17/12/2025
हिवाळ्यातील आहार आणि आरोग्य संतुलन
"हिवाळा आला की भूक वाढते... पण आहार थोडा नियंत्रित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे!"
"पहिलं : गरम, पौष्टिक आणि फायबरयुक्त अन्न खा.
भाकरी, सूप्स, आणि ताज्या भाज्या शरीर गरम ठेवतात."
"दुसरं : सुका मेवा आणि तिळगूळ!
हे शरीराला उष्णता देतात आणि त्वचा कोरडी पडू देत नाहीत."
"तिसरं : हंगामी फळं जसं की संत्रं, पेरू, आणि गाजर..
यात व्हिटॅमिन C भरपूर असतं, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं."
"आणि लक्षात ठेवा, पाणी पिणं विसरू नका!
थंड हवेतही शरीराला हायड्रेशन लागतोच!"
"आता एक महत्त्वाची गोष्ट..
आपल्या शरीरात जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा ते पचवताना काही कॅलरी बर्न होतात.
यालाच म्हणतात Thermogenic Effect of Food."
"त्यातलं सर्वात जास्त थर्मोजेनिक फूड म्हणजे प्रोटीन!
प्रथिन पचवताना शरीर जास्त ऊर्जा वापरतं,
ज्यामुळे शरीराला ताकद मिळते, काम करण्याची उर्जा राहते,
आणि आरोग्याच्या दृष्टीने वजनही नियंत्रित राहतं."
"म्हणून हिवाळ्यात गरम, पौष्टिक, प्रोटीनयुक्त आणि संतुलित आहार घ्या.
आरोग्यदायी, उर्जावान आणि ताजेतवाने राहा!"
"हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आनंद घ्या… पण आहारात आरोग्याचं संतुलन नक्की ठेवा!"
📍 Dr. Pranita S. Kanade (MD HOM, BHMS)
Homeopathy Consultant | Nutritionist | Diet Consultant
Shop No. 4, Impression Housing, near Narayani Dham, behind Wonder City, Katraj
📞 9970291040