02/06/2025
💡 महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (CMRF) आता परदेशातूनही देणग्या स्वीकारता येणार आहेत! केंद्र सरकारकडून ‘FCRA’ अंतर्गत परवानगी मिळाल्यामुळे महाराष्ट्र हे परदेशी देणगी स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🧾 ही परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील गरीब, गरजू रुग्ण, आपत्तीग्रस्त नागरिक, महिलांसाठीच्या उपक्रमांसाठी आता जागतिक स्तरावरून मदत उभी करता येणार आहे.
या निर्णयामुळे मदतीसाठी नवे मार्ग खुले झाले असून, निधी गोळा करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे.
🔗 एक पाऊल पारदर्शकतेकडे, विश्वासार्हतेकडे!