Organic guru Health

Organic guru Health This Page Is Made To Healthy Knowledge For people

20/02/2025
16 बेरी ज्यूस ऑर्डर करण्यासाठी 7020236452 या क्रमांकावर संपर्क साधावा.
01/08/2024

16 बेरी ज्यूस ऑर्डर करण्यासाठी 7020236452 या क्रमांकावर संपर्क साधावा.

12/03/2024

*🫀औषधांचा वापर न करता किडनी स्टोन करू शकता दूर, बेस्ट ७ घरगुती उपाय,🧠*

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय.

*(१) तुळशीच्या पानांचा रस :* तुळशीमध्ये एसिटिक अ‍ॅसिड असतं. जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसामध्ये अ‍ॅंटी ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी तत्व असतात आणि यामुळे किडनी निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

*(२) लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल :* वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अ‍ॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही, हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा.

*(३) डाळिंब :* डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अ‍ॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता.

*(४) कलिंगड :* मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

*(५) राजमा :* राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतं. राजमा हा किडनी बिन्स नावानेही ओळखला जातो. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो.

*(६) ओव्याचं पाणी :* ओवाचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. याने किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासही मदत मिळते. याचा वापर फार आधीपासून पारंपारिक औषधी म्हणून केला जातो. एक किंवा दोन चमचे ओवा एक किंवा दोन ग्लास पाण्यासोबत ब्लेंड करा आणि दिवसभर याचं थोडं थोडं सेवन करा.

*(७) व्हीटग्रास ज्यूस :* व्हीटग्रासमध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातून अनेक फायदे मिळतात. एका रिसर्चनुसार, व्हीटग्रास किडनी स्टोन दूर करण्यासही मदत करतं. याने लघवीचा प्रवाह वाढतो. यात अनेक महत्वाचे पोषक तत्व असतात जे किडनी साफ करण्याचं काम करतात. दररोज १ ग्लास व्हीटग्रास ज्यूस पिऊ शकता.

*अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा आणि भरपूर लोकांना शेअर करा*
https://chat.whatsapp.com/GNtk5b4clsKFSNDlBw9Htx

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Organic guru Health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram