ChikuPiku.com

ChikuPiku.com Chikupiku is for children of age 1 to 8 and is designed based on multiple intelligences theory.
(1)

It encourages brain-based learning, nurtures creativity and imagination, and offers a lot of fun for kids and parents through stories, poems, and activities.

"स्क्रीन" आपण पूर्णपणे टाळू तर शकणार नाही, पण मग मुलांना स्क्रीनवर दाखवायचं तरी काय आणि किती? हा प्रश्न सगळ्या पालकांना ...
24/08/2025

"स्क्रीन" आपण पूर्णपणे टाळू तर शकणार नाही, पण मग मुलांना स्क्रीनवर दाखवायचं तरी काय आणि किती? हा प्रश्न सगळ्या पालकांना भेडसावत असतो.

या विषयावर आम्ही नुकतीच मानसशास्त्रज्ञ आणि डिजिटल वेलनेस धनश्री भिडे यांच्याशी चर्चा केली, त्याच विषयावर आधारित आमचा "मुलांच्या स्क्रीनटाईमविषयी प्रॅक्टिकल टिप्स - काय, कसं दाखवायचं, काय टाळायचं?" हा ब्लॉग नक्की वाचा.

Link: https://chikupiku.com/blogs/blog/practical-tips-about-childrens-screen-time

(Screen time tips for parents, Healthy screen habits for children, How to choose right content for kids, Alternatives to screen time, Reduce screen addiction in kids)

चिकूपिकू time सुरू करून तर बघा!!!Link: https://chikupiku.com/pages/subscription(MmChikupiku Offer, Up to 20% Off, Childr...
22/08/2025

चिकूपिकू time सुरू करून तर बघा!!!

Link: https://chikupiku.com/pages/subscription

(MmChikupiku Offer, Up to 20% Off, Children’s magazine, Marathi children’s magazine, Fun with Learning, Colourful illustrations)

19/08/2025

हवेत उडणाऱ्या, नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुपरमॅनला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, आपण त्याला थोडं विचारू या का ?? बघू या काही सांगतो का?

आपल्या सगळ्यांचे लाडके कवी संदीप खरे यांनी लिहिलेली आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली "सुपरमॅन" ही कविता मुलांना नक्की ऐकवा आणि त्यांची प्रतिक्रिया आम्हाला comments मध्ये सांगा.

अजूनही अंक मागवला नसेल तर आजच "आम्ही सुपर डुपर" हा अंक मागावा.

कविता - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
गायिका - पल्लवी सातव, अमृता कावणकर, निवेदिता नीलम
चित्रं - भक्ती दलाल

Link:https://chikupiku.com/collections/our-books/products/august-2025-marathi-kids-storybook

(Chikupiku August Issue, Children’s magazine, Superman, Fun with Learning, Superheroes, Superpowers are within you, Kids song, Marathi rhymes, singing with kids)

19/08/2025

मुलं शी-शू लागलेली का सांगत नाहीत?

संपूर्ण व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनेलवर () नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं ते आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

Link: https://youtu.be/mkON1GNIlW8?si=kD5LGhXr_3Dw0Y0H

(Chikupiku Expert talk, No shame in p*e, Parent awareness, Child confidence, Positive expressions, Parenting responsibility, Avoid fear)

17/08/2025

मुलांना वेळेत आवरण्याची सवय लावायची तरी कशी??

संपूर्ण व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनेलवर () नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं ते आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

Link : https://youtu.be/mkON1GNIlW8?si=SI7t-KwXNo0bX-C4

(Chikupiku Expert Talk, morning routine, discipline through consistency, early to bed, early to rise, time management for kids, Discipline, Sleep environment, Natural learning)

कृष्ण हा लहान मोठ्या सगळ्यांचाच लाडका आहे. पण हा बाळकृष्ण त्याच्या गोष्टीतून लहान मुलांना काय शिकवतो हे जाणून घेऊ या. कृ...
16/08/2025

कृष्ण हा लहान मोठ्या सगळ्यांचाच लाडका आहे. पण हा बाळकृष्ण त्याच्या गोष्टीतून लहान मुलांना काय शिकवतो हे जाणून घेऊ या.

कृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने हा ब्लॉग नक्की वाचा.

Link : https://chikupiku.com/blogs/blog/stories-of-shri-krishna-in-marathi

(Krishna Janmashtami, Lord Krishna stories, Krishna for kids, Krishna childhood lessons, Krishna teachings, kids stories, Indian festivals, Krishna and friends, Krishna values for children)

14/08/2025

Freedom and Festival Sale !!

स्वातंत्र्य दिन आणि कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने घेऊन येतोय एक धमाल Sale!!

Upto 20% Off on all Chikupiku Products

Offer period: 15 August - 21 August

Link: https://chikupiku.com/pages/independence-day-sale

(Freedom Sale, Chikupiku Festival Offer, Up to 20% Off, Children’s magazine, Fun with Learning, Kids Magazine Sale, 15 August Sale)

आला रे आला गणपती आला !!यावर्षी चिकूपिकू पुन्हा घेऊन येत आहे, पालक आणि मुलांची लाडकी कार्यशाळा -"अक्कणमाती चिक्कणमाती" - ...
12/08/2025

आला रे आला गणपती आला !!

यावर्षी चिकूपिकू पुन्हा घेऊन येत आहे, पालक आणि मुलांची लाडकी कार्यशाळा -

"अक्कणमाती चिक्कणमाती" - शिल्पकार "दीप्ती ताई"

या कार्यशाळेत मुलांना स्वतः मधला गणपती बाप्पा स्वतःच्या हातांनी साकारायला मिळणार आहे. तेव्हा मुलांना या कार्यशाळेला नक्की घेऊन या.

तारीख : शनिवार, 23 ऑगस्ट 2025
वेळ : संध्याकाळी 4 ते 6
स्थळ : ऋत्विक फाउंडेशन, प्लॉट नंबर १७, ७७/२, वेद भवनच्या मागे, भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे
तिकीट : 750/- (एक मूल + एक पालक)
वयोगट: 4+

तारीख : रविवार , 24 ऑगस्ट 2025
वेळ : सकाळी 11 ते 1
स्थळ : युनिव्हर्सिटी वुमन्स असोसिएशन हॉल , विखे पाटील शाळेसमोर, गोखले नगर, पुणे
तिकीट : 750/- (एक मूल + एक पालक)
वयोगट: 4+

तिकिटात टेराकोटा मातीसुद्धा समाविष्ट आहे.

तिकिटासाठी संपर्क: 7276036478
For Online Bookings - https://chikupikufoundation.com/product/ganpati-making-event/

[ganpati making workshop, pune events, DIY ganpati making, events for kids, parents and kids event, clay art for children]

12/08/2025

घरात प्रत्येकाकडे वेगळं device आणि प्रत्येकाचा content वेगळा ह्यांनी स्क्रीनचा प्रश्न सुटेल का वाढेल ?? Screen time हा family time होऊ शकेल का?

संपूर्ण व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनेलवर () नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं ते आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

Link: https://youtu.be/hCADKA25cV8?si=AwI7AtKwiywxG7tz

(Chikupiku Expert Talk, Shared family time, Family bonding activities, Parental awareness, Teen screen habits, Parent-child bonding, Healthy screen habits, Mindful playtime)

11/08/2025

"कृष्णरंग - नृत्य आणि अभिनयाचा कार्यक्रम" म्हणजे नक्की आहे तरी काय ? ते बघू या

कृष्णजन्माष्टमीनिमित्त खास बालगोपालांसाठी चिकूपिकू घेऊन येत आहे पहिल्यांदाच एक आगळा-वेगळा नृत्य आणि अभिनयाचा कार्यक्रम !!

'कृष्णरंग'

काय बघायला मिळेल?

लोणी चोरणारा माखनलाल, कालिया नागाशी झुंजणारा वीर, पर्वत उचलणारा गोवर्धन, बासरी वाजवणारा मुरलीधर, खोडकर आणि लाडक्या बाळकृष्णाच्या लीला कथ्थक या नृत्याच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.

बालवर्गासाठी खास रचलेला हा कार्यक्रम त्यांच्या मनाला भावेल आणि त्यांची भारतीय कला, संस्कृती आणि कथ्थक या शास्त्रीय नृत्याशी ओळख होईल असा आहे.

काय मग येताय ना?

वयोगट: 5+
दिनांक: 17 ऑगस्ट 2025
वेळ: संध्याकाळी 5 ते 6
तिकीट: 250 रु. प्रत्येकी
450 रु. ( मूल+पालक )
स्थळ: कलाछाया, पत्रकार नगर रस्ता, विखे पाटील शाळेजवळ, गोखलेनगर, पुणे

तिकिटासाठी संपर्क: 7276036478
For online bookings : https://chikupikufoundation.com/product/krushnrang/

(Chikupiku Events, Krishna Janmashtami, Kathak for Children, Live Performance, Family-friendly Event, Storytelling through Dance, Indian Classical Dance, Art for Children)

11/08/2025

मुलांची सगळी कामं करणं म्हणजे मुलांवर प्रेम करणं का? आपली मुलं वाढवताना किती स्वावलंबी होतायत हे डोळे उघडे ठेवून आई-वडिलांनी पहायला हवं.

हेच शोभाताई आपल्याला एक छान उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत.

शोभाताईंचे असेच लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग पेजला नक्की visit करा.

Link: https://chikupiku.com/blogs/blog/tagged/shobha-bhagwat

(Chikupiku parenting, parenting tips, child behaviour, Overprotective parenting, Practical parenting advice, Empowering children)

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when ChikuPiku.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ChikuPiku.com:

Share

चिकूपिकू - मराठी Magazine - लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी.

आपल्या घरात गोड-गोजिरवाणी आणि तितकीच दंगेखोर मुलं आहेत. ती एका जागेवर मुळीच स्वस्थ बसत नाहीत. सारखी नवी खेळणी हवी असतात, पण खेळणी आणली की त्यांच्याशी न खेळता घरातली पातेली, भांडी, चमचे, नाहीतर आईबाबांच्या मोबाईल-लॅपटॉपशी खेळण्यात ते जास्त रमतात. साधारणपणे 2 ते 6 या वयोगटातल्या या मुलांना सतत नव्या गोष्टी हव्या असतात पण यात त्यांची काही चूक नसते. त्यांच्या बुद्धीची भूकच जास्त असते. प्रत्येक नवा अनुभव, नवा खेळ, नवी कविता त्यांच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सची जोडणी (synapses) करत असते आणि हे काम अत्यंत वेगात होत असतं. म्हणून या जिवाला स्वस्थता म्हणून नसते.

अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच ‘चिकूपिकू’ चा अंक सादर करत आहोत. हा अंक खास या वयातल्या मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या मेंदूत भरपूर आणि चांगल्या गोष्टींच्या जोडण्या व्हाव्यात याचसाठी निर्माण केलेला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर केला आहे. मुलांना तुम्ही तुम्ही गोष्टी वाचून दाखवा. सगळ्या activities शी त्यांच्याबरोबर तुम्ही सोडवा. म्हणजे हळूहळू त्यांच्यात या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण होईल. अंकात अनेक ठिकाणी एखाद्या activity तून मुलांना काय मिळेल, हे सांगितलं आहे. त्याचाही तुम्हाला उपयोग होईल.

आजकाल गुगलवर खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तरीही प्रिंट मीडियात हा अंक सादर करत आहोत, कारण गुगल, यू ट्यूबवर मुलं रमतात खरी; पण या वयात त्यांना स्क्रीनपासून लांब ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला , विचारक्षमतेला संधी देणं हे आजकाल जास्त महत्वाचं आहे. या अंकाची संपूर्ण मांडणी मुलं आणि आईबाबा यांचा विचार करूनच केलेली आहे. मुलांना पेस्टल कलर्स, स्केचपेन, वॉटर कलर सुद्धा वापरू द्या. खडू, कोळशाचा तुकडा याने सुद्धा रंगवायचं असेल तर रंगवू द्या. त्यासाठीच अंकाचा कागद वापरलेला आहे. हे सर्व करताना अंक चुरगळला, फाटला, ओला झाला तर रागवू नका. अंक मनमुराद पद्धतीने ‘वापरला’ गेला आहे, याचीच तर ती खूण आहे.

तर मुलांबरोबर तुम्हीही थोडे लहान व्हायची मजा घ्या! गोष्टी वाचा, ठिपके जोडा, चित्रं रंगवा. आणि हो डोकं लढवल्यासारखं करा पण मुलांना विचार करू द्या. तुमचे अनुभव, सूचना आम्हाला कळवल्या तर छानच!