NANA palkar smruti chikitsalay

NANA palkar smruti chikitsalay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NANA palkar smruti chikitsalay, Pune.

HAPPY MOTHERS DAY..
12/05/2024

HAPPY MOTHERS DAY..

कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या चिकित्सालयातील डॉक्टरांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता ...
11/12/2023

कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या चिकित्सालयातील डॉक्टरांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...
या मधे
डाॅ. शिवप्रसाद नायर
वैद्य सोनाली देवकर
वैद्य ऋतुजा नवथरे
वैद्या मधुमती लोहिया
यांचा समावेश होता...

🚩 *नाना पालकर स्मृती चिकित्सालय* 🚩*औषधी माझ्या अंगणातील**(पुष्प पंचवीसावे)*खारीक मऊ खजुरांचे रूपांतर खारके मध्ये होतं खा...
10/12/2023

🚩 *नाना पालकर स्मृती चिकित्सालय* 🚩

*औषधी माझ्या अंगणातील*
*(पुष्प पंचवीसावे)*

खारीक

मऊ खजुरांचे रूपांतर खारके मध्ये होतं खारीक ही कडक असून ती खायला दातांचा उपयोग हा करावाच लागतो. खारीक ही एक लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे.
अगदी लहान बाळांचे गुटी पासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत खारीक ही खूप फायदेशीर आहे. चला तर मग खारकेचे फायदे पाहू

1. खारीक मध्ये विटामिन ए,सी,के,ई B2,B6, नियासीन असे जीवनसत्वे आहेत जे शरीराच्या पोषणासाठी मदत करते.

2) खारकी मधील कॅल्शियम हे हाडांना बळकट ठेवण्यास मदत करते.

3) खारीकेमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

4)खारीक पोट साफ होण्यास पण खूप मदतशीर ठरते व कोलन स्वच्छ होण्यास मदत होऊन आतड्यांसंबंधीत हालचाली नियंत्रित करते.

5) हृदय निरोगी ठेवते . रोजच्या धावपळीच्या जीवनात थकवा दूर करण्यास मदत करते.

6) खारीक हृदय गर्भाशय व सर्व स्नायू मजबूत करते.

7) खारीक ही शरीरामधील फ्री रेडिकल्स टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते व कॅन्सर च्या त्रासापासून संरक्षण करते.

8)केस मजबूत होण्यास व त्वचा निरोगी राहण्यास खारीक ही खूप मदतशीर ठरते.

जर खारीक ही रोज आहारात ठेवली तर सर्वांसाठी फायद्याचे आहे.
*टिप*
*आति सर्वत्र वर्जयेत्*
*योग्य प्रमाणात सेवन करावे*
*आपल्या डॉक्टर अथवा वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे*

*स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती,पुणे.*

https://www.facebook.com/profile.php?id=100083352488512&mibextid=ZbWKwL

Like and Follow ☝🏻

कार्यक्रमात सेवा सहयोग फौंडेशन ने आपल्या चीकीत्सालायला औषधे भेट दिली. त्या बद्दल संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली....
09/12/2023

कार्यक्रमात सेवा सहयोग फौंडेशन ने आपल्या चीकीत्सालायला औषधे भेट दिली. त्या बद्दल संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली....याशिवाय कार्यक्रम प्रसंगी संस्थेची आणि प्रकल्पाची माहिती देणारा एक व्हिडिओ दाखवण्यात आला..स्वर्गिय नानांच्या चरित्रा वर एक माहिती पर व्हीडिओ प्रदर्शित होतांचे काही क्षण...या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कु. दक्षता आणि मा. राजाभाऊ...

दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी माननीय अशोक काका कुकडे यांचे स्वागत औक्षणाने झाले.यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दी...
09/12/2023

दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी माननीय अशोक काका कुकडे यांचे स्वागत औक्षणाने झाले.यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारत माता पूजनाने झाली.कार्यक्रमाला Desai Brother's चे निलेश जी गुजराथी,भूतपूर्व प्रांत सह कार्यवाह श्री. जयंत राव रानडे ह्यांनी कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित दर्शविली..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसमहापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!
06/12/2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस
महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!

🚩 *नाना पालकर स्मृती चिकित्सालय* 🚩*औषधी माझ्या अंगणातील**(पुष्प चोविसावे)**५ पदार्थांसोबत खा चिमूटभर हळद, तब्येतीच्या अन...
03/12/2023

🚩 *नाना पालकर स्मृती चिकित्सालय* 🚩

*औषधी माझ्या अंगणातील*
*(पुष्प चोविसावे)*

*५ पदार्थांसोबत खा चिमूटभर हळद, तब्येतीच्या अनेक समस्या होतील कमी.....*

हळदीचा वापर आपण अनेक वर्षांपासून करत आलो आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. याचा वापर पदार्थासह इतर औषधी व उपचारांसाठी केला जातो. हळदीला आयुर्वेदात हरिद्रा म्हणतात. हळदमध्ये अनेक महत्वाचे घटक आढळतात. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'कर्क्युमिन'.

हळद अँटिबायोटिक, एनाल्जेसिक, अँटिऑक्सिडेंट, अँटिइंफ्लेमेटरी, अँटीकार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. याचा वापर फक्त पदार्थात नसून, आरोग्यासाठी देखील केला जातो. यासंदर्भात, आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी हळद खाण्याचे आश्चर्यकारक फायदे सांगितले आहेत

*हळदीचा आरोग्यासाठी होणारा सर्वात मोठा फायदा...*
हळदीचा वापर फक्त जेवणाची रंगत किंवा चव वाढवण्यासाठी होत नसून, इतर आरोग्याच्या निगडीत समस्या सोडवण्यासाठी देखील होतो. हळद इतर रोगांपासून बचाव करतो. व उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करते.

*हळदीचे आरोग्यदायी फायदे...*

*जखमेच्या उपचारासाठी मदत.

*यकृत स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त. (फॅटी लिव्हरसाठी सर्वोत्तम)

*भूक वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत.

"अन्नपदार्थांतील प्रथिने शोषण्यास मदत.

*शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करते, व रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारते.

*हळद कशासोबत कशी खाणार...?*

*फॅटी लिव्हर असेल तर लिंबू हळद एकत्र खा.

*तूप आणि मधासोबत हळद घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

*वजन कमी करण्यासाठी...*
वजन आणि त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी गरम पाण्यासोबत हळदीचे सेवन करा.

*खोकला...*
सर्दी, संधिवात, जखम भरणे आणि कॅल्शियमची कमतरता, यासाठी दुधासोबत हळद घेणे हा चांगला उपाय आहे.

*मधुमेहासाठी आवळासोबत हळद घ्या...*
विविध आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हळदीचा स्वयंपाकात वापर करा.

*त्वचा आणि केसांच्या समस्यांवर हळद रामबाण उपाय...*
त्वचेवरील समस्या सोडवण्यासाठी हळदचा वापर केला जातो. एक्जिमा, सोरायसिस आणि बुरशीजन्य संसर्ग यासारख्या त्वचेच्या आजारांवर हळद उपयुक्त ठरेल. मुरुमांपासून ते सुरकुत्यापर्यंत सर्व त्वचेच्या आजारांवर ते उपयुक्त आहे. हळदीचा वापर चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
*टिप*
*अति सर्वत्र वर्जयेत्*
*योग्य प्रमाणात सेवन करावे*
*आपल्या डॉक्टर अथवा वैद्यांच्या सल्ल्याने करुन पहावे*

*स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती,पुणे.*

https://www.facebook.com/profile.php?id=100083352488512&mibextid=ZbWKwL

Like and Follow ☝🏻

World  🌎 AIDS Day
01/12/2023

World 🌎 AIDS Day

संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा...
30/11/2023

संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा...

सहकुटुंब दिवाळी फराळ कार्यक्रम...प्द्मभूषण डाॅ. श्री. अशोक(काका) कुकडे यांची प्रमुख उपस्थिती...राष्ट्राला घडवी समाज अन्स...
28/11/2023

सहकुटुंब दिवाळी फराळ कार्यक्रम...
प्द्मभूषण डाॅ. श्री. अशोक(काका) कुकडे यांची प्रमुख उपस्थिती...

राष्ट्राला घडवी समाज अन्
समाजास व्यक्ती
घडे न व्यक्ती कुटुंबाविना
कुटुंब ही शक्ती...
अशा प्रकारे असणाऱ्या आपल्या नाना पालकर स्मृती चिकित्सालया चा सहकुटुंब दिवाळी फराळ कार्यक्रम दिनांक २५/११/२०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला विवेकानंद रुग्णालया चे सह संस्थापक पद्मभूषण डॉ. श्री. अशोक (काका) कुकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या सेवा अनुभवांमुळे कार्यक्रम अधीक परिपूर्ण झाला.
त्याची काही क्षणचित्रे.

🚩 *नाना पालकरस्मृती चिकित्सालय* 🚩*औषधी माझ्या अंगणातील**(पुष्प तेवीसावे)**कोथिंबीर....*..... भारतात पदार्थांमध्ये सर्वात...
27/11/2023

🚩 *नाना पालकरस्मृती चिकित्सालय* 🚩

*औषधी माझ्या अंगणातील*
*(पुष्प तेवीसावे)*

*कोथिंबीर....*
..... भारतात पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो आहे...,, कोथिंबीर,, हि साधारणतः जेवण सजविण्यासाठी व पदार्थांना सुगंधित करण्यासाठी वापरली जाते.. कोथिंबिरीची स्वतः चि एक चव आहे, असे असले तरी हि अतिशय आरोग्यदायी सुद्धा आहे. हिच्यात फार मौल्यवान पोषक तत्वे आहेत. .. चला तर बघू या ... कोथिंबिरीचे फायदे 👇

कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यास. अपचन, मळमळ, अतिसार व आतड्यांना आलेली सूज जाते. कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते. पचनशक्ती वाढविते. कोथिंबीर अतिशय थंड असल्याने. पित्त विकार बरे करते. आंबटढेकर येत असेल तर. कोथिंबीर चावून खाल्ल्यास बरं वाटतं..
. कोथिंबीर मध्ये व्हिटॅमिन . ए.. व सी.. आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.. त्यामुळे याच्या नियमित सेवनाने. सर्दि खोकला, कफ होत नाही.. कोथिंबीर मध्ये जे घटक आहे ते शरिरातील कोलेस्टेरॉल कमी करते. आणि.. हि रक्तातील इंस्युलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवते.. कोथिंबीर हि मेंदूसाठी खूपच फायदेशीर आहे. कोथिंबीर पाने मज्जा संस्था सक्रिय ठेवण्यासाठी खूप लाभदायक आहे.
‌. कोथिंबीर हि शीतल असल्याने अंगात उष्णता होऊ देत नाही.. त्यामुळे हिच्या सेवनाने चेहर्यावर पिंपल्स मुरूमे वांग व अनेक प्रकारचे त्वचा विकार होत नाहीत.. बरेच जणांना केस गळणे, पांढरे होणे हे त्रास असतात. तेव्हा. आठवड्यातून एकदा कोथिंबीर वाटून हिचा रस केसांच्या मुळाशी चोळून लावावे. हि उष्णता शोषून घेते. त्यामुळे केस गळणे थांबते.तसेच एक चमचा भरून कोथिंबीर रस व चिमूटभर हळद एकत्र करून हा लेप मुरूमे, पिंपल्स वर लावलं तर हे लवकर सुकतात व डागही राहत नाही.नियमीतपणे कोथिंबीर खाल्ल्यास होणारि हार्मोन्स चि जास्त प्रोसेस थांबते व हार्मोन्स संतुलित राहतात.. थायराईड सारखा आजार लांब राहतो.
*टिप*
*आति सर्वत्र वर्जयेत्*
*योग्य प्रमाणात सेवन करावे*
*आपल्या डॉक्टर अथवा वैद्यांच्या सल्ल्याने करुन पहावे*

*स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती,पुणे.*

https://www.facebook.com/profile.php?id=100083352488512&mibextid=ZbWKwL

Like and Follow ☝🏻

कार्यक्रमात *पद्मभूषण श्री. अशोक काका कुकडे* ह्यांची मुलाखत घेणार आहोत...मा. कुकडे काकांनी 1962 ला पुण्यातून *MBBS* चे श...
25/11/2023

कार्यक्रमात *पद्मभूषण श्री. अशोक काका कुकडे* ह्यांची मुलाखत घेणार आहोत...
मा. कुकडे काकांनी 1962 ला पुण्यातून *MBBS* चे शिक्षण प्रथम क्रमांकाने पूर्ण केले नंतर 1965 ला *MS SURGEN* पर्यंत शिक्षण घेऊन पुण्यातून लातूर सारख्या (त्यावेळच्या) ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेसाठी सहकुटुंब गेले आणि लातूर मध्ये *विवेकानंद रुग्णालय* उभे केले. त्याच बरोबर *किल्लारी भूकंप वैद्यकीय सहाय्यता, मांजरा नदी खोलीकरण* करून लातूर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावला..
ह्या अश्या *दैवी देणगी प्राप्त व्यक्तीचे* अनुभव ऐकण्याची सोनेरी संधी आपल्याला मिळणार आहे.
तरी ही दुर्मिळ संधी आपल्या कुटुंबियांच्या सह अनुभवूया.....

Address

Pune

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm
Sunday 9:30am - 5:30pm

Telephone

+919359245002

Alerts

Be the first to know and let us send you an email when NANA palkar smruti chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to NANA palkar smruti chikitsalay:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram