Mymind Emotional Wellbeing and Mental Health care Center

Mymind Emotional Wellbeing and Mental Health care Center Mymind Emotional Wellbeing and Mental Health care center . Its a support to all for boosting their emotional mental and psyical health through different skills.

Techniques, videos, writeups and do on.. �

18/02/2025
© *आयुष्यात नकारात्मकता येण्याची 7 कारणे*  या माझ्या लेखावर बऱ्याच जणांनी मला उपायाबाबत विचारलं.सर्वप्रथम लक्षात घ्या, *...
06/06/2024

© *आयुष्यात नकारात्मकता येण्याची 7 कारणे* या माझ्या लेखावर बऱ्याच जणांनी मला उपायाबाबत विचारलं.

सर्वप्रथम लक्षात घ्या,
*नकारात्मकता संपूर्ण पणे नष्ट करण्यापेक्षा ती नियंत्रित करण्याकडे आपला कल असायला‌ हवा कारण सकारात्मकता आणि नकारात्मकता या आयुष्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या असणंही महत्वाचं आहे.*
*जसं सुख आणि दुःख हे सोबत असतं हे आपल्याला मान्य असतं तसंच हे ही आपल्याला मान्य असायला हवंय .*

नकारात्मकतेची 7 महत्वाची कारणं यातल्या प्रत्येक कारणावर एक लेख लिहीण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.

त्या लेखातल पाहिलं कारण असं होत.

*1.परिपूर्णतेचा अट्टाहास बाळगणे*
( Perfectionism)

माणसांनी नेहमी परिपूर्ण असावं असं कित्येक ठिकाणी ऐकत असतो. पण परिपूर्णता म्हणजे काय?
त्याचा exact अर्थ काय ?
असे विचार आपण करत नाही. कारण लहानपणापासून आपल्याला परिपूर्ण असणं म्हणजे सर्वगुणसंपन्न आणि ऑल राऊंडर असणं एवढच माहीत आहे. खूप लोकांकडून तेच ऐकलं गेल्यामुळे मनात तेच कंडिशन्ड झालेलं आहे. त्यावर स्वतः हून विचार करावा‌ असं‌ आपल्याला वाटत नसतं.
परिपूर्ण असणं म्हणजेच आयुष्यात यशस्वी असणं असाही कित्येक लोकांचा समज असतो. मनात,डोक्यात तेच भरलं गेलं असल्यामुळ परफेक्शनिस्ट होण्याचं भूत कित्येकांच्या मानगुटीवर बसतं. परिणामी मग जे हातात घेईल ते काम कसं परफेक्ट च होईल याकडे अशा लोकांचा कल‌ वाढतो.
सगळं कसं अगदी परफेक्ट च पाहिजे हा अट्टाहास बाळगताना अनेकदा मानसिक, शारिरीक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक नुकसान आपल्याला भेडसावू शकते. जसं‌ की, सगळं परफेक्ट च्या नादात काम करण्यातला आनंद, समाधान, सुख ही वृत्ती लोप पावते. यामुळे अतिरिक्त ताणाचा सामना माणसांना करावा लागतो त्या ताणातून शारीरिक, मानसीक आजार जन्म घेतात. हाती घेतलेलं काम रखडलं त्याचा ही पुन्हा ताण येतो आणि माणूस त्यातच गुंतून पडतो किंवा समस्येच्या वर्तुळात अडकून पडतो. बर्याच वेळा काम व्हावे या पेक्षा ते कसं परफेक्ट होईल या विचारातच माणूस गुंतला जातो आणि हातून कोणतीच कृती घडत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा मानसिक आणि शारीरिक ताणाचा अनुभव‌ माणूस घेतो. एकूणच व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो.

आता हा नकारात्मक परिणाम कमी कसा करायचा याबद्दल काही कृती आपण करु शकतो..

1. Patfectionism ची तुमची व्याख्या काय? परफेक्ट असण म्हणजे काय ? त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता ? हे एकदा तपासून पाहावं.

2. या जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते हे मान्य करायला शिका.

3. कोणतीही गोष्ट शिकून, आत्मसात करणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकलेल्या गोष्टीचा सराव हा सातत्यपूर्ण ठेवून संयमाने पूर्ण करणे. यातूनच पूर्णत्व प्राप्त होते.पण या पूर्णत्वाला सुध्धा परिपूर्ण समजू नये.जर अशी चूक आपल्याकडून झाली तर त्याबद्दल पराकोटीची अपराधी भावना आपल्यात निर्माण होते जसे की, एवढं शिकून माझा काही उपयोग नाही. अमुक एक साधी गोष्ट माझ्याकडुन चुकू कशी शकते याचा ही माणसाला guilt येतो आणि मानसिक आरोग्यावर आघात होतो.

4. Psychology मध्ये एक belife of grandure म्हणजे ' महानतेची धारणा बाळगणारे ' अशी एक संकल्पना आहे त्या संकल्पने नुसार जे व्यक्ती महानतेची धारणा बाळगणारे असतात त्यांच्यामध्ये ही perfect असण्याची भावना जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्ती स्वतःची मी कुणीतरी महान आहे किंवा मी म्हणजे अगदी परमेश्वर च आहे अशी समजूत घालून बसलेले असतात. आपण ही कधीतरी चुकू शकतो हे त्यांना अजिबात मान्य नसतं त्यामुळे त्यांच्या कडून होणारी अगदी साधीशी चूक सुद्धा त्यांचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. तेंव्हा आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत आणि आपल्याकडून देखील चूक होऊ शकते हे व्यक्तीने स्वतःशी मान्य करणे अत्यंत गरजेचे आहे.

5. सर्व ठिकाणी सर्व कामात आपल्याल परिपूर्णता मिळणार नाही, चुका होत राहणार आणि त्या चुका मधून आपण शिकत राहणार असा दृष्टिकोन आपल्या अंगी बाणवून घ्यायला हवा.

6. दुसऱ्या लोकांच्या मताचा आदर करायला शिका.
बऱ्याचदा हे Perfectionist अहंकारी वर्तन करताना दिसून येत असतात त्यांना त्यांच्या कामात कुणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही. त्यांना चूक ठरवलेलं आवडत नाही. त्यांनी ठरवलेल्या पद्धतीने च काम व्हावं असा ही अट्टाहास असतो. त्यामुळे दुसऱ्याच ऐकून घ्यावं, त्यांचं मत विचारात घ्याव हे त्यांना चूक वाटतं आणि त्यांचा कल स्वतः च्या मनाचं खर करण्यात जातो ज्यामुळ त्यांचं सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक नुकसान ही होऊ शकत.

हया काही tips आहेत ज्यामुळे आपण हा परफेक्ट होण्याचा अट्टाहास नियंत्रित करू शकतो..

लक्षात घ्या,
*कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुम्हाला शेवटी सर्वनाशाकडे घेऊन जातो, यासाठी तुमच्या इच्छा, तुमचा ध्यास, धारणा, दृष्टिकोन यात सजगता असणे महत्त्वाचे आहे..*
Cp.

*मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय*“अगं सोनू, किती वेळ झाला टीव्हीपुढे बसली आहेस” किंवा “अरे...
03/06/2024

*मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय*

“अगं सोनू, किती वेळ झाला टीव्हीपुढे बसली आहेस” किंवा “अरे पिंटु, केव्हाचा गेम खेळतो आहेस मोबाईलवर, जरा बाजूला ठेव तो फोन”
घरोघरच्या आई-बाबांचा असा ओरडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो.
मुले ऐकत नाहीत, चांगल्या सवयी लावून घेत नाहीत अशा तक्रारी पालक नेहेमीच करत असतात.
मुले टीव्हीसमोर बसून वेळ घालवतात, व्यायाम करत नाहीत, तसेच जंक फुडचं प्रमाण फार आहे, पौष्टिक खाणे नको असते ह्या अगदी कॉमन तक्रारी आहेत.
त्यातून सध्याचा लॉकडाऊनचा काळ, म्हणजे मुलांना बाहेर जायची, खेळायची पण परवानगी नाही. त्यामुळे मुले हट्टी आणि चिडचिडी नाही झाली तरच नवल.
त्यातून आई बाबा दोघेही कामात बिझी.
मुलांसमोर टीव्ही, मोबाइल, विडिओ गेम शिवाय पर्याय तरी काय उरणार मग.
पण थांबा, आपल्याकडे ह्यावर उपाय आहे, मुलांना चांगल्या, हेल्दी सवयी लावण्यासाठी काय करता येईल ते आपण आज ह्या लेखात पाहूया.
लहान मुले अनुकरणप्रिय असतात हे तर आपल्याला माहीत आहेच.
एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो.
त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो.
मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो.
त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.
१. *संपूर्ण कुटुंबाने मिळून चांगल्या सवयी लावून घ्या*
मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कुटुंबाचा खूप प्रभाव असतो.
कुटुंबातील व्यक्ति जशा वागतील तसेच वागण्याकडे मुलांचा कल असतो.
त्यामुळे आई बाबांनी स्वतः चांगला आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, टीव्ही, मोबाइल वर जास्त वेळ न घालवणे अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
तसेच पालक म्हणून मुलांच्या मतांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना पुरेसा वेळ देणे हे केले पाहिजे.
त्यामुळे मुले देखील पालकांच्या चांगल्या सवयी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील.
२. *दिवसाचे रुटीन ठरवताना मुलांना सहभागी करून घ्या*
दिवसभरातील जेवणाचे पदार्थ ठरवताना मुलांना सहभागी करून घ्या.
पौष्टिक तरीही चविष्ट आणि आवडीचे पदार्थ कसे बनवता येतात ते मुलांना समजावून सांगा, तसेच एखादा पदार्थ बनवताना लागणारी पूर्वतयारी करायला मुलांची मदत घ्या.
त्यामुळे चांगला आहार घेण्यासाठी मुलांचा उत्साह वाढेल.
तीच गोष्ट व्यायामाची, नुसते व्यायामाचे महत्व सांगून ते पटणार नाही, रोज काय व्यायाम करायचा ह्याचे वेळापत्रक मुलांना करायला द्या.
तुम्ही मुलांबरोबर त्यांनी निवडलेले व्यायाम करा. त्यामुळे खुश होऊन मुले उत्साहाने व्यायाम करू लागतील.
३. *मुलांना खाऊचे आमिष दाखवू नका*
कोणत्याही कामासाठी मुलांना चॉकलेट किंवा बिस्किटाचे आमिष दाखवू नका.
तसेच कोणतेही पदार्थ हे चांगले किंवा वाईट ह्या प्रकारात टाकू नका.
तसेच गोड किंवा तत्सम पदार्थ मुलांना अजिबात द्यायचे नाहीत असे देखील करू नका.
त्यामुळे मुलांना त्या पदार्थांची जास्तच ओढ वाटते आणि ते पदार्थ गुपचुप घेऊन खाण्याकडे त्यांचा कल वाढतो.
त्यामुळे मुलांचे वजन वाढण्याचा धोका असतो. थोड्या प्रमाणात सर्व पदार्थ खाणे हे सर्वात चांगले आहे.
४. *मुलांना खूप खाण्याचा आग्रह करू नका*
प्रत्येक मूल हे निराळे असते आणि प्रत्येक मुलाची भूक वेगवेगळी असते.
तसेच वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांमध्ये बदल होत जातात त्यामुळे त्यांचे खाण्याचे पॅटर्न, सवयी बदलत जातात.
त्यामुळे पोट भरल्यानंतरही आणखी खाण्याचा आग्रह मुलांना करू नका.
तसेच इतर मुलांच्या खाण्याशी त्यांची तुलना करू नका.
एखादी नावडती भाजी मुलांना बळेच खायला लावू नका.
त्यामुळे मुलांच्या मनात त्या भाजीबद्दल कायमची नावड उत्पन्न होईल.
त्याऐवजी वेगळ्या स्वरूपात ती भाजी खाऊ घालण्याचा प्रयत्न करा.
मुलांना संपूर्ण पोषण मिळत आहे ना याकडे लक्ष द्या पण त्यांना आवडू शकतील असे पदार्थ देऊन.
५. *संपूर्ण कुटुंबाचा सहभाग महत्वाचा*
मुलांच्या जडणघडणीत आई, बाबा, आजी आजोबा, मोठी भावंडे ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा असतो.
त्यामुळे सगळ्या कुटुंबाची मिळून एखादी ऍक्टिव्हिटी ठरवणे, सगळ्यांनी मिळून व्यायाम करणे किंवा शक्य असेल तेव्हा (सर्व नियम पाळून ) बागेत जाणे, फिरायला, पळायला जाणे ह्याचा मुलांना चांगल्या सवयी लागण्यावर खूप सकरात्मक परिणाम होतो.
सगळेच करत आहेत असे दिसल्यावर मुलांनाही ते काम करण्याचा उत्साह येतो.
तर असे सगळे प्रयत्न करून आपण आपल्या मुलांना आरोग्यपूर्ण सवयी लावू शकतो.
त्यांच्याबरोबर वेळ घालवून त्यांना आनंद देऊ शकतो.
त्यांचा मोबाइल, टीव्ही पुढे वाया जाणारा वेळ काही चांगल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सत्कारणी लावू शकतो.
मुलांना चांगल्या सवयी लावू शकतात तेच चांगले पालक, नाहीत का? चला तर मग आपणही असे पालक बनूया.

28/05/2024

स्वयंम को खुष रखना दुनिया का सबसे बड़ा काम है और हमारे दुख का भी।

Rational Thinking.. REBT
22/05/2024

Rational Thinking.. REBT

मराठी पुस्तक परिचय, मी अल्बर्ट एलिस

लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन र...
22/05/2024

लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.

चर्चमधे काम करणा-या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता.

डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले.

डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.

एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्डस्ट्रीटवर कूठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही.

शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. 'आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर ?' डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.
त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला.

त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणा-या ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली.
अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला.

पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व ‘डनहिल’ या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.

त्याच्या सिगारेटससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणा-या शेतक-यांबरोबर अॅग्रीमेन्ट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतक-यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते.

या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती.
हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले,

‘सर. हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते ?’

डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहीता वाचता आले असते तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो’
*आजसुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.*
*अन ही खरी गोष्ट आहे.*

Copy Paste

Address

Pune Cantonment

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mymind Emotional Wellbeing and Mental Health care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mymind Emotional Wellbeing and Mental Health care Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram