06/08/2025
दुकानातून पाणी विकत घेताना तुम्ही वेगवेगळ्या ब्रँड्सच्या पाण्याची बाटली पाहिली असेल. ज्याच्या झाकणांचा रंग हा निळा, हिरवा, पिवळा, काळा असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. अनेकांना वाटतं की हा ब्रँडच्या रंगामुळे त्याच्या बाटलीचा आणि त्याचा झाकणाचा रंग वेगवेगळा असतो पण असं नाही, हा तुमचा चुकीचा समज आहे.
खरंतर पाण्याच्या बाटलीवरील झाकणाचा रंग काहीतरी महित्वाची सुचना देत असतं, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. चला बाटलीच्या झाकणाचा रंग आणि त्याचा अर्थ काय? जाणून घेऊ.
1. पांढरं झाकण : मशीन फिल्टर्ड वॉटर
पांढऱ्या रंगाच्या झाकणाची बाटली म्हणजे हे पाणी मशीनद्वारे किंवा आरओ प्लांटमधून फिल्टर करून भरलेलं आहे. हे पाणीही प्यायला योग्य असतं, मात्र मिनरल्सची मात्रा थोडी कमी असते.
2. हिरवं झाकण : फ्लेवर्ड वॉटर
हिरव्या रंगाच्या झाकणाच्या बाटल्यांमध्ये फ्लेवर्स मिसळलेले असतात. चव बदलण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. मिनरल वॉटरइतकं हे शुद्ध नाही, पण हे पाणी सुरक्षित असतं.
3. निळं झाकण : मिनरल वॉटर
जर तुम्ही निळ्या रंगाच्या झाकणाची बाटली घेतली असेल, तर त्याचा अर्थ असा की हे पाणी नैसर्गिक झऱ्यातून किंवा मिनरल सोर्समधून आणलेलं आहे. हे पाणी आरोग्यासाठी सर्वात चांगलं मानलं जातं.
4. काळं झाकण : अल्कलाइन वॉटर
काळ्या झाकणाच्या बाटल्यांमध्ये अल्कलाइन वॉटर असतं, ज्यामध्ये भरपूर मिनरल्स असतात. हे पाणी महाग असतं आणि जगभरातील खेळाडू आणि सेलिब्रिटी हेच पाणी पिणं पसंत करतात.
5. पिवळं झाकण : विटामिन वॉटर
पिवळ्या रंगाच्या झाकणाची बाटली म्हणजे विटामिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्सनी समृद्ध असलेलं पाणी. हे पाणी शरीराला उर्जा देण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त आहे.
पुढच्या वेळेस तुम्ही बाहेर पाणीची बाटली खरेदी करताना या झाकणांच्या रंगाकडे नक्की लक्ष द्या. सील तपासा, एक्सपायरी डेट पाहा आणि मुलांनाही ही माहिती सांगा, जेणेकरून त्यांनाही सुरक्षित आणि योग्य पाणी निवडता येईल.