KARAD Hospital Parli

KARAD Hospital Parli MULTI SPECIALTY, HOSPITAL GENERAL MEDICINE,GYNECOLOGIST, Ultrasonography CENTRE

वाढत जाणारे वजन  आणि त्यामुळे होत असलेल्या शरीरातील हार्मोन्सचा Imbalance, त्यामुळेच पाळी वेळेवर न येणे किंवा खूप रक्तस्...
07/02/2025

वाढत जाणारे वजन आणि त्यामुळे होत असलेल्या शरीरातील हार्मोन्सचा Imbalance, त्यामुळेच पाळी वेळेवर न येणे किंवा खूप रक्तस्त्राव होणे किंवा खूप कमी होणे पीसीओडी सारखा सिंड्रोम असणे आणि त्यातूनच पुढे वंध्यत्वाची समस्या येणे असे अनेक प्रॉब्लेम्स मध्ये indicator असतो तो आपल्या शरीरात वाढणारा बीएमआय. या समस्या भविष्यात होतील की नाही यासाठी आज कराड हॉस्पिटल येथे मोफत बी एम आय मोजणी व वाढला असेल तर त्यावर सल्ला व उपाय असे शिबीर पार पडले.

आज नव्या वर्षाची सुरुवात दोन सुंदर मुलींचा जन्म  आमच्या कराड हॉस्पिटलमध्ये झाला.एक अवघड गुंतागुंत असणाऱ्या गरोदर स्त्रीच...
01/01/2025

आज नव्या वर्षाची सुरुवात
दोन सुंदर मुलींचा जन्म आमच्या कराड हॉस्पिटलमध्ये झाला.
एक अवघड गुंतागुंत असणाऱ्या गरोदर स्त्रीची नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ आणि आई दोन्ही सुरक्षित आहेत.
Thanks god for giving me apportunity to handle this cases succesfully and serve the needy people.

कराड हॉस्पिटल परळी वैजनाथ यांचे संकेतस्थळ / वेबसाईट  भेट द्या
01/12/2024

कराड हॉस्पिटल परळी वैजनाथ यांचे संकेतस्थळ / वेबसाईट भेट द्या

01/12/2024

आमच्या कराड हॉस्पिटल हे यश हार्ट केअर सेंटर मॅटरनिटी नर्सिंग होम परळी वैजनाथ येथे
एकाच दिवशी दोन दोन मोठे ऑपरेशन केले, एका महिलेचा बीज कोषाचा मोठा ट्यूमर अर्थात मोठी गाठ(ovarian tumor) साधारणतः पाच ते सहा किलो ची.. operation आम्ही पूर्णपणे मोफत केले. फक्त औषधाचा आणि भुलतज्ञ यांच्या खर्च घेतला
दुसरे ऑपरेशन, गर्भाशयाची पिशवीची गाठ साधारणता सात ते आठ किलो ची काढली (fibroid of uterus)
या दोन्ही ऑपरेशन मध्ये मोलाची साथ दिली ते आमचे भुलतज्ञ डॉक्टर लक्ष्मीनारायण लोहिया व डॉक्टर आर्षद शेख सर.यांची
हृदयरोग तज्ञ
डॉक्टर बालासाहेब कराड, माझे सहयोगी स्त्री रोग तज्ञ डॉ प्रज्ञा मुंडे ढाकणे डॉ यश कराड ,डॉ प्रतीक्षा बावरे व डॉ गंगाराम डोंगरे व कराड हॉस्पिटल येथील सर्व स्टाफ. या सर्वांनाच ऑपरेशन सहज शक्य झाले.

परळी मेडिकल असोसिएशन तर्फे मी व  pma चे सचिव मनोज मुंडे व डॉ राजाराम  मुंडे यांनी परळी परिसरातील एक हजार कर्णबधिर रुग्णा...
07/10/2024

परळी मेडिकल असोसिएशन तर्फे मी व pma चे सचिव मनोज मुंडे व डॉ राजाराम मुंडे यांनी परळी परिसरातील एक हजार कर्णबधिर रुग्णांना श्रवणयंत्रे वाटप केल्याबद्ल डॉ संतोष मुंडे यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या समवेत सत्कार केला.

कराड हॉस्पिटल परळी वैजनाथ :::रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !! ========================आज आणखी एक अवघड अशी शस्त्रक्रिया करण्याच...
07/10/2024

कराड हॉस्पिटल परळी वैजनाथ :::रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!
========================
आज आणखी एक अवघड अशी शस्त्रक्रिया करण्याचा योग आला गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाला मोठी गाठ होती . साधारणता 3 किलो ची गाठ होती त्याला आमच्या भाषेत cervical fibroid म्हणतात .ती गाठ काढणे म्हणजे फार गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. कारण ती गाठ काढताना मूत्रनलिका डॅमेज होऊ शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात मूत्राशय ओपन होऊ शकते. गाठ सहसा सहज काढता येत नाही. खूप रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा जीव पण जाऊ शकतो. पण हे गाठ काढण्याचे दिव्य शस्त्रक्रिया आज आमच्या कराड हॉस्पिटलमध्ये मी केली. यात मोलाचे सहकार्य लाभले ते भुलतज्ञ डॉक्टर हर्षद शेख तसेच मला नेहमीच प्रोत्साहित करणारे आणि किती अवघड पेशंट असला तरी तू कर मी आहे ना असं म्हणणारे माझे पती हृदयरोग तज्ञ फिजिशियन डॉक्टर Balasaheb Karad . मला नेहमीच माझ्या सोबत ऑपरेशन मध्ये करणारी dr Pradnya Dhakane Munde ,dr Pratiksha Baware ,dr Prerana Baware आणि माझा बेस्ट असिस्टंट डॉक्टर Gangaram Dongre आणि माझा कराड hospital मधील संपूर्ण स्टाफ .

Address

OPP SAI PALACE, NEAR RELIANCE SMART POINT, BUS STAND Road
Parli Vaijnath
431515

Alerts

Be the first to know and let us send you an email when KARAD Hospital Parli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram