Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma

Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma This page has been created for online consultation. During these pandemic its not possible for everyone to visit clinics for treatment.

Not whole treatment can be done by this method but atleast 40% treatment is possible.

08/05/2024
गृध्रसी Sciaticaगृध्रसी हा व्याधि Sciatic नाडीच्या क्षोभामुळे (Sciatic neuritis) उत्पन्न होतो. कोणत्याही कारणानी या Scia...
22/07/2023

गृध्रसी Sciatica

गृध्रसी हा व्याधि Sciatic नाडीच्या क्षोभामुळे (Sciatic neuritis) उत्पन्न होतो. कोणत्याही कारणानी या Sciatic नामक नाडीवर दाब पडल्याने परिणामस्वरुप या गृध्रसीची उत्पत्ति होते. या रोगात मांडीच्या मागील बाजूस तोद युक्त वेदना (lancinating Pain) हे लक्षण उत्पन्न होते. ही वेदना रात्री अधिक प्रमाणात वाढते. रोगी चालताना लंगडतो. Sciatic Nerve च्या सर्व क्षेत्रात स्पर्शासहत्व (Tenderness) हे लक्षण मिळते. जानुसंधिचा पृष्ठभाग व जंघापृष्ठभाग (Calf muscles) या ठिकाणी स्पर्शासहत्व अतितीव्र स्वरुपाचे असते.
पंचकर्म, योग्य आहार विहार, व्यायाम , औषधोपचार या द्वारे हा आजार बरा होऊ शकतो.

Dr.Harshvardhan P.Kanase-Patil (MD AYURVED)
Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma, Pune.

वातरक्त - Gout             अर्वाचिन वैद्यक दृष्टीने पाहता वातरवतालाच Gout असे म्हणता येते. Purin नावाच्या एका विशिष्ट अश...
19/06/2023

वातरक्त - Gout

अर्वाचिन वैद्यक दृष्टीने पाहता वातरवतालाच Gout असे म्हणता येते. Purin नावाच्या एका विशिष्ट अशा प्रथिनाचे सूक्ष्मपचन (Metabolism) नीट न झाल्याने हा व्याधि उद्भवतो. या अवस्थेत शरीरातील Uric Acid च्या प्रमाणात वाढ होते आणि संधिप्रदेशी सोडियम बाययुरेट (Sodium Biurate) चा संचय होऊ लागतो. परिणामस्वरूप संधिशूल व संधिशोथ ही लक्षणे निर्माण होतात.
मांस तथा मद्यपानाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन करणे हे याचे प्रधान कारण आहे.Sodium Biurate हे संधिप्रदेशाप्रमाणेच तरुणास्थि (Cartilages), स्नायु (Ligaments), कंडरा (Tendons) या ठिकाणीही साठू लागते. परिणामस्वरूप रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य (Arteriosclerosis) तथा रक्तदाब वृद्धि (High Blood pressure) ही लक्षणे निर्माण होतात.
या रोगाची सुरुवात प्रायः पायाच्या अंगठ्यापासून होते. अचानक तीव्र स्वरूपाचा ओष (Burning Sensation) व चोष (Throbbing) उत्पन्न होतो. अंगठ्याला सूज येते. ज्वर उत्पन्न होतो. पर्वसंधी रक्तवर्णी बनतो. क्रमाने पायातील व हातातील संधींची विकृति होऊ लागते. याचे वारंवार वेग येतात. पर्वसंधींच्या त्वचेखाली Sodium Biurate चा संचय झाल्याने कठीण स्पर्शाच्या ग्रंथी (Tophi) उत्पन्न होतात. कालांतराने या संचयस्थानी त्वचेत दरण होऊन व्रणोत्पत्ति होते. अशा व्रणाचे रोपण लवकर होत नाही व त्यामुळे जखम लवकर भरून येत नाही.
पंचकर्म, योग्य आहार विहार, व्यायाम , औषधोपचार या द्वारे हा आजार बरा होऊ शकतो.

Dr.Harshvardhan P.Kanase-Patil (MD AYURVED)
Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma, Pune.

पांडु - Anaemiaरक्तामधील लाल पेशी किंवा रक्ताकुणांमध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे हे Anaemia चे प्रत्यात्मि...
06/06/2023

पांडु - Anaemia

रक्तामधील लाल पेशी किंवा रक्ताकुणांमध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे हे Anaemia चे प्रत्यात्मिक वा प्रधान लक्षण आहे. या लालकणांची संख्यात्मता किंवा विकृत स्वरूपता यामुळेही पांडु म्हणजेच Anaemiaची उत्पत्ती होऊ शकते.

त्वचा, नख, नेत्र यांच्या ठिकाणी पांडुता येणे, हे अवयव निस्तेज होणे, कांतीहीन होणे हे पांडुचे प्रधान लक्षण आहे. याखेरीज कर्णक्ष्वेड (कानांत आवाज होणे), अग्निमांद्य, दौर्बल्य, अंगसाद, अन्नद्वेष, भ्रम, श्रम, ज्वर, श्वास, गौरव, अरुचि, सर्वांगमर्द विशेषतः ठेचल्याप्रमाणे वेदना होणे, पिंडिकोद्वेष्टन, कटि-सक्थि-पाद याठिकाणी वेदना होणे, गळून गेल्याप्रमाणे वाटणे, अल्पश्रमानेही श्वास लागणे, केशपतन, हृदयस्पंदन, हृदयाचा आकार वाढणे, अक्षिकूट शोथ ही पांडुची अन्य सामान्य लक्षणे आहेत. पांडुरोगी अत्यंत त्रासिक व चिडचिडा बनतो, त्याला फार बोलू नये असे वाटते,झोप फार येते आणि गार पदार्थांचा द्वेष उत्पन्न होतो.

पंचकर्म, योग्य आहार विहार, व्यायाम , औषधोपचार या द्वारे हा आजार बरा होऊ शकतो.

Dr.Harshvardhan P.Kanase-Patil (MD AYURVED)
Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma, Pune.

सर्वांग स्नेहन' मसाज' या सामान्य संज्ञेने परिचित असलेली अभ्यंगाची प्रक्रिया नेहमी करण्यास सांगितलेली आहे. या पद्धतीने त्...
29/05/2023

सर्वांग स्नेहन

' मसाज' या सामान्य संज्ञेने परिचित असलेली अभ्यंगाची प्रक्रिया नेहमी करण्यास सांगितलेली आहे. या पद्धतीने त्वचा रिनग्ध, तुकतुकित होते. त्वचेची तेज व कांती वाढते, शरिरातील वात कमी होऊन हलकेपणा येतो, उत्साह वाढतो. थोडक्यात, म्हातारपण टाळून तरुणपणाचा आनंद घेण्याची क्षमता प्राप्त होते, शरीरास घडलेल्या श्रमाचा परिहार होतो. डोळ्यांना विश्रांती मिळून दृष्टीला नवचैतन्य मिळते. शरीराची पुष्टी होऊन स्नायु बलवान होतात. 'अभ्यंग' हे सर्वांगीण आरोग्य वृद्धिंगत करणारे सर्वांगसुंदर निरामय करणारी आयुर्वेदाची देणगी आहे. यामुळे हल्ली सहज किंवा गोळ्यांशिवाय न लागणारी झोप ही अलगद आपल्या डोळ्यांना, मनाला, शरीराला पूर्ण विश्रांती देते.

शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात.हा प्रामुख्...
09/11/2022

शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात.

हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.

'आर्थरायटीस'मध्ये सांधे (joints), सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी, आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते.
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देतो.
आर्थरायटीसमध्ये सांध्यांमधील जागा कमी होते. सांध्यांमधील द्रव पदार्थाचं प्रमाण कमी होत जातं."
यामुळे सांधे जास्त संवेदनाक्षम बनतात आणि त्यांचं हळूहळू डी-जनरेशन होण्यास सुरूवात होते.वेळीच निदान आणि उपचार करण्यात आले तर, संधिवात बरा होऊ शकतो.
Dr.Harshvardhan P.Kanase-Patil
Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma, Pune.

संधीवातावर खात्रीशीर उपचार😇

Hruday basti:One of the effective treatment in heart diseases.
09/09/2022

Hruday basti:One of the effective treatment in heart diseases.

Avoid high risk surgeries of heart like bypass angioplasty with easy methods of Ayurved. ☎️8806738993
20/08/2022

Avoid high risk surgeries of heart like bypass angioplasty with easy methods of Ayurved. ☎️8806738993

Address

Sr. No-23/1, Gajanan Colony, Ambegoan Pathar
Pune
411046

Telephone

+918806738993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Parnakuti Ayurvedic Clinic and Panchkarma:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram