15/05/2025
नगरसेविका #माधुरी_सहस्रबुद्धे यांनी
#मनपा_शाळेतील_मुलामुलींसाठी
वर्षभर घेतलेल्या
#आनंददायी_शनिवार ह्या प्रकल्पाचा
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
#फोटोंसहित_रिपोर्ट_मान्यवरांना_सादर
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी हा रिपोर्ट,
मा. नामदार #चंद्रकांतदादा_पाटील
मा. आयुक्त #डॉ_राजेंद्र_भोसले व
मा. उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग #आशा_राऊत
यांना सादर केला.
श्रीमती आशा राऊत यांनी समारोप सत्राला उपस्थिती लावून माधुरीताईंचे #आभार_मानले.
तर आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी संपूर्ण रिपोर्ट वाचून, त्याची दखल घेत दुसऱ्या दिवशी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांना फोन करून, या #सुमोटो घेतलेल्या प्रकल्पाबद्दल त्यांचे #अभिनंदन केले.
पुणे महानगरपालिकेच्या कै. अनुसूयाबाई खिलारे शाळेतील,
पहिली ते सातवी च्या मुलामुलींसाठी जून २०२४ ते मार्च २०२५ या काळात दर शनिवारी दोन तास असा हा उपक्रम चालला.
यामध्ये माधुरीताईंच्या बालरंजन केंद्रातील चार-चार ताई, आलटून पालटून मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत येत होत्या. प्रत्येक सत्र रंजक आणि उद्बोधक झाले. त्यात प्रार्थना, व्यायाम, विविध खेळ, गाणी, गोष्टी, क्राफ्ट, विज्ञान खेळणी तसेच काही विशेष कार्यक्रमांचा समावेश होता.
या प्रकल्पामुळे #मुलांना_शाळेची_गोडी_लागली, दर शनिवारची मुले आतुरतेने वाट पहात होती. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या बालविकासाच्या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मनपाच्या शाळेतील मुलांना करून दिला. #प्रकल्पाचा_सर्व_खर्च माधुरीताईंनी मिळालेल्या #देणग्यांमधून_केला.