13/02/2020
**Results are not typical. Individual results may vary**
मी धनंजय सितापुरे वय वर्ष ४२. अरनॉल्ड व सिलव्हेस्टर स्टॅलोन यांना आदर्श मानत मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये बॉडिबिल्डिंग क्षेत्राकडे वळालो. वर्ष १९९९ मध्ये २६ जानेवारी ला शरीरसौष्ठव स्पर्धेत ६५ किलोवरच्या वजन गटात मध्ये बदामी हौद द्वितीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर मे २००० मध्ये मी एका रजिस्टर जिम मध्ये जॉबला लागलो. २००७ मध्ये मी सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर म्हणून अकॅडमी कोर्स पूर्ण केला. वर्ष २००८ मध्ये गव्हर्नमेंट जॉब करत असताना मला एका रक्त तपासणी मध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढल्याची भीती निर्माण झाली. माझ्या मामांना रक्तातील साखरेचा भयानक त्रास होता त्यामुळे त्या गोष्टीने मला बेजार करू नये म्हणून मी चहा सोडला तसेच मला आवडणारे मसाल्याचा भात व मसाल्याची खिचडी बंद केली. त्यावेळी पासून योग्य आहार कसा असला पाहिजे याच्या शोधात असताना मला २०१४ मध्ये माझ्या वडिलांनी न्युट्रीनो क्लब शी ओळख करून दिली. तिथे मंदार सरांनी मला समजावले की आपल्या आवडीचे पदार्थ जर आपल्याला आयुष्यभर खायचे असतील तर आपल्याला व्यायामाबरोबर न्यूट्रिशन चे ही ज्ञान पाहिजे. आणि किमान ९० दिवस अनुभवले पाहिजे. आपली जेवणाची थाळी कशी असावी याची इत्यंभूत माहिती मला तिथे कळली. तिथले कोच श्री भुस यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्या अडीच महिन्यांमध्ये पंधरा किलो वजन व चार इंच पोटाचा घेर कमी केला. मी माझ्या लग्नात नव्हतो इतका सुंदर दिसायला लागलो, माझी त्वचा तुकतुकीत दिसू लागली. एवढे वजन कमी करूनही कोणत्याही प्रकारेचे (वजन कमी केल्यामुळे) स्ट्रेच मार्क माझ्या पोटावर अथवा कमरेवर नाहीत. इथे मला न्यूट्रिशन चे महत्व पटले. आज हर्बलाईफ कडून ऑफिशियली पाच वर्ष न्यूट्रिशन वापरल्याचे अभिनंदन पत्र, हर्बलाईफ सी.ई.ओ. मायकेलो जॉन्सन यांचे हस्तक्षर असलेले, मला मिळाले. आज मी आभारी आहे मंदार सरांचा व विश्वास सरांचा कारण यांनी मला TTWM वेट मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये एक कोच व ट्रेनरची भूमिका करण्याची संधी दिली. TTWM मध्ये मी लोकांना त्यांच्या वेटलॉस किंवा वेट गेन व फिटनेस पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो.
दुर्दैवाने आज लोकांची प्रथम ओळख Illness क्षेत्राशी होते व नंतर त्यांना Wellness क्षेत्राकडे यावे लागते या गोष्टीची खंत मला वाटते.
मला आयुष्यभर लोकांना त्यांच्या उच्चतम फिटनेस लेव्हल पर्यंत नेण्यास आवडेल.
मला आज खूप आनंद होतो की माझ्या वया एवढेच वय असलेल्या न्यूट्रिशन कंपनीबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे.... आपला मित्र धनंजय.
Dhananjay Sitapure
**Results are not typical. Individual results may vary**