
07/11/2022
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला राणे साहेबांनी दिले मोठे गिफ्ट,
आता जिल्ह्यातच होणार बायपास शस्त्रक्रिया.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत मागील चार वर्षांपासून एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटलच्या स्वरूपात जणू संजीवनी लाभली आहे. हृदय विकार हा जवळपास बहुसंख्य रुग्णांना जडणारा आजार. मागील काही दशकांत सिंधुदुर्ग जिल्हयात हृदय विकारामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सिंधुदुर्ग जिल्हयातील या समस्येचा विचार करता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी तीन वर्षांपूर्वी हृदय विकार ग्रस्थ रुग्णांसाठी एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये प्रशस्त कॅथलॅब सुरु केली. या विभागामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील हृदयविकार ग्रस्थ रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. मात्र हृदयात ब्लॉकेजची संख्या अत्याधिक असल्यामुळे अश्या रुग्णांची अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही. अश्या रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया केल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. मात्र सिंधुदुर्ग जिल्हयात बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याचे राणे साहेब यांनी मनोधैर्य मनाशी बाळगून भव्य बायपास शस्त्रक्रिया विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध करून दिला आहे.
एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल येथील बायपास शस्त्रक्रिया विभागातील पहिले रुग्ण अमित शंकर परब वय वर्ष चाळीस राहणार घुमडे तालुका मालवण या रुग्णाची रविवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी यशस्वी बायपास शस्त्रक्रिया पार पडली. सदर शस्त्रक्रिया डॉ. अमृतराज नेर्लिकर(कार्डियाक सर्जन), भूल तज्ञ शैलेंद्र शिरवाडकर पर्फुजनिस्ट विनोद दिरांजे, ओ.टी.इंचारर्ज देवेंद्र घाडीगावकर, हृदय शास्त्र विभाग तंत्रज्ञ सिद्धेश रासम, आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. ही सिंधुदुर्ग जिल्हयातील पहिली बायपास शस्त्रक्रिया असून सदर शस्त्रक्रिया विभागाच्या स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्हयाच्या आरोग्यव्यवस्थेत हृदय विकार ग्रस्थ रुग्णांसाठी नवसंजीवनी लाभली आहे.
एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलचे डीन डॉ. अरुण कुवाळे, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉ. अजित लांब यांनी सदर बायपास शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.