Dr Sunil Jagtap

Dr Sunil Jagtap प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य.

करुणेचा दीप प्रज्वलित करूया, सर्वांच्या जीवनात आनंद भरुया !सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!   #गौतमबुद्ध  #ब...
01/05/2026

करुणेचा दीप प्रज्वलित करूया,
सर्वांच्या जीवनात आनंद भरुया !

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

#गौतमबुद्ध #बुद्धपौर्णिमा #पौर्णिमा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा..!प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा...
01/05/2026

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा..!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आपलं बलिदान देणाऱ्या राष्ट्रवीरांना विनम्र अभिवादन. त्यांच्या बलिदानातून आलेला महाराष्ट्रभिमानाचा वारसा जपण्यासाठी सर्वजण कटिबद्द राहूया.

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारताचे संविधान शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान योद्धा, आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब ...
14/04/2026

भारताचे संविधान शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान योद्धा, आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼

“ 🌸स्वरांवर आधीराज्य गाजवलेल्या स्वरसम्राज्ञी आशा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸”आशा भोसले या भारतीय संगीत सृष्टीतील एक म...
12/04/2026

“ 🌸स्वरांवर आधीराज्य गाजवलेल्या स्वरसम्राज्ञी आशा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸”

आशा भोसले या भारतीय संगीत सृष्टीतील एक महान गायिका. त्यांच्या गायकीची आणि व्यक्तिमत्त्वाची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे आशाताईंच्या आवाजातली विलक्षण लवचिकता. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतच नाही, तर गझल, पॉप, भजने, लावणी, कव्वाली आणि डिस्को अशा सर्व प्रकारच्या गाण्यांना न्याय दिला. त्यांच्या नावावर जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांनी २० पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत.
एका काळात कॅबरे गाण्यांना दुय्यम मानले जात असे. मात्र, आशाताईंनी आपल्या आवाजातील मादकता आणि उर्जेच्या जोरावर या गाण्यांना एक वेगळीच उंची मिळवून दिली. आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
मराठी माणसाच्या मनात आशाताईंचे स्थान अढळ आहे. त्यांनी गायलेली भावगीते, भक्तीगीते आणि लावण्या आजही घरोघरी ऐकल्या जातात.
आशाताईंच्या ‌आत्म्यास शांती लाभो. 🌸🙏🌸

शिक्षण, समता आणि न्यायासाठी आयुष्य वेचणारे, महिलांच्या हक्काचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फु...
11/04/2026

शिक्षण, समता आणि न्यायासाठी आयुष्य वेचणारे, महिलांच्या हक्काचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

डॉक्टर सेलमध्ये निष्ठेने काम करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र डॉ. हनुमंतराव खपाले यांचे चिरंजीव आदित्य व श्री विश्वनाथरा...
10/04/2026

डॉक्टर सेलमध्ये निष्ठेने काम करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र डॉ. हनुमंतराव खपाले यांचे चिरंजीव आदित्य व श्री विश्वनाथराव पंके यांची कन्या चिरंजीवी सौ. प्रनोती यांचा शुभविवाह पंढरपूर जवळ पेनुर येथे पार पडला. या विवाह प्रसंगी उपस्थित राहुन वधू वरांना शुभआशिर्वाद देण्याचा योग आला.
आज या विवाह प्रसंगी मा. आमदार राजीव खरे, डॉ. अमरजीत गोडसे, डॉ. सत्यजीत म्हस्के, डॅा. अमरसिंह जमदाडे, पंढरपूरचे मा. अध्यक्ष सुधीर भोसले, ऊद्योग व व्यापार सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश दादा फाटे ऊपस्थित होते.
Nagesh Phate - Page

आज शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी पंढरपूरला जाण्याचा व विठ्ठल रुक्मीनीचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचा योग आला. सामाजिक, राज...
10/04/2026

आज शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी पंढरपूरला जाण्याचा व विठ्ठल रुक्मीनीचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचा योग आला.
सामाजिक, राजकीय बरोबरच काम करणारे आमचे मित्र व राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. नागेश दादा फाटे यांचे जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी मनापासून केलेले स्वागत व सत्कार याचा स्वीकार केला व भरपूर गप्पा मारल्या.
या प्रसंगी पंढरपूर निमा संघटनेचे मा. तालुकाध्यक्ष डॉ.अमरसिंह जमदाडे, शिक्षक संघटनेचे श्री साहेबराव भुसे उपस्थित होते.
Nagesh Phate - Page

“हुजूरपागेत पदवीदान समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न “महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे,हुजूरपागा इंग...
09/04/2026

“हुजूरपागेत पदवीदान समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न “

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे,हुजूरपागा इंग्लिश मीडियम स्कूल, कात्रज येथे गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी पारितोषिक वितरण व पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे महानगरपालिकेच्या मा. नगरसेविकां सौ. प्रतिभा चोरगे ताई उपस्थित होत्या. ट्रस्टी श्री. दुश्यंत घाडगे सर व माजी मुख्याध्यपिका व जी बी मेंबर श्रीमती उमा गोसावी यांचीही उपस्थिती लाभली.
वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ढोल ताशा च्या गजरात पदवीदान समारंभ पार पडला. विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, पदक व भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमात ज्युनियर केजी विद्यार्थिनींचे नृत्य, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नाटिका तसेच विद्यार्थिनी व पालकांचे मनोगत सादर झाले. खोपडे नगर येथे "झाडे वाचवा" संदेश देणारी रॅलीही काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापीका सौ. किर्ती पंडीत मॅडम, सौ. दिप्ती कुलकर्णी मॅडम व सर्व टिमने अतीशय उत्तम केले.
मला या कार्यक्रमाला आध्यक्ष म्हणून ऊपस्थित राहता आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आरोग्य ही आपली पहिली संपत्ती आहे. त्याची प्रथम काळजी घ्या व आरोग्य संपन्न रहा याच आज जागतिक आरोग्य दिना निमित्त आपणास मन...
07/04/2026

आरोग्य ही आपली पहिली संपत्ती आहे. त्याची प्रथम काळजी घ्या व आरोग्य संपन्न रहा याच आज जागतिक आरोग्य दिना निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!

06/04/2026

“ ॥संसद भवन दिल्ली येथे मा. साहेबांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर घेतली शपथ “॥

राज्यसभेवर निवडून आलेले देशाचे नेते, आमचे प्रेरणा स्थान माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज आपल्या खासदारकीची शपथ वयाच्या 86 व्या वर्षी नेहमी प्रमाणे ज्या आत्मविश्वासाने व ज्या धैर्याने घेतली त्याला आमचा प्रणाम.
त्यांनी यापुर्वी सहा वेळा विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत तर राज्यसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षीपासून सलग तिसरी टर्म ते राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत.
सन 1967 साली सुरु झालेला हा अखंड प्रवास आजही कायम सुरु आहे. त्यांच्या प्रदिर्घ राजकीय तथा संसदीय अनुभवाचा देशाला नेहमीच फायदा होईल.
साहेबांचे अभिनंदन व पुढील आरोग्यदायी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
Sharad Pawar

स्वराज्यनिर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि त्रिवार मा...
03/04/2026

स्वराज्यनिर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा🙏🏻

हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
02/04/2026

हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sunil Jagtap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category