06/07/2025
करूनी विठ्ठल नामाचा घोष ॥
भक्तिभावाने जोडुनी कर ॥
नतमस्तक होऊनी चरणी ॥
करितो नमन एकादशीच्या दिवशी ॥
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात
सोड अहंकार सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ॥