20/01/2022
इतरांची झोपमोड करणारा आजार म्हणजे घोरणे . आणि ज्याला हा जडलाय त्याला माहीतच नसते. काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. ह्या सवयीचा त्यांना स्वतःला काही अपय होत नसला तरी इतरांची झोप मात्र यामुळे खराब होऊ शकते. मात्र झोपेत घोरणे हि सवय नसून समस्या आहे आणि त्यापासून सुटकारा हि मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीचे घोरणे त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या शेजारी झोपणार्याूसाठी त्रासदायक असते. म्हणून घोरणारी व्यक्ती आपल्या घोरण्याचा त्रास कमी कसा होईल यावर गांभीर्याने विचार करत नाहीत. आपले घोरणे त्रासदायक वाटत नसले तरी त्याच्या प्रकृतीसाठी ते घातकच असते.
काही काही वेळा तर घोरण्यास कारणीभूत ठरणारी श्वसन संस्थेतील विकृती जीवघेणी सुद्धा ठरू शकते. म्हणून घोरण्याचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. कारण बर्यातच लोकांना घोरणे हा दोष आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्षात तो श्वणसन यंत्रणेचा दोष आहे. त्याच्या तोंडातून, नाकातून श्वा्सोच्छ्वासाद्वारे घेतली जाणारी हवा नीट वाहत नसते.
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
१) काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो.
२) सकाळी गरम पाण्यात १/२ चमचा तिळाचे तेल टाकूनपाच मिनिटे गुळण्या कराव्यात. त्याने घोरणे कमी होते.
३) रात्री झोपताना पाठीखाली उशी घ्यावी, मान खालीटाकावी व दोन्ही नाकपुडीत थोडेसे शतावरी तेल, ज्येष्ठमध तेल टाकावे. घोरणे कमी होईल.
४) पंखा किंवा एसी खाली झोपू नका. पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास नलिका आकसतात.
५) भरपूर पाणी प्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या.
६) योग करा घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी कपालभाति आणि प्राणायम फायदेशीर आहे.
७) आहारावर नियंत्रण ठेवा: रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ, जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका.
८) रक्त दाबावर नियंत्रण ठेवा: जर रक्त दाब सामान्यांपेक्षा जास्त असेल तर यामुळे घोरण्याची समस्या होऊ शकते. रक्त दाब नियंत्रणात असावा
९) वजन कमी करा: घोरणे टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. जास्त वजन असल्याने घोरण्याची समस्या होते.
१०) लसूण मोहरीच्या तेलाने मालिश २-३ पाकळ्या लसूण मोहरीच्या तेलात टाकून गरम करा आणि या तेलाने छातीची मालिश करा. फायदा होईल.
११) मध प्या: रोज झोपण्याआधी एक चमचा मध प्यायल्याने गळ्याच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. घोरण्याची समस्या दूर होते._
१२) डाव्या कुशीवर झोपा: झोपण्याची बाजू बदला. पाठ किंवा पोटावर झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न