17/09/2022
आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाटोदा शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आजच्या रॅलीचे आकर्षण म्हणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महापुरुषांच्या वेशभूषा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये उत्साहामध्ये आपला सहभाग नोंदवला शाळेच्या प्रांगणावर चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी ही भाषा सोपी व्हावी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळावे व भविष्यात इंग्रजी विज्ञान गणित या विषयाची विद्यार्थ्यांना चांगली तयारी करता यावी म्हणून मुख्याध्यापक श्री तुपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री नागरगोजे एम आर सर यांनी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या मदतीने शाळेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द लिखाण व पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये शाळेतील बहुतेक सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून शब्दाचे लिखाण व पाठांतर केले या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी गटांमध्ये भूषण भीमराव डीडुळ 9700 शब्द प्रथम क्रमांक,मडके आदर्श सुशील 9255 शब्द द्वितीय क्रमांक, कुमारी गीते अंजली हरिकृष्ण 2200 शब्द ,शिंदे अविनाश दत्ता 8057 शब्द, काळे राजू धर्मराज 8500 शब्द, काळे किरण भागवत 6410 शब्द नाईकनवरे पूनम लहू 4710 शब्द ,आठवी ते दहावी गटामध्ये प्रथम क्रमांक भवर गोकुळ उद्धव 21000 शब्द, द्वितीय क्रमांक कुमारी गीते साक्षी रामदास 18600 शब्द, तृतीय क्रमांक कुमारी खंडागळे वैष्णवी नानासाहेब 13400 शब्द उत्तेजनार्थ कुमारी नाईक नवरे पूनम लहू 4710 शब्द ,बोबडे ओंकार रमेश 2480 शब्द, कुमारी नागरे अंकिता बाबासाहेब 1120शब्द, कुमारी तांबे आकांक्षा अशोक 11300 शब्द, कुमारी तांबे धनश्री जालिंदर 9000 शब्द, कुमारी तांबे श्रावणी प्रमोद 6400 शब्द या सर्व गुणवंत विद्यार्थ्यां चा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला तसेच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा पुणे या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा या विद्यालयाचे विद्यार्थी कुमारी थोरवे समृद्धी संतोष राज्यात प्रथम कुमारी आर्या कानिफनाथ जायभाय राज्यात पाचवीच्या वर्गात प्रथम, कुमारी स्वरा संजय राख पाचवीच्या वर्गात राज्यात चॅम्पियन अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते चषक ट्रॉफी प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला ज्युनियर आयएएस कॉम्पिटिशन परीक्षा 2021- 22 मध्ये महाराष्ट्रात इयत्ता चौथीच्या वर्गात तृतीय क्रमांक मिळवणारी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी उत्कर्षा कल्याण पाळवदे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री तुकाराम तुपे सर पर्यवेक्षक श्री मस्कर सर विज्ञान विभागाचे प्रमुख श्री घुमरे सर गणित विभागाचे प्रमुख श्री मुंढे सर,श्री संजय राख सर, श्री गर्जे सर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री पंडित जायभाय सर ,श्री गव्हाणे सर, श्री मगर सर, श्री नंद सर इंग्रजी विभागाचे प्रमुख श्री मोराळे सर, श्री हंगे सर , श्रीमती मस्के मॅडम श्रीमती मिसाळ मॅडम श्रीमती केंगार मॅडम , शिंदे विभागाचे प्रमुख श्री शेख गणी सर श्री शिरसाट सर श्री खेडकर सर ,छत्रपती शाहू महाराज परीक्षा विभागाचे प्रमुख श्री राजगुरू सर, धस सर श्री पाखरे सर श्री जाधव सर सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते या सुंदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे