23/04/2023
उष्माघात( HEATSTROKE)
उष्माघात( HEATSTROKE) ही एक स्थिती आहे जी तुमच्या शरीराच्या अतिउष्णतेमुळे उद्भवते, सामान्यत: उच्च तापमानात दीर्घकाळापर्यंत किंवा शारीरिक श्रमामुळे.जर तुमच्या शरीराचे तापमान 104 F (40 C) किंवा त्यापेक्षा जास्त वाढले तर उष्माघात होऊ शकतो.
उष्माघातासाठी आपत्कालीन उपचार आवश्यक आहेत. उपचार न केल्याने उष्माघातामुळे तुमचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना लवकर नुकसान होऊ शकते. उपचाराला उशीर झाल्यास नुकसान अधिकच बिघडते, ज्यामुळे तुमचा आजारात अधिक भर किंवा मृत्यूचा धोका वाढतो.
लक्षणे:
1. शरीराचे तापमान १०४ F किंवा त्यापेक्षा जास्त असणे.
2. अस्पष्ट बोलणे, चिडचिड, उन्माद, मानसिक बदल, भ्रम आणि कोमा या सर्व गोष्टी उष्माघातामुळे होऊ शकतात.
3. हिट स्ट्रोक मध्ये घाम बाहेर पडत नसल्याने आपली शरीराची त्वचा कोरडी किंवा गरम पडत असते
4. मळमळ किंवा उलटी होणे व चक्कर येणे.
5. श्वसाचा वेग वाढणे.
6. नाडीचा वेग वाढणे.
7. बेशुदधावस्थेत जाणे
प्रथमोपचार:
1. सर्वप्रथम त्या व्यक्तीला सुर्यापासुन दुर एखाद्या झाडाखाली सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे.
2. त्याव्यक्तीच्या अंगातील कपडे सैल करावीत किंवा काढुन टाकावी.
3. त्या व्यक्तीचे सर्व अंग थंड पाण्याने पुसुन काढावे किंवा त्याला कुलर/पंख्याखाली बसवावे.
4. जर त्या व्यक्तीला १०४ फॅरेनाईट पेक्षा अधिक ताप आढळून आला तसेच बेशुद्ध, भ्रम, आक्रमकता अशी लक्षणे त्याच्यात दिसून आली तर ताबडतोब जवळील रुग्णालयात हलवावे
उष्माघातापासून बचाव:
1. भर कडक उन्हात म्हणजे दुपारी १० ते ४ वाजेच्या दरम्यानच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळावे
2. चहा कॉफी मद्य तसेच सॉफ्ट ड्रिंक ही साखर युक्त पेये घेणे टाळावे.याने आपल्या शरीरातील पाणी कमी होत असते.
3. सौम्य रंगाचे खादीचे सैल कपडे उन्हाळ्यात वापरावे.जिन्स वगैरे सारखे टाईट कपडे परिधान करणे टाळावे.
4. घराबाहेर पडताना उषणतेचा डोळयांना शरीराला त्रास होऊ नये म्हणून गाॅगल टोपी रूमाल किंवा छत्री सोबत ठेवावी.
5. प्रवासादरम्यान नेहमी पाणी जवळ ठेवावे