow वर क्लिक करा.

धन्यवाद!

- डॉ. संतोष केळकर
केळकर क्लिनिक
मालगुंड

🙏🙏🙏🙏
29/10/2024

🙏🙏🙏🙏

30/09/2024

नमस्कार,

सध्याचं जग हे टेक्नॉलॉजीचं जग आहे. त्याचे फायदे आहेत आणि तोटेही आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो यावर ते अवलंबून आहे.

*केळकर क्लिनिक* संबधी विविध अपडेट्स वेळोवेळी आपणास मिळावे यासाठी *केळकर क्लिनिक* हे व्हाट्सअप्प चॅनेल सुरु केलं आहे.

या चॅनेलवर -
1. केळकर क्लिनिकची वेळ व साप्ताहिक सुट्टी यासंबंधी माहिती आहे.
2. साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त केळकर क्लिनिक बंद असल्यास त्यासंबंधी सूचना येथे दिली जाईल.
3. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केळकर क्लिनिक सुरु राहणार असेल तरी त्याची माहिती येथे दिली जाईल.
4. केळकर क्लिनिक येथे होणाऱ्या आरोग्याशी संबंधित शिबिरांची माहिती येथे दिली जाईल.
5. वेळोवेळी येणाऱ्या साथी/आजार यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न असेल.
6. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या *सुवर्णप्राशन* ची माहिती/तारीख येथे कळवली जाईल.

सोबत केळकर क्लिनिकचं वेळापत्रक दिलं आहे. त्यामुळे तपासणीसाठी येताना "क्लिनिक सुरु आहे का?" हे फोन करुन विचारण्याची गरज उरणार नाही.

*केळकर क्लिनिक* हे चॅनेल जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जा. वरील उजव्या कोपऱ्यात follow वर क्लिक करा.

चॅनेलची लिंक-
https://whatsapp.com/channel/0029VaIrhX52kNFoeQJuGc30

धन्यवाद!
डॉ. संतोष केळकर
केळकर क्लिनिक
मालगुंड
9975726202

नमस्कार,आज, रविवार दिनांक 07 जुलै 2024 रोजी सुवर्णप्राशन आहे.वेळ- सकाळी 10.00 ते 01.00-डॉ. संतोष केळकरकेळकर क्लिनिक, माल...
07/07/2024

नमस्कार,
आज, रविवार दिनांक 07 जुलै 2024 रोजी सुवर्णप्राशन आहे.

वेळ- सकाळी 10.00 ते 01.00

-डॉ. संतोष केळकर
केळकर क्लिनिक, मालगुंड
9975726202

🔴आज रविवार असल्याने सुवर्णप्राशन फक्त सकाळीच उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.🔴

🔴आला पावसाळा त्वचेला सांभाळा🔴          पाऊस आल्यानंतर प्राधान्याने जे आजार सुरू होतात त्यात एक तर तापाच्या साथी येतात. क...
27/06/2024

🔴आला पावसाळा त्वचेला सांभाळा🔴

पाऊस आल्यानंतर प्राधान्याने जे आजार सुरू होतात त्यात एक तर तापाच्या साथी येतात. कावीळ, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड याचे रुग्ण आढळू लागतात. तसेच पोट बिघडणे, अपचन, अतिसार हे आजारही मोठ्या प्रमाणात सुरु होतात. हे आजार, ते होऊ नयेत यासाठी घ्यायची काळजी साधारणपणे सर्वांना माहिती आहे. पण फारसा चर्चेत नसलेला एक आजार म्हणजे त्वचा विकार, त्यातही विशेषतः बुरशीचा संसर्ग म्हणजेच नायटा किंवा फंगल इन्फेक्शन.

त्वचा विकार हे प्रामुख्याने त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने होतात. त्यात जर ओलसरपणा आणि दमट हवामान (wet and humid) असेल तर त्वचाविकार व विशेषतः बुरशीचा संसर्ग अधिक वेगाने होतो. पावसाळ्यात ओलसरपणा आणि दमट हवामान हे दोन्ही असल्यामुळे पावसाळ्यात बुरशीचा संसर्ग व प्रसार वेगाने होतो.

👉बुरशी संसर्ग (फंगल इन्फेक्शन) टाळण्यासाठी काय करावे?
1) दररोज स्वच्छ अंघोळ करावी. शारीरिक श्रमाचे काम असल्यास कामावरुन आल्यावर पुन्हा अंघोळ करावी.
2) सैल, सुती व कोरडे कपडे वापरावेत. जीन्स, लेगिन्स, ई चा अतिवापर टाळावा.
3) टॉवेल, पांघरुण, कंगवे ई शेअर करु नये.
4) बुरशी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी संपर्क येऊ देऊ नये.
5) खूप काळ त्वचा घामाने अथवा पाण्याने ओली राहणार नाही याची काळजी घ्यावी.
6) संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे स्वतंत्रपणे धुवावे.
7) अंतर्वस्त्र स्वच्छ व पूर्णपणे कोरडी वापरावी. पावसाळ्यात अनेकवेळा पूर्ण न वाळलेली अंतर्वस्त्रे वापरली जातात. विशेषतः कोकणासारख्या ठिकाणी पाच पाच सात सात दिवस सतत पाऊस पडतो. पाऊस इतका असतो की सूर्यदर्शनही होत नाही. यामुळे कपडे पूर्णपणे वाळत नाहीत. आणि ओलसर कपडे वापरणे म्हणजे बुरशीला आमंत्रणच. म्हणूनच अंतर्वस्त्रे व टॉवेल याची अतिरिक्त खरेदी करुन ठेवावी.
8) आपल्याला अतिरिक्त घाम येत असेल तर घामोळ्याची किंवा अँटी फंगल पावडर वापरावी.
9) पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवावी. विशेषतः शेतात, चिखलात ई ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी काम झाल्यानंतर पाय व पायाच्या बोटांमधील जागा स्वच्छ व कोरडी करावी.

👉बुरशी संसर्ग (फंगल इन्फेक्शन) झाल्यानंतर काय करावे?
1) बुरशी संसर्ग टाळण्यासाठी लिहिलेले वरील मुद्दे अंमलात आणावे.
2) स्वतःच्या मनाने औषधे/क्रीम ई वापरु नये. परस्पर घेतल्या जाणाऱ्या मलम/क्रीममध्ये बहुतांश वेळा स्टिरॉइड्स असतात. त्याने तात्पुरता फरक पडतो पण अंतिमतः त्वचा भाजल्यासारखी होते आणि काळी पडत जाते.
3) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा कोर्स पूर्ण करावा. खूप वेळा 5-6 दिवसांत लक्षणे कमी वाटली की रुग्ण औषधे बंद करतात, त्यामुळे बुरशी संसर्ग पुर्णपणे बरा होत नाही आणि काही दिवसांनी पुन्हा संसर्ग होतो (drug resistance). अशावेळी स्ट्रॉंग व महागडी औषधे वापरण्याशिवाय पर्याय उरत नाही.
4) साधारणतः 1 ते 2 आठवड्यात बुरशी संसर्ग बरा होऊ शकतो. मात्र हल्ली औषधांच्या अनियमित वापरामुळे 2 महिने ते 6 महिने सुद्धा औषधे घ्यावी लागतात.

Prevention is better than cure! असं म्हटलेलंच आहे. त्यामुळे बुरशी संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्या आणि संसर्ग झालाच तर तात्काळ तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपणा सर्वांना मान्सूनच्या शुभेच्छा!
धन्यवाद!🙏

-डॉ. संतोष श्रीराम केळकर
केळकर क्लिनिक, मालगुंड
9975726202


उष्माघात (Sun stroke/Best stroke)उन्हाळा सुरु झाला आहे. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुढील काळजी...
27/03/2024

उष्माघात (Sun stroke/Best stroke)

उन्हाळा सुरु झाला आहे. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुढील काळजी घ्यावी.

-शक्यतो सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळात घराबाहेर पडणे टाळा.

-बाहेर जाताना डोक्यावर टोपी/रुमाल/स्कार्फ इ घाला. छत्रीचा वापर करा. गॉगल वापरा.

-hydration maintain करा. म्हणजे पाणी, सरबत, ors, उसाचा रस, नारळ पाणी इ चे पुरेशा प्रमाणात सेवन करा.

-तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, कोल्ड्रिंक्स यांचा वापर टाळा.

-घट्ट कपडे, जीन्स, लेगिन्स इ चा वापर टाळा. सैलसर, सुती कपडे वापरा.

-डोळ्यावर अंधारी येणे, चक्कर वाटणे, छातीत धडधडणे, घाम फुटणे, उलट्या, मळमळ, ताप येणे इ उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे जाणवली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरना भेटा.

धन्यवाद!

-डॉ. संतोष केळकर
केळकर क्लिनिक
मालगुंड
9975726202

07/02/2024

https://whatsapp.com/channel/0029VaIrhX52kNFoeQJuGc30

केळकर क्लिनिक संबंधी updates जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकद्वारे "केळकर क्लिनिक मालगुंड" हे चॅनेल जॉईन करावे ही विनंती.

Address


Opening Hours

Monday 10:00 - 13:00
16:00 - 20:30
Tuesday 16:00 - 20:30
Wednesday 10:00 - 13:00
16:00 - 20:30
Thursday 10:00 - 13:00
16:00 - 20:30
Friday 10:00 - 13:00
16:00 - 20:30
Saturday 10:00 - 13:00
16:00 - 20:30
Sunday 10:00 - 13:00

Telephone

+919975726202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when "Kelkar Clinic" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to "Kelkar Clinic":

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram