23/02/2025
आज दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी ,नंदुरबार शहरातील आधार हाॅस्पिटल आणि सुरत येथील सुप्रसिद्ध पारंणु हाॅस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने वंध्यत्व (नि: संतान) निवारण शिबीर घेण्यात आले. एकुण 55 रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबीर कै. परशराम सजन ठाकरे ( ठाकरे गुरुजी) यांचे स्मरणार्थ ,आधार हाॅस्पिटल, नंदुरबार येथील स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ.अनिता व डाॅ.ठाकरे यांनी आयोजित केले होते. सदर शिबिरा साठी सुरत चे पारंणु हाॅस्पिटल चे सुप्रसिद्ध डाॅ.जयेश पटेल वंध्यत्व व गर्भ औषध विशेषज्ञ ( Infertility Specialist & Fetal Medicine Expert) व पारंणु हाॅस्पिटल च्या डाॅ.पटेल मॅडम यांनी सर्व लाभार्थी रुग्णांची तपासणी करुन उपचार, सल्ला मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी डॉ.जयेश पटेल ,डाॅ.पटेल मॅडम ,डाॅ.प्रकाश ठाकरे, डाॅ.अनिता मॅडम,डाॅ.यज्ञेश ठाकरे नंदुरबार येथील सृष्टी क्लिनिक चे स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ.पुष्कराज वळवी, अक्कलकुवा येथिल लाइफलाइन हाॅस्पिटल चे स्त्री रोग तज्ञ डाॅ.इंद्रसिंग वळवी, पारंणु हाॅस्पिटल चे कौशिक भाई, आधार हाॅस्पिटल चा संपूर्ण नर्सिग स्टाफ, प्रगती मेडिकल स्टोअर्स चे योगेश देसाई, निदान लॅबोरेटरी चे उमेश सोनार व त्यांचा संपुर्ण स्टाफ, सोनोग्राफी साठी मधुरम सोनोग्राफी सेंटर चे डाॅ.गणेश पाकळे यांनी सहकार्य केले. सदर शिबीर यशस्वीते साठी सर्व मित्र- हितचिंतक, आदरणीय व्यक्तीं,माडा डाॅक्टर मित्र परिवार , ज्या सर्वांनी शिबीर बद्दल माहिती प्रसार केल, यांचा सर्वांचा आधार हाॅस्पिटल, नंदुरबार तर्फे मनापासून धन्यवाद