01/06/2025
ऍसिड रिफ्लक्स – आधुनिक पचनविकारासाठी आयुर्वेदाची शाश्वत उत्तरं: ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux) किंवा हायपरॅसिडिटी म्हणजे अन्ननलिकेत अन्नपचनासाठी आवश्यक असणाऱ्या आम्लांचं मागे परत जाणं. यामुळे जेवणानंतर किंवा झोपताना छातीत जळजळ होणं, उलट्या होणं, पचनतंत्राशी संबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात.
आयुर्वेदानुसार हा विकार अम्लपित्त या संकल्पनेसारखा असून, मुख्यत्वे पित्त दोष वाढणे, अग्नी मंद होणे आणि आम तयार होणे ही कारणं असतात.
कारणं (निदान) -
पित्तदोष वाढवणारी आणि अग्नी कमजोर करणारी खालील कारणं अम्लपित्त निर्माण करतात:
• अतिशय तिखट, आंबट, तेलकट, तळलेले व आंबलेले अन्न सेवन
• अनियमित जेवण किंवा रात्री उशिरा जड अन्न घेणे
• तीव्र मानसिक ताण, राग व चिंता
• अतिप्रमाणात चहा, कॉफी, मद्य किंवा शीतपेयांचे सेवन
• धूम्रपान व तंबाखू
• स्वाभाविक वेग रोखणे (जसे की शौच, अधःकर्म)
• विरुद्ध आहार – दूधासोबत आंबट किंवा खारट अन्न घेणे
• भूक न लागता अन्न घेणे किंवा अति खाणं
लक्षणे -
• छातीत व घशात जळजळ (Heartburn)
• आंबट किंवा कडसर ढेकर
• जेवल्यानंतर मळमळ, उलटी होणे
• भूक मंदावणे किंवा अपचन
• दुर्गंधीयुक्त श्वास व जिभेवर पांढरट थर
• पोट फुगणे, जडपणा
• चिडचिड, मानसिक अस्वस्थता
• पुराण विकारात अन्ननलिकेत सूज किंवा अल्सर
आयुर्वेदानुसार अम्लपित्ताचे प्रकार -
1. पित्तप्रधान अम्लपित्त – जळजळ, आंबट ढेकर, उष्णतेची असह्यता
2. वात-पित्त प्रकार – जळजळीसोबत कोरडेपणा, फुगणे व वायुगोळा होणे
3. कफ-पित्त प्रकार – मळमळ, जडपणा, चिकट ढेकर व आळस
आयुर्वेद उपचार -
आयुर्वेदामध्ये पित्त शांत करणे, अग्नी बलवत्तर करणे व आम शुद्ध करणे हे प्रमुख उद्दिष्ट असते.
अंतर्गत औषधोपचार (फक्त वैद्यांच्या सल्ल्याने) -
• कामदुधा रस – पित्तशामक
• अविपत्तिकर चूर्ण – आम्ल शमन व पचन सुधारक
• सूष्ठेखर रस – मळमळ, आम्लता व अपचनात उपयोगी
• अम्लपित्त मिश्रण – अम्लपित्ताच्या तक्रारी दूर करणारे
• शतावरी, यष्टिमधू, आवळा – पाचक व शीतल औषधी
• गुळवेल व मुस्ता – पित्त संतुलन व अग्नी सुधारण्यासाठी
पंचकर्म उपचार -
1. वमन (औषधि वमन)
o कफ-पित्त वाढलेल्या स्थितीत, अतिरिक्त कफ व आम काढण्यासाठी
2. विरेचन (पित्तशामक विरेचन)
o पित्तदोष निर्मूलनात अत्यंत उपयुक्त
o यकृत व आमाशय शुद्ध होतात
3. तक्रधारा
o औषधी ताक कपाळावर घालून तणावजन्य अम्लपित्तात आराम
o मज्जासंस्थेचं शमन व उष्णतेचं नियंत्रण
4. शिरोधारा
o मन व पचनसंस्था यांच्यातील समन्वय सुधारते
5. नस्य (नाकात औषध देणे)
o जेव्हा अम्लपित्तासोबत सायनस वा वरच्या श्वसन संस्थेचे लक्षणे असतात
आहार-विहाराचे नियम:
करण्याजोग्या गोष्टी (Do’s) -
• कोमट, हलके, ताजे व शिजवलेले अन्न घ्या
• तुप, नारळपाणी, भिजवलेले मनुके, ताक हे थंडावणारे पदार्थ आहारात घ्या
• कोमट पाणी किंवा जिरे पाणी प्यावे
• मोठ्या जेवणांऐवजी थोडेथोडे पण वेळेवर खा
• झोपण्यापूर्वी किमान २-३ तासांची विश्रांती ठेवा
• प्राणायाम व ध्यानाद्वारे मानसिक तणाव कमी करा
• गोड, कडू व तुरट रसाचे पदार्थ प्राधान्याने घ्या
टाळावयाच्या गोष्टी (Don’ts) -
• तिखट, आंबट, तळलेले, आंबलेले व तयार अन्न टाळा
• मद्य, धूम्रपान, शीतपेय व अधिक चहा/कॉफी घेणे टाळा
• जेवल्यावर लगेच झोपणे टाळा
• भूक मारणे किंवा दीर्घ उपवास टाळा
• विरुद्ध आहार जसे दूधासोबत फळं, रात्रीचे दही वगैरे टाळा
• अति खाणे किंवा घाईघाईत जेवणे टाळा
• तणाव, राग, चिंता यांचं व्यवस्थापन आवश्यक – हे पित्त वाढवतात
सूचना - वरील सर्व उपचार, औषधी व पंचकर्म प्रक्रिया केवळ तज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्यानेच कराव्यात.
आजच भेट द्या - भागीरथी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, पर्वती पायथा, पुणे
सल्ला घ्या: डॉ. योगिता चौधरी (एम.डी. आयुर्वेद)
अपॉइंटमेंटसाठी कॉल / WhatsApp करा: +91 90212 55057
वेबसाइट: https://bhagirathiayurveda.com