01/02/2025
GlobalDentalHospital.Blogspot.com
दातांना पिन बसवण्याची गरज का पडते? आणि अशी उपचार पद्धती माफक दरात करणे शक्य आहे का?
बऱ्याच तरुण मूला मुलींचे समोरचे दात खूप जास्त मागे किंवा खूप जास्त पुढे आलेले असतात, वेडेवाकडे असतात, त्यांच्यात अंतर असते, इत्यादी प्रकारच्या बऱ्याच समस्या असू शकतात. ह्यामुळे चेहऱ्याची ठेवण व्यवस्थित राहत नाही, हसताना सदरील व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो आणि मग तो व्यक्ती हसणे टाळत असतो, दात खराब होण्याचा आणि दात किडण्याचं प्रमाण जास्त असत अश्या व्यक्तीत आणि अश्या व्यक्तीच्या आत्मविश्वासामध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये कमालीचा फरक पडत असतो बाकीच्या व्यक्तींच्या तुलनेत. अश्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता त्यांच्या दातांना पिन बसवून दातांची ठेवण व्यवस्थित करून वाढवता येते. दात खराब होण्यापासून, किडण्यापासून सुद्धा वाचवता येते.
सध्या अश्या उपाचार पद्धतीला भारतात खाजगी रुग्णालयात प्रचंड खर्च येत असतो आणि ह्याकारणास्तव बरेच गरजू गरीब तरुण तरुणी ह्या उपचारापासून नाईलाजाने लांब राहतात. मोजक्याच सरकारी संस्थेत आणि सामाजिक संस्थेत माफक दरात अशी उपाचार पद्धती उपलब्ध आहे ह्यामुळे बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांचे हाल होत असतात. ह्या बाबी लक्षात घेऊन आम्ही ग्लोबल डेंटल हॉस्पिटल येथे अत्यंत माफक दरात दातांना पिन बसवण्याची उपाचार पद्धती उपलब्ध करून देत आहोत. ह्यात अतिउच्च जागतिक दर्जाची, अनुभवी डॉक्टर्स कडून आम्ही रुग्णांची नाममात्र शुल्कात दातांना पिन बसवण्याची उपचार पद्धती अवलंबणार आहोत जेणेकरून गरीब गरजू तरुण तरुणींचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल.
https://globaldentalhospital.blogspot.com/2020/06/blog-post.html