27/05/2018
शेवटच्या उन्हाच्या तडाख्यासाठी १० सुपर कुल फूड पदार्थ
मे महिन्याच्या शेवटी उन्हाचा तडाखा खुपच वाढला आहे. अशा उष्ण वातावरणात आपल्या आरोग्याला जपणे खूप आवश्यक असते. फक्त टोपी, गॉगल, सन स्क्रीन, समर कोट आणि पाण्याच्या बाटली ने काम होत नसतं. उन्हाळ्याच्या त्रासापासून आपल्या आरोग्याला जपण्यासाठी आपण रोजच्या आहाराकडे पण लक्ष द्यायला हवे. येथे अशाच १० फूड पदार्थांची ची यादी आणि त्याचे महत्व दिले आहे. एक सोपा निर्देश म्हणजे रोज यातल्या किमान ६ पदार्थांचा आहारात समावेश केला तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास नक्कीच होणार नाही.
१) नारळ पाणी: हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कॉल्ड ड्रिंक आहे. हे पूर्ण पणे जंतुरहित तर आहेच पण त्याच बरोबर ह्यातील पोटॅशियम आणि क्लोराईड मुळे शरीरातल्या द्रव्याचे प्रमाण संतुलित राहते.
२) खरबूज आणि टरबूज : हि फळं खाऊन आपली तहान तर भागतेच पण शिवाय ह्यातून भरपूर फायबर, लोह तत्व, जीवनसत्व अ ब क आणि ई पण मिळतात. सिझनल फळं असल्यामुळे ती स्वस्त ही असतात.
३) काकडी: हवी तेवढी खावी. कारण आपल्याला पाणी फक्त द्रव्य रूपात नाही तर खाण्याच्या पदार्थातून पण मिळायला हवे. उन्हाळ्यात काकडी हि एक लो कॅलरी पण पौष्टिक असा पदार्थ आहे. काकडीची कोशिंबीर, रायतं, रस, सूप, सलाड हे उन्हाळ्यातील डायट मधे एकदम बेस्ट!
४) कैरी: मुद्दामच कैरी लिहिलं आहे. कारण आंबा तर सगळेच खातात, पण रसना आणि कोल्ड्रिंक्स च्या जमान्यात, कैरी च्या पन्ह्याला विसरून चालणार नाही. उन्हातून आल्यावर पन्ह प्यायल्यावर उष्णतेचा त्रास होत नाही.
५) ताक/दही: लस्सी, ताक, दही ह्या सारखे पदार्थ रोजच्या आहारात असलेच पाहिजेत, खास करून उन्हाळ्यात. ह्यातून तुम्हाला कॅल्शियम आणि प्रोटीन तर मिळतेच शिवाय प्रतिकार शक्ती वाढवणारे उपयोगी बेक्टेरिया पण मिळतात. घरी केलेली लस्सी जरूर प्या पण बाहेर उघड्यावर मिळणाऱ्या लस्सी पासून दूर रहा कारण त्याने तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. ताकामध्ये धने-जिरे पावडर घालून पातळ ताक बनवून प्या. ताक - लस्सी - दही सर्वांना आवडत असेली तरी ती कमी मात्रेतच प्यावी.
६) कोकम: रोजच्या स्वयंपाकात कोकमाचा वापर वाढवा. सोल कधी, कोकम सरबत, सार असे पदार्थ उष्णते पासून आपले रक्षण करतात. बाजारत तयार कोकम शरबत मिळते.
७) लिंबू: लिम्बात असलेले जीवन सत्व क आणि सोडियम शरीरात द्रव्य साठवून ठेवायला मदत करतात. जर कुणाला उन्हाळी चा त्रास होत असेल तर त्यांनी पाण्यात लिंबू आणि मध घालून सकाळ संध्याकाळ प्यायला तर आराम मिळतो.
८) अननस: ह्या फळात पाणी, जीवनसत्व क, लोह तत्व, सोडियम, पोटॅशियम आणि इतर उपयोगी खनिज तत्व असल्या मुळे हे एक आयडियल फळ आहे. हे नुसताच खा किंवा ह्याचा घरी केलेला ज्यूस प्या.
९) आवळा: जीवन सत्व क चा राजा म्हणजे आवळा. आवळ्याचे सरबत, मोरंबा, छुंदा, लोणचं, चटणी, मोरावळा किंवा साधा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेला आवळा- कुठल्याही स्वरूपात आवळ्याचा समावेश करा.
१०) उसाचा रस - ताजा उसाचा रस शरीराला आल्हाददायक, तृप्ती देणारा, वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करणारा.
द्वारा-
डॉ.प्रतिक बुरबुरे
आईं फिजियोथेरेपी सेन्टर
म्हालगी नगर चौक,
हुडकेश्वर रोड ,
नागपुर
पिन कोड ४४००३४
मो. ९०२१४५५२६६,८००७५५००५५
-----------------------