Being With you

  • Home
  • Being With you

Being With you Hello all...

"Being With You" is a helping hand to patients relatives. We provide 3 hrs of services

BeingWithYou HELP Foundation चे स्वयंसेवक होण्या साठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. BeingWithYou HELP Foundation २०१...
23/04/2025

BeingWithYou HELP Foundation चे स्वयंसेवक होण्या साठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत.
BeingWithYou HELP Foundation २०१९ पासून रुग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिकांना घरी अथवा हॉस्पिटल मधे ३ तासांची सोबती ही विनामुल्य सेवा उपलब्ध करून देत आहे. संस्थे मधे सध्या पुण्यात १०० आणि मुंबईत ४० स्वयंसेवक कार्यरत आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामान्य गृहिणी, वकिल असे मान्यवर आपले स्वयंसेवक आहेत. पुण्याच्या विविध भागां मधुन सेवा मागणी येत असते. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्ययकता आहे. आपण स्वयंसेवक व्हावे यासाठी आम्ही आपणाला आवाहन करतो आहोत. संस्थेचे इतर विविध उपक्रम आणि सोबती सेवा कशी दिली जाते याची संपुर्ण माहिती घेण्यासाठी शनिवार दिनांक २६ एप्रिल २५ दुपारी ४ ते ६ वाजता होणाऱ्या मिटिंंगला आपण अवश्य हजर रहावे ही विनंती.
पत्ता : माधवी ठाकूरदेसाई
एस पी विंग फ्लॅट नंबर ४०३,
साई विराट सोसायटी,
सन सिटी रोड, ऑफ सिंहगड रोड,
सन सिटी शेवटच्या बसस्टॉप जवळ
पुण ५१
अधिक माहिती साठी संपर्क : 7276797124
www.bwithyou.org या आमच्या वेब साईटला भेट द्या

Best Organisation for Senior Citizen Assistance. Need Home Care? Hospital Assistance? Call now!

Join BeingWithYou HELP Foundation
20/03/2025

Join BeingWithYou HELP Foundation

दिनांक १९ जानेवारी २५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहगड रोड माणिकबाग येथे सेवा दर्शन या कार्यक्रमाच्या वेळी पद्मश्र...
29/01/2025

दिनांक १९ जानेवारी २५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहगड रोड माणिकबाग येथे सेवा दर्शन या कार्यक्रमाच्या वेळी पद्मश्री श्री गिरीशजी प्रभूणे यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ झाला... त्यावेळी आयोजित केलेल्या प्रदर्शनातील BeingWithYou HELP Foundation च्या स्टॉलला श्री गिरीशजींनी भेट दिली होती. आमच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली आणि आम्हाला पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद दिले

दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी एजंटा एव्हेन्यु सोसायटी पौड रोड येथे BeingWithYou HELP Foundation तर्फे आयोजित केलेल्या रक्...
20/01/2025

दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी एजंटा एव्हेन्यु सोसायटी पौड रोड येथे BeingWithYou HELP Foundation तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराची काही क्षण चित्रे

विनासंकोच फोन करा
28/12/2024

विनासंकोच फोन करा

14/11/2024

*नमस्कार मंडळी*
*दोन दिवसा पुर्वी आपण वर्तमान पत्रात वाचलेच असेल. पुणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे थॅलेसेमिया (रक्ताचा कॅन्सर) असलेले रुग्ण तसेच अनेक शस्त्र क्रियांच्या वेळी रक्ता साठी फार धावपळ करावी लागत आहे. आपल्या पैकी अनेक जण आपल्या सोसायट्यांच्या विविध पदांवर कार्यरत असाल. आपल्याला विनंती आहे. आपल्या सोसायटीच्या कम्युनिटी हॉल मधे सोसायटी मधिल सभासदां सहित बाहेरील व्यक्तिंचे रक्तदान करवून घेता येईल. किमान ३० बॅगा रक्त जमा करण्याचे टार्गेट आपण ठेवून तसा विचार करू शकतो. रक्तदान शिबिरा साठी लागणारा खर्च संस्था करेल. आपण फक्त सोसायटी हॉल विनामुल्य उपलब्ध होईल तसेच जास्तित जास्त सोसायटी सदस्य सहभागी होतिल हे पहावे ही विनंती.*

*ज्यांना शिबिराचे आयोजन करायचे आहे त्यांनी 7276797124 या नंबर वर माधवी ठाकूरदेसाई यांच्याशी संपर्क साधावा*

BeingWithYou HELP Foundation ही संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आली आहे. ज्या योगे समाजातिल गरजु व्यक्तींना मदत...
10/10/2024

BeingWithYou HELP Foundation ही संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आली आहे. ज्या योगे समाजातिल गरजु व्यक्तींना मदत करता येते. आपल्याला माहितच आहे आपला भारत देश हा सर्वाधिक तरूणांची लोकसंख्या असलेला देश आहे. भारताच्या विकासात ही मंडळी मोलाचे काम करत आहेत. ती निरोगी असतिल तरच हे काम मनापासून करू शकतिल हे आपल्याला माहितच आहे.
म्हणूनच लहानपणा पासूनच जर आरोग्याची नीट काळजी घेतली गेली तर आपोआपच सुदृढ समाजाची निर्मिती होईल हे लक्षात घेऊनच आम्ही २०२२ पासून शाळां मध्ये आरोग्य शिबिरांचे सातत्याने करत आलो आहोत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहोत. या शिबिरां मध्ये विद्यार्थ्यांची संपुर्ण आरोग्य तपासणी आणि दंत चिकित्सा करून जर काही गंभीर स्वरुपाचा आजार असेल तर पुढिल वैद्यकीय तपासणी संदर्भात पालकांना मार्गदर्श केले जाते. वेळीच योग्यती उपाय योजना झाल्या मुळे विद्यार्थ्याचे पुढिल होणारे नुकसान टाळता येते. आणि पुढच्या पिढीचे निरोगी भविष्य निश्चित करता येते.
मागिल वर्षी प्रमाणेच या वर्षीही *Bericap India Ltd.* यांच्या प्रायोजकत्वाने "भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय, भोर" येथे मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर आणि बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी इयत्ता ५वी ते इयत्ता १०वी पर्यंतच्या दिड हजार विद्यार्थ्यांसाठी *"अारोग्य आणि दंत चिकित्सा शिबिराचे"* आयोजन करण्यात आले. या शिबिराला "*नवले हॉल्पिटलच्या"* डॉक्टरांची टिम त्यांच्या मेडिकल सुप्रिटेडंट डॉ मधुकर जगताप सर यांच्या सह आमच्या मदती साठी आली होती. डॉ. जगतापांच्या मार्ग दर्शना खाली ८ डॉक्टरांच्या टिमने मुलांची दंत व संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
यात बहुतेक मुला मुलीं मध्ये कुपोषणाची समस्या आढळली तसेच दातांच्या समस्या ही आढळल्या. हृदयाचे, डोळ्यांचे, आतड्यांचे आजार असलेली मुलं ही आढळली. अशा मुलांची संख्या १०० वर होती त्या सर्वांना मोफत उपचारांसाठी "नवले हॉस्पिटल" मध्ये येण्याच्या सुचना देण्यात आल्या. सर्व मुलांची आरोग्य कार्ड तयार करून ती त्यांच्या वर्गशिक्षकां कडे सुपुर्द करण्यात आली आहेत. आणि पालक सभा घेऊन मुलांच्या आरोग्य विषयक समस्या पालकांना सांगाव्यात व गंभीर आजार असलेल्यांना उपचारां साठी नवले मध्ये घेऊन येण्याची सुचना करण्यात आली आहे. यात संस्थेचे ट्रस्टी डॉ गोरेगावकर सर स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री भांगेसर आणि त्यांचे सहाकारी श्री भिलारेसर यांचे सहकार्य आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेच्या NCCच्या विद्यार्थ्यींनी त्यांना सांगितलेली कामगिरी चोख केली... त्या सर्व विद्यार्थी मित्रांचे कौतुक! सगळ्यांच्या शिस्तबध्द कामा मुळे शिबिर उत्तम रितीने पार पडले.

*BeingWithYou HELP Foundation आणि Bericap India Pvt. Ltd. तर्फे मुलांना पेन्सिल पाऊच त्यात पेन, पेन्सिल, खोड रबर, टूथ ब्रश, टुथ पेस्ट, बोर्नव्हिटाचे दोन पाऊच देण्यात आले.*

08/07/2024

*नमस्कार मंडळी*
*आपण नुकतेच रिटायर्ड झाले आहात का?? रिकामा वेळ सत्कारणी लावण्याची इच्छा आहे*

*आपण तरूण आहात आणि समाज सेवेची आपल्याला आवड आहे, पण योग्य मार्ग सापडत नाही*

*तर मग... शनिवार दि १३ जुलै २४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत*
*BeingWithYou HELP Foundation (Hand of Empathy, Love & Protection) च्या मिटिंगला पुढिल पत्त्यावर अवश्य या*
*माधवी ठाकूरदेसाई*
*फ्लॅट नं ४०३, एस्. पी. विंग, साई विराट को. हौ. सो., सन सिटी रोड, सन सिटी शेवटच्या बस स्टॉप जवळ, ऑफ सिंहगड रोड, पुणे ५१.*
*मिटिंग मधे २०१९ पासून रुग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरीकां साठी अव्याहत पणे सुरु असलेल्या आमच्या ३ तासाच्या मोफत सेवे विषयी तसेच आमच्या अन्य उपक्रमां विषयी जाणून घ्या. तसेच आमच्या कामाची पध्दत समजून घेऊन आमच्या चळवळीत सामील होऊन जेष्ठ नागरीक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू फूलवा*

*मिटिंग साठी नाव नोंदणी पुढिल लिंक द्वारे करा. तसेच 7276797124 या नंबरवर आपले नाव पाठवा*
https://chat.whatsapp.com/EjXqYQxLCCK4Z1miImorD3

*टिम BeingWithYou HELP Foundation*

https://www.youtube.com/watch?v=Wrv9d7-YbHMआपण दुसर्‍या देशात आणि आई - वडिल भारतात हे चित्र आता नवं नाही. प्रश्न येतो आज...
08/07/2024

https://www.youtube.com/watch?v=Wrv9d7-YbHM

आपण दुसर्‍या देशात आणि आई - वडिल भारतात हे चित्र आता नवं नाही. प्रश्न येतो आजारपणात, आपण पटकन पोचू शकत नाही तेव्हा पुणेकरांसाठी म Being with you help foundation चं सहकार्य मिळू शकतं. संस्था आणि संस्थेच्या सर्व उपक्रमांबद्दल माधवी ठाकूरदेसाई माहिती देत आहे.

घरातलं कोणी अत्यवस्थ असेल पण आपल्याला तिथे पोचणं, राहणं सहजशक्य नसेल तर पुण्यातील Being with you help foundation चं सहकार्य! या संस्.....

*BeingWithYou HELP Foundation तर्फे एक नवीन सेवा सुरु करणार आहोत त्यासाठी तौलनिक अभ्यासाची गरज आहे. ही सेवा नोकरी निमित्...
10/05/2024

*BeingWithYou HELP Foundation तर्फे एक नवीन सेवा सुरु करणार आहोत त्यासाठी तौलनिक अभ्यासाची गरज आहे. ही सेवा नोकरी निमित्त परदेशी रहाणाऱ्या अथवा अन्य शहरांमधे रहाणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी तसेच एकटे घरी किंवा जेष्ठ नागरिकां साठी बांधलेल्या सोसायट्यां मधे रहाणाऱ्यांसाठी सुरु करायची आहे. सेवा सुरु करण्या पुर्वी किमान १००० जणां कडून सर्वे फॉर्म भरून घेऊन सखोल अभ्यासा नंतर सुरु करावी असा मानस आहे. तेंव्हा कृपया खालील लिंक वर क्लिक करून सर्व्हे फॉर्म स्वतः भरा आणि इतरांना ही सांगा*

Paid Service for assisted living/ nursing for elderly

*BeingWithYou HELP Foindation द्वारा अभिजात एज्युकेशन सोसायटी संचलित अभिजात माध्यमिक, पालकर प्राथमिक, आणि पुनर्वसु बालक ...
09/02/2024

*BeingWithYou HELP Foindation द्वारा अभिजात एज्युकेशन सोसायटी संचलित अभिजात माध्यमिक, पालकर प्राथमिक, आणि पुनर्वसु बालक मंदिर या शाळेतिल शिशु वर्ग ते इयत्ता १०वी पर्यंतच्या विद्यार्थांसाठी दि. ८ फेब्रुवारी २४ आणि दि. ९ फेब्रुवारी २४ रोजी आरोग्य आणि दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाशे विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिशु वर्गातील मुलां बरोबर त्यांचे पालक उपस्थित होते. त्यांना मुलांच्या तब्बेतीची काय व कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले.*

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
09/11/2023

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

23/10/2023

*एक महत्वाची सूचना*

*दोन दिवसां पासून व्हॉट्स अप वर "With You" या नावाने जेष्ठ नागरिकांना मदत करत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्यांचा आणि BeingWithYou HELP Foundation (Hand of Empathy Love & Protection) चा काही दूरान्वयाने संबंध नाही याची कृपया नोंद घावी. BeingWithYou HELP Foundation (Hand of Empathy Love & Protection) हा रजिस्टर्ड NGO आहे. आणि २०१९ पासून रूग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिकांना अविरत ३ तासांची विनामुल्य सेवा देत आहोत.
माधवी ठाकूरदेसाई
FOUNDER
DIRECTOR
BeingWithYou HELP Foundation (Hand of Empathy Love & Protection)
*

BeingWithYou HELP Foundation च्या माध्यमातून मी करत असलेल्या कार्या बद्दल RSSसिंहगड विभागा तर्फे नवरात्री निमित्त सन्मान...
21/10/2023

BeingWithYou HELP Foundation च्या माध्यमातून मी करत असलेल्या कार्या बद्दल RSSसिंहगड विभागा तर्फे नवरात्री निमित्त सन्मानित करण्यात आले

*BeinWithYou HELP Foundation २०१९ पासून  रुग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्यरत आह...
14/10/2023

*BeinWithYou HELP Foundation २०१९ पासून रुग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्या साठी महानगर पालिकेच्या आणि गावां मधिल शाळांमधे "आरोग्य व दंत चिकीत्सा शिबीरांचे" आयोजन गेल्या वर्षी पासून करण्यात येत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.*
*या वर्षी BeinWithYou HELP Foundation ने Bericap India Pvt. Ltd. च्या सहकार्याने भोर येथिल भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि निवासी मूक-बधिर विद्यालय भोर येथिल विद्यार्थ्यांसाठी "आरोग्य आणि दंत चिकित्सा शिबीराचे" दि. १२ आणि १३ ऑक्टोबरला आयोजन केले होते. मूक बधिर विद्यालयातील १ली ते १० वी आणि राजा रघुनाथराव विद्यालयातिल ५ वी ते ११ वी पर्यंतच्या पावणे दोन हजार विद्यार्थ्यांची "आरोग्य आणि दंत चिकित्सा" करण्यात आली.*
*गुरुवारी सकाळी ६.४५ मिनिटांनी सनसिटी येथून १८ व्हॉलेंटियर ८ डॉक्टरांची टिम घेऊन निघालो. भोरला ८.३० वाजता पोहचल्या नंतर राजा रघुनाथराव विद्यालयाच्या हॉल मधे मुख्याध्यापक भांगे सरांनी १० टेबल खुर्च्यांची व्यवस्था केली होती. आमच्या टिम मेंबर नी पटापट उंची मोजण्या साठी टेप भिंतीला लावून घेतल्या. वजन काटे मांडले... संस्थेचे बॅनर लावले आणि सगळी टिम कामा साठी सज्ज झाली. दोन्ही दिवशी सकाळ आणि दुपारच्या सत्रात तपासणी करण्यात आली... काम करतांना पाळलेली सूसुत्रता, टिम वर्क आणि योग्य नियोजन या त्रीसुत्री मुळे "आरोग्य शिबीर" यशस्वी झाले. १३ तारखेला जेवणा नंतर भोर एज्युकेशन सेसायटीच्या निवासी मूक-बधिर विद्यालयात तेथिल विद्यार्थ्यांची "आरोग्य आणि दंत चिकित्सा" करण्यात आली. त्यावेळी स्वतः शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि शिक्षकांनी केलेल्या सहकार्या मुळे डॉक्टरांना मुलांशी संवाद साधणे सोपे गेले. दोन्ही शाळां मध्ये तपासणी नंतर प्रत्येक मुलाला बोर्नव्हिटा, टुथ पेस्ट, टुथ ब्रश, पेन, पेन्सिल असलेले पाऊच भेट दिले. मूक बधीर विद्यार्थ्यांना पाऊच दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आले आणि जवळ जवळ महिना भर शिबीर यशस्वी व्हावे या साठी करत असलेल्या कष्टांचे चीज झाल्या सारखे वाटले.*
*नवले हॉस्पिटल मधून ४ जनरल आणि सिंहगड इंन्स्टिट्युट मधून ४ दंत चिकित्सक डॉक्टरांची टिम उपलब्ध करून दिली गेली. त्यासाठी नवले हॉस्पिटलच्या डॉ. मधुकर जगताप सरांनी मदत केली त्या बद्दल आम्ही आभारी आहोत. तसेच Bericap India Pvt. Ltd. कंपनीने केलेल्या मदती मुळेच हे शिव धनुष्य पेलणे शक्य झाले. त्यांचेही मनापासून आभार.*
*आणि आता "last but not the least" माझे सगळे ६० पुढचे असले तरी तरूणाला लाजवेल असा उत्साह असलेले माझे सगळे सहकारी....ज्यांच्या शिवाय मी अपुर्ण आहे... सगळ्यांचे खुप खुप कौतुक*
*माधवी ठाकूरदेसाई*
*BeingWithYou HELP Foundation*

BeingWithYou HELP Foundation द्वारा Bericap India Pvt. Ltd.  च्या सहकार्याने १२ आणि १३ ऑक्टोबर २३ ला भोर येथिल राजा रघुन...
04/10/2023

BeingWithYou HELP Foundation द्वारा Bericap India Pvt. Ltd. च्या सहकार्याने १२ आणि १३ ऑक्टोबर २३ ला भोर येथिल राजा रघुनाथराव विद्यालयातिल २५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे तेंव्हा विद्यार्थ्यांना २बोर्नव्हिटा पॅक, टुथ ब्रश, टुथ पेस्ट आणि पेन पेन्सिल देण्यात येणार आहे त्या सामानाचे पॅकिंग सुरु आहे

*BeingWithYou HELP Foundation(Hand of Empathy, Love & Protection)**NGO Working for Patient's Relatives and Senior Citize...
30/09/2023

*BeingWithYou HELP Foundation(Hand of Empathy, Love & Protection)*
*NGO Working for Patient's Relatives and Senior Citizens*

*🙏🙏सस्नेह निमंत्रण🙏🙏
"आर्टिस्ट्री" द्वारा आयोजित "देणे समाजाचे" या
सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनातिल BeingWithYou HELP आमच्या विषयी अधिक जाणून घ्या....
स्थळ: "हर्षल हॉल" कर्वे रोड, पुणे
वेळ : सकाळी १० ते रात्री ९*

Address

FL

Telephone

+17276797124

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Being With you posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Being With you:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Practice
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share