04/12/2025
✍️
पार्किनसनचा नियम (Parkinson’s Law)
मानस शास्त्रीय दृष्टीकोन- डॉ योजना चिराग
पार्किन्सनचा नियम हा वेळेचे व्यवस्थापन, मानवी वर्तन आणि कार्यक्षमता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
ब्रिटिश इतिहासकार आणि लेखक सिरिल नॉर्थकोट पार्किन्सन यांनी 1955 मध्ये हा सिद्धांत मांडला. त्यांनी निरीक्षण केले की
“काम त्यासाठी दिलेल्या वेळेत आपोआप विस्तारते.”
म्हणजेच, एखादे काम करण्यासाठी आपण किती वेळ ठरवतो, त्याप्रमाणेच ते काम वाढते किंवा लांबते.
आता खूप महत्त्वाचे या नियमामागील मानसशास्त्र मानवाचे मन वेळेच्या चौकटीशी घट्ट जोडलेले आहे.
एखादे काम पूर्ण करण्यासाठी जर आपल्याकडे जास्त वेळ असेल, तर मेंदू नकळत त्या कामात विलंब करू लागतो.
विलंबाची प्रवृत्ती (Procrastination):
काम तातडीचे वाटत नसल्याने आपण उगाचच काम पुढे ढकलतो.
अतिरिक्त तपशील जोडणे: वेळ भरून काढण्यासाठी लहानसहान गोष्टींवर जास्त लक्ष देतो.
अनावश्यक गुंतागुंत: साधे असलेले काम अधिक गुंतागुंतीचे वाटू लागते.
यामुळे उत्पादकता productivity कमी होते आणि वेळ वाया जातो.
उदाहरणे
▶️विद्यार्थी:
एखाद्या विद्यार्थ्याला गृहपाठ एका आठवड्यात द्यायचा असेल, तर तो शेवटच्या दोन दिवसांतच काम सुरू करतो. पण जर त्याला दोन दिवसांचीच वेळ दिली असती, तरी तो तेवढ्यात पूर्ण करू शकला असता.
▶️कार्यालयीन काम: office workplace
एखादी मीटिंग 30 मिनिटांची असू शकते, पण जर तिला एक तास दिला तर लोक बोलणे, चर्चेतील विषय लांबवणे यामध्ये वेळ खर्च करतात.
▶️घरगुती काम:
साफसफाई एक तासात पूर्ण होऊ शकते, पण जर दिवसभर वेळ ठेवला तर ती कामे पसरट होऊन पूर्ण दिवस व्यापतात.
वेळ व्यवस्थापनासाठी उपयोग
पार्किन्सनचा नियम योग्य रितीने समजून घेतला, तर आपली कार्यक्षमता वाढवता येते.
▶️ डेडलाइन कमी ठेवणे: कृत्रिम मर्यादा घालून कामासाठी वेळ कमी ठेवला, तर काम जलद पूर्ण होते.
▶️ लहान कामांना लहान वेळ द्या: 10 मिनिटांत होणारे कामासाठी तासभर न ठेवता फक्त 10-15 मिनिटांची वेळ निश्चित करावी.
▶️ एकाग्रता वाढवणे: मर्यादित वेळेत काम करण्याची मानसिकता तयार झाली की लक्ष विचलित होत नाही.
मानसशास्त्रीय फायदे
▶️ आत्मअनुशासन (Self-discipline) विकसित होते.
▶️ ताणतणाव कमी होतो, कारण कामं वेळेत पूर्ण होतात.
▶️ आत्मविश्वास आणि उत्पादकता वाढते.
▶️ "वेळ कमी आहे" ही जाणीव मेंदूला सतर्क ठेवते.
निष्कर्ष
पार्किन्सनचा नियम हा फक्त वेळ व्यवस्थापनासाठी नसून मानवी मानसशास्त्राचे एक आरसे आहे. आपले मन दिलेल्या वेळेनुसार काम वाढवते किंवा आटोपते. त्यामुळे आपणच योग्य वेळेच्या मर्यादा घालून शिस्त पाळली, तर कार्यक्षमता दुप्पट होऊ शकते.
आशा आहे आजच्या ह्या छोट्या लेखाचाही वाचकांना नक्की काही ना काही मदत करेल.
धन्यवाद🙏😊
Dr Yojana Chirag,
PG classical Homoeopathy,
Sp REBT psychotherapy and Neuropsychology
Pune
Contact-99757