18/11/2025
आपल्या बाळाच्या नाजूक डोळ्यांची काळजी घ्या.
जे बाळ वेळेपूर्वी, म्हणजेच 34 व्या आठवड्यात किंवा त्याआधी। जन्माला आलेलं आहे किंवा ज्याचे वजन 2 किलोग्रॅम पेक्षा कमी आहे किंवा जे बाळ काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे बरेच दिवस NICU मध्ये ऍडमिट होते, अशा बाळाची जन्म झाल्या झाल्या पहिल्या महिन्यात डोळयांची तपासणी तज्ञांकडून करून घ्या (नेत्र पटल तज्ञ् म्हणजेच retina specialist). या बाळांच्या डोळ्याचे पडदे अत्यंत नाजूक अवस्थेतून जात असतात, वेळीच उपचार न झाल्यास, retinopathy of prematurity (ROP) नावाचा आजार होऊन काही प्रमाणात/ पूर्णपणे अंधत्व यायचा धोका असतो. त्यांना जग छान दिसेल याची काळजी घेऊया!
डॉ निशिता बेके- बोर्डे.
MBBS MS DNB FPOS
Paediatric and General ophthalmologist, Squint specialist
Pune