
24/10/2022
*खुब्याचा आजार / AVN ( Avascular Necrosis) *
पूर्वी क्वचित आढळणारा खुब्याचा आजार कोवीड नंतर मात्र अनेक पटीने वाढलेला आहे. स्टिरॉइडस् चा वापर हे यामागचे प्रमुख कारण आहे. अनेकांमध्ये वाढलेला वात हे कारण आढळते.
पूर्वी हा आजार कमी प्रमाणात होता मग हल्ली हा आजार का वाढला असेल याचा विचार केला असता खालील ३ गोष्टींचा विचार करणे आवश्यक वाटले
१) कोवीड मुळे शरीरावर झालेले दुष्परिणाम
२) रेमडेसिवीर, स्टिरॉइडसचा अतिवापर
३) लसीकरण
लसीकरण केल्यानंतर अनेकांनाअंगदुखी सुरू झाली आणि पुढे ती वाढत जाऊन हाडाचे आजार , AVN यासारख्या आजारात वाढ आढळून आली.
स्त्रीयांपेक्षा पुरूषांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते . २५-३५ या वयातील तरूणांमध्ये याचे प्रमाण हल्ली जास्त आढळून येते .
यामध्ये प्रामुख्याने मांडीच्या हाडाचे शिर्षाची ( डोक्याची) झीज होते, तसेच त्या ठिकाणचा रक्तपुरवठा कमी होतो , खुब्याच्या सांध्यातील वंगण कमी होऊन सांध्याची झीज होते, आजार वाढल्यानंतर कालांतराने हाड कुजण्यास सुरूवात होते.
लक्षणे:
खुब्यात दुखणे,
चालताना लंगडत चालणे,
मांडी घालता न येणे ,
दुचाकीवर बसता न येणे,
आजार वाढल्यावर काठीच्या आधाराने चालावे लागणे,
एक किंवा दोन्ही पाय कंबरेपासून खाली दुखणे.
उपाय:
आज हा लेख लिहीण्याचे कारण म्हणजे खुब्याचा आजार हा आयुर्वेद
उपचाराने बरा होऊ शकतो हे सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.
कोवीड नंतर शेकडो लोकांना आपण या आजारातून बाहेर काढू शकलो . अनेक रूग्ण डॉ नी ऑपरेशन चा सल्ला दिल्यानंतर ,ऑपरेशन टाळता येते का यासाठी आयुर्वेद उपचार आहेत का म्हणून आले आणि ३ री स्टेज असलेले रूग्ण सुद्धा यातून आयुर्वेद उपचार व स्वनिर्मीत S1 तेलाचा बस्ती यामुळे सहीसलामत बाहेर पडले . वेदनाशामक गोळ्यांनी तात्पुरता आराम पडलेल्या रूग्णांना भविष्यात खुब्याचे ऑपरेशन हे जवळपास करावेच लागते, बहुतांश रूग्णांमध्ये दोन्ही खुब्याची झीज आढळून येते , परंतु आयुर्वेदाने या आजारातून कायमची मुक्तता होऊ शकते .
पथ्य:
प्रवास टाळावा,
व्यायाम करणे टाळावे,
कमीतकमी चालावे,
दुचाकीची किक मारणे टाळावे ,
जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी ,
कष्टाची कामे करू नयेत,
जास्त वेळ मांडी घालून बसू नये.
वैद्य आबासाहेब रणदिवे,
एम डी आयुर्वेद .
वैद्य अमृता रणदिवे,
आयुर्वेदाचार्य
१)पंढरपूर :
श्री विश्वरंग आयुर्वेद चिकीत्सालय व पंचकर्म सेंटर, १ ला मजला , पंढरपूर ( सोमवार ते शनिवार)
शाखा:
२)पुणे :
- २ रा व ४ था शनिवार
श्री विश्वरंग आयुर्वेद, गुरूदत्त सोसायटी, २ रा मजला ,HP पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, स्वारगेट चौक पुणे.
३)ठाणे:
दर महीन्याचा ४ था रविवार
श्री विश्वरंग आयुर्वेद , Adhijon , १ ला मजला, वंदना बसस्टॉप जवळ, चरई सिग्नल, LBS मार्ग , ठाणे(प)
४)दादर:
दर महीन्याचा २ रा रविवार
आडकर पॉलीक्लिनीक, शिवसेना भवन जवळ , दादर(प)
मो : 9890472035
9561043187