Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center

Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center Ethical way to come across the world of cosmetics, completely pure, handmade, 100 % paraben free , s

मलावष्टंभ भाग ८  अंतिम भाग    भाग १-७ वाचण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-1...
16/01/2022

मलावष्टंभ
भाग ८ अंतिम भाग

भाग १-७ वाचण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/



मलावष्टंभ
म्हटलं तर खूप साध लक्षण परंतू चिकित्सा करतांना कधी कधी खरचं अवघड जातं.
कारण बरेच वेळा पेशंट वारंवार त्रिफळा चूर्ण किंवा त्यासारखे पोट साफ होण्याचे अनेक औषधी घेऊन आपल्या कडे आलेला असतो.
व्याधी जीर्णाअवस्थेत तर रुग्णांचे आंत्र रुक्षावस्थेत(कोरडे) पोहचलेले असतात.
त्यावर विजय मिळवण्यासाठी आपण खालील प्रमाणे उपाय योजना करुन शकतो.

१.
दिनचर्या,ऋतुचर्याचे पालन करणे.

२.

आपण पहिल्या भागात मलावष्टंभाचे हेतू पाहिले होते.
भाग १

https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/

कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नाही या न्यायानुसार जर आपण मलावष्टंभाचे हेतू टाळले तर
व्याधी वर सहज विजय मिळवता.

३.
भुक लागल्यावर वेळेवर ,जास्त पातळ नाही, नाही रुक्ष नसलेले,अन्न व्यवस्थित चावून खावे.
अन्न सेवन करतांना ज्याप्रमाणे आपण यज्ञविधी मध्ये ,समीधा भक्तीभावाने शांत ,प्रसन्न मनाने अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्यातील वैश्वानर म्हणजे अग्नी देवतेला शांत, प्रसन्न मनाने अन्न समर्पित करावे.

४.

तहान लागेल तसे पाणी प्यावे.
जेवणाच्या आधी ,नंतर लगेच खूप पाणी घेऊ नये,जेवतांना मध्ये मध्ये घोट भर पाणी प्यावे.

५.
रात्रीचे भोजन सायंकाळी लवकर करावे जेणे करुन रात्रीचे भोजन व निद्रा यात तीन तासांचे अंतर असेल.
रात्रीचे भोजन पचण्यास हलके असावे.दही,मांसाहार, कडधान्य यांसारखे नसून पातळ फळ- भाजी भाकरी यासारखा आहार ठेवावा.


६.
आहार सेवना नंतर कष्टाचे काम ,व्यायाम,स्नान यासारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

७.
सकाळी ताज्या हवेत फिरणे,रात्री भोजनानंतर शतपावली करणे म्हणजे आंत्रगती व्यवस्थापन करणे होय.

८.
आहार व विहारासोबतच योगासनांचा आंतर्भाव आपल्या दिनचर्येत नक्की करावा.

सुर्य नमस्कार
सर्वांगसुंदर व्यायाम

विपरितशयनस्थियीतील आसने
भुजंगासन
शलभासन
धनुरासन

शयनस्थितीतील आसने
पवनमुक्तासन
हलासन
चक्रासन
पादसंचालन
जानु संचालन

बैठक स्थितीतील आसने
वक्रासन
पश्चिमोत्तानासन
वज्रासन
मत्सेंद्रासन
धनुरासन

दंडस्थितीतील आसने
वीरासन
त्रिकोणासन

ही फक्त प्रातिनिधिक नावे दिलेली आहेत याशिवाय पोटावर दाब व ताण येणारी आसने .

९.
मलावष्टंभा मुळे पोट फुगत असेल ,भुक मंदावली असेल तर पोटाला हिंगाचा लेप लावणे,काळं मीठ लावून आलं तुकडा जेवणाच्या आधी चघळणे, तज्ञांच्या सल्ल्याने आमपाचन,हिंग्वाष्टक चूर्ण,लसूनादी वटी, अविपत्तीकर चूर्ण या सारखे औषधांची उपाय योजना करता येते.

१०.
पक्वाशयातील वात वाढला असेल ,व्याधी खूप जीर्ण अवस्थेत असेल ,तर दिपन पाचना बरोबर शोधन कर्म आवश्यक आहे.आंत्र अधिक रुक्ष झालेले असतील तर विरेचन, अनुवासन ,आस्थापना बस्तीचा चांगला परिणाम दिसून येतो.

धन्यवाद

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 🙏

'वरद'आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                   भाग ७भाग १-६ पाहण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Cente...
08/01/2022

मलावष्टंभ
भाग ७

भाग १-६ पाहण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/

वात, पित्त ,कफ हे मुख्य तीन दोष व या तिन्ही दोषांच्या तर तम भावानुसार आपली प्रकृती बनत असते.
वयानुसार ,दिवसानुसार ,आहार सेवनानंतर अशा विविध अवस्थेत त्या त्या दोषांचे प्राबल्य असते उदा.वाताची अवस्था लक्षात घ्यायची असेल तर
वयानुसार वार्धक्य अवस्था
दिवसानुसार सायंकाळी
रात्री नुसार. शेवटचा प्रहर
जेवणानंतर पचनाची शेवटची अवस्था म्हणजे पच्यमान अवस्थेत वात निर्माण होतो

त्याचप्रमाणे पित्ताची अवस्था ही मधली अवस्था व कफाची अवस्था ही सुरवातीची अवस्था असते.
एवढेच नव्हे तर ऋतू नुसार,आपण सेवन करत असणारे मधूर ,अम्ल,लवण यासारखे सहा रसांप्रमाणे सुध्दा वात,पित्त,कफ दोषांची अवस्था अवलंबून असते.
मलनिस:रण होण्याचा काल हा मुख्यतः सकाळीच असतो , म्हणून च सकाळी लवकर उठले म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहरी जर उठलो तर वाताच्या काळी वाताचा वेग व्यवस्थित येण्यास नक्कीच मदत होते.

म्हणूनच म्हणतात....

लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य आयुष्य लाभे.....

वयानुसार वार्धक्य अवस्था ही वाताची अवस्था असते त्यामुळे शरीरात मुख्यतः रुक्ष गुण वाढलेला असतो, यामुळे वार्धक्य अवस्थेत मलावष्टंभाचा त्रास अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता असते .
‌म्हणून या अवस्थेत आहारातून तूपाचे प्रमाण , स्निग्ध पदार्थांचे सेवन आवश्यक असते.


थोडे महत्त्वाचे

लहान मुलांची अवस्था ही मुख्यतः कफाची अवस्था असते ,त्यात जर मलावष्टंभासारखे वाताचे विकार असतील तर ते नक्की कशामुळे आहेत हे समजून घेणे आवश्यक असते,फक्त आहाराच्या काही सवयी बदलल्या तरी हे लक्षण कमी होते.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

'वरद'आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                                       भाग ६         भाग १- ५ पाहण्यासाठी https://www.facebook.com/Varad-Ayurve...
27/12/2021

मलावष्टंभ

भाग ६

भाग १- ५ पाहण्यासाठी https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/

गर्भिणी अवस्थेत गर्भाची गर्भाशयात वाढ होत असते ,गर्भाशय हा अवयव मूत्राशय व गुदाशय यांच्या मधोमध असतो.
गर्भाची वाढ होत असतांनाच या अवयवांवर तसेच उदर पोकळीतील इतर अवयवांवर दाब पडतो.
म्हणूनच गर्भीणीला वारंवार मूत्र प्रवृत्ती होते ,तसेच मल प्रवृत्तीच्या वेळा ही बदलतात.कधी कधी मलावष्टंभ सारखा त्रास पण होतो असतो.
परंतू या अवस्थेत हा त्रास होणे त्रासदायक ठरु शकते, यामुळे वारंवार अम्लपित्त म्हणजे छातीत , पोटात आग,शिर:शुल सारखे लक्षणं दिसतात त्यामुळे जेवणावर परीणाम होतो व गर्भाच्या वाढीवर ही परिणाम होऊ शकतो.तसेच वाताचा अवरोध होऊन सारखे अस्वस्थ वाटत राहते, ह्रदयावर दाब पडतो,श्वासाची गती वाढते कटी प्रदेशावर दाब येऊन कटी प्रदेश म्हणजेच कंबर दुखी सारखा त्रास नित्य जाणवत राहतो.
या साठीच पूर्वीच्या काळी गर्भीणीला झाडू मारणे किंवा लादी साफ करणे ही कामं करु देत जेणे करुन पोटावर किंचित दाब येऊन वायुला गती मिळेल व वाताची प्रवृत्ती सहज होईल.
त्याच प्रमाणे पायी फिरणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या आंत्रगती peristaltic movment व्यवस्थित राहण्यास मदत होते.
आहारात पातळ व स्निग्ध पदार्थ ,चांगले तुप असणे आवश्यक असते,जेवणाच्या वेळा निश्चित ठेवणे हेही खूप महत्त्वाचे आहे.
बी असलेले मुठ भर काळे मनुके पित्त शामक तर आहेतच ,रक्त वाढीसाठी ही उपयुक्त असुन वाताचे अनुलोमन करतात त्यांचा समावेश नित्य आहारात करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात तेलाचा बस्ती वर्णन केलेला आहे, त्यामुळे वाता चे नियमन होते.तज्ञांच्या सल्ल्याने नक्की तोही घ्यावा त्यामुळे प्रसृति नैसर्गिकरित्या होण्यास १००%मदत होते.

धन्यवाद 🙏😊

थोडे महत्त्वाचे
प्रकृती ही स्त्री बीज व पुरुष बीज एकत्र येतानाच ठरत असते गर्भधारणा होतांना ज्या दोषांचे प्राबल्य त्या दोषांची प्रकृती म्हणून गर्भीणीने आपलं आहार ,सवयी अश्या ठेवाव्यात ज्याचा त्रास बाळाला व आपल्यालाही नंतर होणार नाही .

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

'वरद'आयुर्वेद व पंचकर्म‌‌‌ कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक.
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                     भाग ५मलावष्टंभ भाग १_४ पाहण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Co...
19/12/2021

मलावष्टंभ
भाग ५

मलावष्टंभ भाग १_४ पाहण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/


जेव्हा पण मलावष्टंभ होतो तेव्हा तेव्हा वात,पित्त,कफ हे तीनच दोष विकृत होतात असे नव्हे तर या विकृत दोषांचा परिणाम सप्त धातू,तसेच मुख्य अवयवांवर ही होतं असतो.
शरीरातील सर्व अवयव एकमेकांशी संलग्न internally connected असल्याने त्यांच्या कार्यात काहीही गडबड झाली तरी त्याचा परिणाम इतर अवयवांवर ही होतं असतो.
मुखापासून गुदापर्यंत एकच नलिका असते हे आपणास माहीत च आहे, त्यामुळे
पक्वाशयातील वाढलेले दोष एक तर खालच्या मार्गाने किंवा वरील मार्गाने बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यावेळी आपल्याला वारंवार अपचन,अतिसार ,चिकट मलप्रवृत्ति,पोटात दुखणे,किंवा आग वाटणे, वारंवार ढेकर येणे ,मळमळ होणे ,शिर:शुल यासारखे लक्षणांबरोबर,कधीकधी हृदययाचे चे ठोके अधिक जाणवते,चालतांना धाप लागते, क्वचित चक्कर येतात,पाठीच्या,कमरेच्या भागात जखडणे व वेदना होणे , वारंवार मुतखडा तयार होणे,सकाळी पूर्ण अंग जखडल्या सारखे वाटणे, यासारखे अनेक लक्षणं जाणवतात.
तपासणी केली तर सगळे normal report येतात.

व्यक्ति परत्वे हे लक्षणे ,या लक्षणांची तीव्रता पण बदलत असते , प्रकृती ,आहार विहाराच्या सवयी तसेच ऋतूनुसार ही लक्षणे बदलत असतात.
अगदी उत्साह न वाटणे यापासून तर अनेक मोठ्या आजारांपर्यंत .....
इतर अनेक कारणांबरोबर बिघडलेली पचनसंस्था हे सर्व कारणांचे मुळ कारण नक्कीच असू शकते.


थोडे महत्त्वाचे

लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल‌ तर त्यांच्या
मलप्रवृत्तिच्या सवयी ,खाण्याच्या सवयी,यांचा जवळचा संबंध असतो.लगेच औषधी देण्यापेक्षा थोडे आहारात बदल केले ,तर मलप्रवृत्ती नीट होऊन त्रास कायमचा बंद होऊ शकतो.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

धन्यवाद 🙏

'वरद' आयुर्वेद व पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय, नाशिक.
८९९९९६४५३७

शिरोधारा                             एक स्नेह कल्पना.....  आयुर्वेदात स्नेहन कर्माला विशेष महत्त्व सांगितले आहे  https:/...
12/12/2021

शिरोधारा
एक स्नेह कल्पना.....

आयुर्वेदात स्नेहन कर्माला विशेष महत्त्व सांगितले आहे
https://www.facebook.com/105568854775205/posts/285745370090885/

शिर:प्रदेशी करत असणारे स्नेह कल्पना म्हणजे मूर्धतैल शिरस्तर्पण .

मूर्ध तैल म्हणजे शिर:प्रदेशी विशिष्ट काळापर्यंत तैल धारण करणे.

आचार्य वाग्भटाचार्यांनी यांचे चार प्रकार सांगितले आहेत,त्यापैकी शिर:सेक या प्रकारात शिरोधारा चा समावेश करता येतो.
शिर हे सर्व इंद्रियांचे मूल सांगितले असून प्रधान मर्म आहे.
शिर प्रदेशी प्रतिदिन तैल लावल्यास शिर:शूल होतं नाही,शिरप्रदेशी असलेले अस्थि बळकट होतात,केशमूळ दृढ होतात,काळे होतात, इंद्रिय प्रसन्न राहतात, चेहऱ्यावरील त्वचा सुंदर बनते,सुखपूर्वक निद्रा येते.
शिरोधारा व्याधी नुसार तैलाची ,तूपाची,तक्राची , विविध औषधी सिध्द कारवायांची पण करता येते.
संगणकामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम,शिर:शूल, दैनंदिन जीवनात येणारे तणाव व त्यामुळे होणारे रक्तदाब, निद्रानाश कमी करण्यासाठी देखील शिरोधारा चा उत्कृष्ट परिणाम दिसून येत आहे.
जीर्ण ज्वरानंतर,व्याधी नंतर केसांचे गळणे वाढते त्यावर केश्य औषधी सिध्द तैलाची शिरोधारा परिणाम कारक ठरते.

अधिक माहिती साठी
'वरद'आयुर्वेद व पंचकर्म‌‌‌ कॉस्मेटिक चिकित्सालय, नाशिक ८९९९९६४५३७

आयुर्वेदाचे पालन करा निरोगी रहा😊

मलावष्टंभ                                भाग ४भाग १ https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/भाग २...
11/12/2021

मलावष्टंभ
भाग ४

भाग १
https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/

भाग २
https://www.facebook.com/105568854775205/posts/302793858386036/

भाग ३
https://www.facebook.com/105568854775205/posts/306765794655509/

मलाशयात मल जमा झाला व तो वेळेत बाहेर नाही पडला तर त्यातील द्रव भाग अतिशय जास्त प्रमाणात शोषला जातो व मलाला अधिक घट्ट पणा येत जातो यालाच ग्रथित मल प्रवृत्ति असेही म्हणता येते.
बरेच वेळा आपल्याला मलप्रवृत्ति करण्याचा संदेश मिळतो परंतू काही कारणाने त्याकडे दुर्लक्ष झाले तर पुढील वेळेस बाहेर पडणारा सुरवातीचा मल हा कडक असतो हयाचा अनुभव येतो.
व वारंवार या कडे जर दुर्लक्ष झाले तर मात्र शरिराची ती प्रवृत्ती बनत जाते.व मलाशयात मल जमा होत राहतो,या जमा झालेल्या मला मुळे वाताला अवरोध म्हणजे अडथळा निर्माण होतो व पक्वाशयात त्याची अधिक वृध्दी होते व येथून सुरुवात होते विषचक्राची.......म्हणजे

आधी मलावरोध....नंतर
वाताला अडथळा......नंतर
वाताची वृध्दी....नंतर
वातामुळे पुन्हा मलातील द्रव अंशांचे शोषण.......नंतर
मलाला पुन्हा अधिक कोरडेपणा.......नंतर
मलांचे खडे होणे.....आणी

यामुळे पुन्हा वाताची वृध्दी

असे विषचक्र एकदा चालू झाले की मग जेवणानंतर पोटात जडपणा वाटणे,पोटात आवाज येणे,पोट फुगल्या सारखे वाटणे, वारंवार उद्गार येणे,शरीराला जडत्व वाटणे, उत्साह नसणे,छातीत,पोटात आग वाटणे यासारखी लक्षणे सुरवातीच्या अवस्थेत दिसण्यास सुरुवात होते.परंतु हे सर्व सहन करता येण्याजोग्य असते म्हणून या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष होते.
परंतू आपली पचनसंस्था कुठेतरी खराब होते आहे हे समजणे खुप महत्वाचे आहे.

पुढील लक्षणे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात.

थोडे महत्त्वाचे.....

लहान मुलांना बरेच वेळा मलप्रवृत्ती साफ होत नाही किंवा मलाचे खडे ही होतात तेव्हा मुलं मल बाहेर टाकण्याची वेळ आल्यावर अतिशय रडतात.या मुलांना शक्य तेवढे पातळ पदार्थ खाण्यास द्यावे,पातळ भाजीत पोळी चूरुन द्यावी,आहारात तुपाचे प्रमाण योग्य ठेवावे,बेंबीच्या भोवती हिंग टाकून गरम केलेले एरंडेल तेलाचा बोळा ठेवावा किंवा त्याभागी तेल जिरवावे, गुदभागी बोटाने किंचित आतल्या बाजूस एरंडेल तेल,खोबरेल तेल लावावे.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

धन्यवाद 🙏

'वरद'आयुर्वेद व पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक.
८९९९९६४५३७

भाग १ https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/भाग २https://www.facebook.com/105568854775205/posts...
04/12/2021

भाग १
https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/

भाग २
https://www.facebook.com/105568854775205/posts/302793858386036/

अन्ननलिका,
आमाशय,
ग्रहणी,
लहान आंत्र,
मोठे आंत्र,
मलाशय,
मलनिस्सारण मार्ग
असे ढोबळ मानाने आपण भाग करुया.
अन्न सेवन केल्या नंतर अन्नावर या प्रत्येक भागात वेगवेगळे संस्कार घडत असतात, प्रक्रिया होत असते व अन्न पचनाची क्रिया पूर्ण होत असते.

आपल्या या सर्व भागात आंत्रचलन म्हणजे peristaltic movment मुळे अन्न पुढे पुढे ढकलत जाते.
या ठिकाणी वाताचे मुख्य कार्य लक्षात येते.

अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. लहान आतड्यांमध्ये ग्रंथी असतात त्यांच्या स्रावातील विकरांमार्फत (एंन्झाईममार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते.
जवळजवळ संपूर्ण पचन होऊन ज्यातील अन्नघटकांचे शोषण झालेले आहे असा अन्नाचा उर्वरित भाग बृहदांत्रात /मोठ्या आंत्रांमध्ये येतो. त्यातील पाणी व क्षार यांचे शोषण होते आणि मल तयार होतो. विसर्जनापूर्वी मल तात्पुरता मलाशयात साठविला जातो. जलशोषण, क्षारशोषण आणि मलनिर्माण ही मोठ्या आतड्याची मुख्य कार्ये आहेत.
आयुर्वेदानुसार प्राकृत वाताची जी स्थाने सांगितले आहेत त्यात पक्वाशय म्हणजेच बृहत्आंत्र हे मुख्य स्थान आहे.
बृहदांत्रातून खूप वेगाने टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले गेल्यास शरीरात पाणी योग्य प्रमाणात शोषले जात नाही आणि परिणामी अतिसार होतो. याकडे लक्ष न दिल्यास अतिसारामुळे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) होते. विशेषतः बालकांमध्ये क्षारांचे प्रमाण कमी झाल्यास अशी परिस्थिती प्राणघातक ठरू शकते.
याउलट मोठ्या आतड्यात अन्नपदार्थ हळूहळू पुढे सरकल्यास, पाणी जास्त प्रमाणात शोषले जाते आणि बद्धकोष्ठता होते.
हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण दह्याचे उदाहरण घेऊया.
आदल्यादिवशी लावलेल्या दह्याला ज्याप्रमाणे व्यवस्थीत घट्ट पणा असतो ,परंतू तेच दही जर दोन ,तीन दिवस तसेच ठेवले तर ,दह्यातील पाणी वेगळे होते,दह्याला एक प्रकारचा आंबट वास येतो व दह्यातून बारीक बुडबुडे येऊ लागतात.
त्याचप्रमाणे जर मल अधिक काळ मलाशयात राहिला तर त्यातील जलीय भाग अधिक शोषला जातो,त्याला काठिण्यता येते त्यातील उष्णता वाढून,विकृत गंध येतो,व या उष्णतेचा परिणाम,अवरोध झालेल्या वाताचा परिणाम म्हणून आंत्रांमध्ये जखमा ही होऊ शकतात.
मलाशयात मल अधिक काळ राहिला तर त्याचा परिणाम मलाशयातील पुढे असणारे अवयव जसे गर्भाशय,मूत्राशय,यावरही होतं असतो व आपल्याला त्यांच्याशी संबंधीत व्याधीही होऊ शकतात.
म्हणूनच प्रत्येक वैद्य आपल्या रुग्णाला अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न विचारतो आपले सकाळी पोट साफ होते का???

पुढील भागात भेटूया.......

आपल्या मुलांना शरिराची तोंड ओळख करुन द्या, प्रत्येक अवयव, शरीरातील प्रत्येक प्रक्रिया किती महत्त्वाची आहे समजून सांगा,म्हणजे फक्त प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी काहीही आहार,औषधे घेण्यापेक्षा , आपली पचन शक्तीला अनुसरून ,ऋतूला अनुकूलआहार घेतला जाईल व त्यांचे योग्य पचन ,शोषण होईल , जेणेकरुन अनेक आजार आपोआप लांब राहतील व प्रतिकार क्षमता ही निर्माण होईल.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

धन्यवाद 🙏

'वरद' आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय, नाशिक.
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                        भाग २ मलावष्टंभ. भाग १ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/105...
27/11/2021

मलावष्टंभ

भाग २

मलावष्टंभ. भाग १ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/

मलावष्टंभाची कारणे अनेक असू शकतात त्यापैकी खालील काही महत्त्वाची कारणे

अवेळी जेवण करणे,जेवणाच्या वेळा न पाळणे

एकदा पोटभर जेवण केल्यावर पुन्हा समोर दिसले म्हणून तोंडांत टाकणे

भुक नसतांनाही जेवण करणे

अतिमात्रेत किंवा अतिशय कमी मात्रेत जेवण करणे

वारंवार लंघन ,उपवास करणे

आहारात अतिशय रुक्ष,कोरडे पदार्थ घेणे

दिवसभरात गरजेपेक्षा अधिक पाणी सेवन करणे

स्निग्ध पदार्थांचे प्रमाण आहारात अतिशय कमी असणे

सध्याच्या काळात बरीच फळे ,भाजीपाला बाराही महिने मिळतात त्यामुळे त्यांचे सेवन होते, वारंवार ऋतूला अनुकूल नसणारी फळे किंवा भाजी सेवन केल्यास

प्रमाणापेक्षा अधिक पालेभाजी सेवन केल्यास(पालेभाजी ने पोट साफ होते हा एक मोठा गैरसमज आहे)

रात्रीच्या जेवणात पचण्यास जड असे कडधान्य ,छोले,राजमा, किंवा मांसाहार सेवन करणे

वारंवार मैदा,बेकरी चे पदार्थ सेवन

वारंवार रेचक घेऊन आपल्याच आतड्यांना आपण आळशी बनवणे

दिवसभरात शरीराची थोडीही हालचाल न करणे,जेवणानंतर लगेच बैठे काम किंवा झोपणे

वारंवार हॉटेलिंग, बाहेर चे तळलेले पदार्थ, पिझ्झा बर्गर चिझ यासारखे पदार्थ खाणे

खाल्ल्यानंतर लगेच श्रमाचे कामे करणे

शेव,मुरमुरे, भत्ताअसे रुक्षता आणणारे पदार्थ सेवन करणे

शिळे पदार्थ ,फ्रिज मधले पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ सेवन

असे अनेक कारणांमुळे मल शरीराच्या बाहेर टाकला जात नाही ,त्याचा अवरोध होतो असतो.
या विषयी अधिक जाणून घेऊया पुढील भागात...

तोपर्यंत महत्त्वाची सुचना

मुलांना लहान पणापासूनच वारंवार खायला देण्याऐवजी त्यांना भुकेची जाणीव झाल्यावर बंद पाकीटातील काहीही खाण्यास देण्याऐवजी गरम गरम खाण्यास द्या.जेणे करुन विनाकारण येणारी स्थूलता टाळता येईल व आपण आपल्या मुलांना नकळत अनेक आजारांपासून दूर नेऊन.

तिळाचे पदार्थ,गुळ खोबरे,गुळ शेंगदाणे या सारखे पदार्थ पौष्टीक तर असतातच पण या बरोबर आतड्यातील स्निग्धता टिकवून ठेवण्यास मदत होते.

भेटूया पुढील भागात

तोपर्यंत
स्वस्थ रहा ,मस्त रहा
जय आयुर्वेद
🙏🙏😊

'वरद' आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय
नाशिक
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                             भाग १  मलावष्टंभ------ मलाचा अवष्टंभ                         मलाचा अवरोध          ...
20/11/2021

मलावष्टंभ
भाग १

मलावष्टंभ------ मलाचा अवष्टंभ
मलाचा अवरोध
मल बाहेर न पडणे

मल-- शरीराच्या पचन क्रियेत शरीरा बाहेर टाकला जाणारा पदार्थ म्हणजे 'मल '
शरीरात रस ,रक्त ,मांस,...असे सात धातू आहेत ,त्यांचे पण मल आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत.
या ठिकाणी आपण मुख्य मलांविषयी माहीती घेणार आहोत.
मलाचा अवष्टंभ म्हटला की फक्त पोट साफ न होणे एवढाच अर्थ होतो का ???
तर नाही ,मल तीन असतात.
पुरीष
स्वेद
मुत्र
हे तिन्ही मल शरीराच्या बाहेर योग्य प्रमाणात,योग्य वेळी बाहेर न पडणे म्हणजे अवष्टंभ म्हणू शकतो.
आपल्याला रोज मल प्रवृत्ती होतेय का,कोणत्या वेळी होतेय,किती वेळ लागतोय,होतांना पोटात दुखतेय का, जाऊन आल्यावर काही त्रास होतोय का तसेच
आपल्याला घाम येतोय का किंवा अजिबातच येत नाही आहे किंवा अधिक प्रमाणात येतोय ,याकडे आपले बरेच वेळा दुर्लक्ष होते ,तसेच मूत्र प्रवृत्तीच्या बाबतीत ही होते.
प्रत्येकाने वार्षिक investigation करण्याअगोदर
आपले दैनंदिन दिवसातील हे सहज होणारे ,खर्चीक नसणारे स्वतः चे परीक्षण केले तर योग्य उपाय योजना करुन हे लक्षण चिरकालीन म्हणजे जीर्ण अवस्थेत जाण्या आधी आपण दूर करु शकतो.
कुठलाही व्याधी होण्या आधी शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवतात तसेच मलाचा अवरोध हा व्याधी नसून अनेक व्याधीचे पूर्वरुप म्हणजे व्याधी होण्याअगोदरच्यालक्षणांमध्ये यांचा अंतर्भाव आहे .
म्हणजे हे स्पष्ट होते की जर आपण मलावष्टंभ वेळीच दूर केला तर अनेक व्यांधींपासून सहजच दूर राहू शकतो.


मलावष्टंभ दूर होण्यासाठी चुकीचे केले जाणारे प्रयोग

सकाळी उठल्यावर व दिवसभरात गरज नसतांनाही अधिक पाणी पिणे
प्रमाणाच्या बाहेर गरम पाणी वारंवार सेवन करणे
चहा , कॉफी, सारखे पेय पदार्थ अधिक घेणे
सिगरेट ,तंबाखू,मिस्त्री सारखे पदार्थ अधिक सेवन
हिरवी मिरची ,तिखट पदार्थ अधिक आहारात घेणे
वारंवार त्रिफळा चूर्ण ,पोटसफा सारखे चूर्ण अधिक प्रमाणात घेणे
अधिक प्रमाणात लंघन, उपवास करणे
यासारखे अनेक चुकीच्या गोष्टी करुन आपण आतड्यांना अधिक रुक्षता आणतो व मलावष्टंभ दूर होण्या ऐवजी अजून च वाढतो.

याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात

तोपर्यंत एक महत्त्वाची सुचना

आपल्या मुलांना लहान पणा पासूनच स्वतः घ्या शरिराचे निरिक्षण करण्यास शिकवूया
आहारात कोरडे पदार्थ न घेता स्निग्ध पदार्थ जास्त घेऊया
काय खाल्ले की काय त्रास होतो हे त्यांचे त्यांनाच कळेल व आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश होऊन कुरकुरे सारखे रुक्ष पदार्थ दूर होतील
व प्रतिकार क्षमता आपोआप निर्माण होईल.

जाणुन घेऊया पुढील भागात

मलावष्टंभाची प्रमुख कारणे
प्रमुख लक्षणे

स्वस्थ रहा ,मस्त रहा
जय आयुर्वेद 🙏🙏😊

वरद आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय
नाशिक,८९९९९६४५३७

पचनसंस्था - ''आम'' संकल्पना         'पचनसंस्था' या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे ,आपण या ठिकाणी फक्त  त्याबद्दल अल्पशी म...
14/11/2021

पचनसंस्था - ''आम'' संकल्पना

'पचनसंस्था' या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे ,आपण या ठिकाणी फक्त त्याबद्दल अल्पशी माहीती घेणार आहोत.
मुखापासून गुदापर्यंत एकच नलिका ,फक्त आकार ,त्यात होणारे स्त्राव,त्यांचे कार्य वेगवेगळे.
अन्न ग्रहण करणे,ते व्यवस्थित एकत्र करुन त्यावर पाचक रसाची प्रक्रिया ,अग्निचा संस्कार करणे, त्यापासून उत्तम प्रतिचा आहार रस तयार करणे ,त्यातील त्याज्य भाग वेगळा करुन ते मलाद्वारे शरीरा बाहेर काढणे ,या प्रकारचे अनेक कार्य या नलिका द्वारे होत असते.
यात तयार होणा-या आहार रसापासून पुढे शरिरातील पुढील रस, रक्त ,मांस...यासारखे धातू निर्मिती होत असते म्हणूनच हा आहार रस प्राकृत, उत्तम प्रतिचा असणे आवश्यक आहे. हा रस प्राकृत तयार होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत
जसे
-भोजन शिजवणारे व्यक्तिचे विचार,त्यांचे ते अन्न शिजवतांना असणाऱ्या भावना
-भोजन ग्रहण करतांना आपली मनस्थिती
-भोजनात असणारे पदार्थ म्हणजे ताजे अन्न,शिळे अन्नपदार्थ, तळलेले, आंबवलेले
-गोड,आंबट ,खारट ,तुरट ,कडू ,तिखट यापैकी कुठला रस अधिक आहे यावर
-आहारात पचण्यास अतिशय जड पदार्थ किंवा लवकर पचणारे पदार्थ असणे
-ऋतुनुसार योग्य असणारा आहार
-भोजन करतांना खूप घाईघाईने खाणे, खूप निवांत पण खाणे, अधिक बोलणे, खूप पाणी पिणे,अथवा अजिबात न पिणे
-आहारात अतिशय कोरडे पदार्थ खाणे,किंवा अतिशय पातळ पदार्थ खाणे
या सारखे असंख्य कारणे ज्यावर आहार रसाची निर्मिती अवलंबून असते.
दैनंदिन जीवनात आपल्याकडून काहीतरी अपथ्य होतच असते,त्याचा परिणाम म्हणून शरिरात 'आम' तयार होत असतो व हाच 'आम' म्हणजे न पचलेला आहार रस,जो उत्तरोत्तर तयार होणा-या धातूंमध्ये पण जात असतो व विविध व्याधींनी निर्मिती होत असते,अगदि सर्दी सारखे विकार जीर्ण होतात, मधुमेह, हृदयविकार ही याच जीर्ण, संचित आमामुळे होऊ शकतात.
विनाकारण आळस येणे,शरीर जड वाटणे,उत्साह न वाटणे,अंग दुखत राहणे, ताप आल्यासारखे वाटणे या सारखे लक्षणे 'आम 'असल्याचे दर्शवितात.
यावर आयुर्वेदात लंघन, पाचन,शोधन या सारखे उपक्रम आमाची चिकित्सा सांगतांना सांगितले आहेत.
शोधन करतांना सर्व दोष याच नलिके मध्ये एकत्र केले जातात व मुखाद्वारे किंवा गुदमार्गाद्वारे शरीराच्या बाहेर काढले जातात.
रोजच्या धावपळीच्या जीवनात सर्व पथ्य पाळले जातातच असे नाही , म्हणूनच आपण या तयार होणा-या आमाचे पाचन रोजच थोडा व्यायाम करुन,दिवसा न झोपून करु शकतो , प्रकृतीनुरूप आहारातील पथ्य पाळून,लंघन करुन करु शकतो .
आयुर्वेदात ऋतुनुसार शोधन या विकारांपासून लांब राहण्यासाठीच सांगितले गेलेले आहेत,जेणे करुन तयार होणारे विकृत दोष वेळोवेळी शरीराच्या बाहेर जावेत व प्राकृत दोष ,धातु शरीरात तयार व्हावेत.
आयुर्वेद रोजच्या जीवनात आणुन आपले जीवन निरोगी करणे काळाची गरज आहे.

पुढील भागात आपण मलबध्दता याबद्दल जाणून घेऊ.

धन्यवाद 🙏

'वरद'आयुर्वेद व पंचकर्म‌‌‌ कॉस्मेटिक चिकित्सालय
नाशिक ७
८९९९९६४५३७/९४२०००२२३७६

11/11/2021

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919420002376

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center:

Share