02/01/2023
!! जय स्वामी दत्त !!
नऊमुखी रूद्राक्ष
©Anna®2022
मुळ लेखन-
आण्णा
(गृप ॲडमिन- 7249157379)
ऐश्वर्यसंपन्नतेसाठी
नऊमुखी रूद्राक्ष-
नऊमुखी रूद्राक्ष दुर्मिळ आहे. देवीचा वारसा असलेले हे रूद्राक्ष दुर्मिळ आणि कडक आहे. पारंपारिक शास्त्रानुसार याचे नाव 'भैरव' असे आहे. नऊमुखी रूद्राक्ष हे ऋषीमुनींचे प्रतीक समजले जाते. ते डाव्या हातात धारण करणे श्रेयस्कर समजले जात असले तरी रूद्राक्ष हे गळ्यात धारण करणेच सोयीचे ठरते.
नवदुर्गा, नवप्रकारांनी हा सहाय्य करणारा रुद्राक्ष नवदुर्गा देवीचे प्रतीक आहे. विद्या, धन, सुख, ऐश्वर्य, मोक्ष, यश, कीर्ती, प्रतिष्ठा महत्वाचे म्हणजे परमेश्वराची प्राप्ती या रुद्राक्षधारणेने होते.
हा रूद्राक्ष नवशक्ती किंवा भैरवाचे प्रतीक मानला जातो. दुर्गेचा याला पूर्ण आशिर्वाद आहे.
हे रुद्राक्ष दुर्मिळ असल्यामुळे साधारणतः दीड हजार रूपयांपासून पुढेच याची किंमत असते. मृत्युदेवता यम आणि कपिल मुनी दोघांचीही या नऊमुखी रूद्राक्षावर सत्ता आहे. इंद्र आणि गणेश या दोघांचे शुभाशीर्वादही हे धारण करणार्याला प्राप्त होतात.
हे यमाशी संबंधित असल्यामुळे ते डाव्या हातामध्ये धारण करावे. मृत्युच्या भीतीपासून मुक्त करून अध्यात्मातील मुक्ती घडवून आणणारे असे हे रूद्राक्ष आहे.
बुध्दीमत्ता असूनही ज्यांना आपले विचार प्रभावीपणे दाखवता येत नाहीत त्यांच्यावर हे रुद्राक्ष प्रभावीपणे कार्य करते.
धारणकर्त्याचे दुःख, दैन्य व दारिद्रहरण होते. काळ्या रेशमी धाग्यात गुंफून हा रूद्राक्ष उजव्या किंवा डाव्या दंडात बांधावा. अनिष्ट ग्रहपिडेपासूनही संरक्षण मिळते.
हे रूद्राक्ष जरी भगवान शंकराशी निगडीत असले तरी देवी उपासनेशी निगडीत आहे.
शत्रूभय, अग्निभय, पशुभय, प्रेतबाधा, दारिद्र्याची चिंता, मानसिक आजार या सर्वांवर नऊमुखी रूद्राक्षधारणेचा इलाज केला जातो.
मंत्रः- 'ओम ह्री हुं नमः।' हा मूलमंत्र म्हणून हे रुद्राक्ष शक्यतो नवरात्रामध्ये धारण करावे.
नऊमुखी रूद्राक्ष हे प्रामुख्याने केतूप्रधान नक्षत्राशी संबंधित आहे. त्यामुळे या रूद्राक्षाचा संबंध अश्विनी, मघा आणि मूळ नक्षत्राशी आणि मेष, सिंह आणि धनु या राशींशी या रूद्राक्षाचा संबंध आहे. मात्र हे रूद्राक्ष निवडताना पिवळ्या रंगाचेच निवडावे. लालसर, काळसर रुद्राक्ष शक्यतो धारण करु नये.
देवीशी संबंधित असल्यामुळे नऊमुखी रूद्राक्षउपासनेमुळे संपत्तीवृध्दी आणि ऐश्वर्यसंपन्नता प्राप्त होते. ऋणमुक्तता होते. विचारशक्ति वाढते, इच्छा, आकांक्षापूर्ती होते. आपल्याला क्रियाशील आणि कार्यकुशल बनवते. त्यामुळे आपोआपच लक्ष्मीची कृपा आपणावर होते.
शीघ्रकोपी, संतापी स्वभावावर हे रुद्राक्ष रामबाण उपाय आहे. साक्षात आदिशक्ती आदिमाया याची स्वामिनी असल्यामुळे केतूचे दुष्परिणाम संपुष्टात आणण्यासाठी याचा प्रभावी उपाय होतो.
साहित्यिकांना, भाषा विषयाशी संबंध येणार्यांना हे रुद्राक्ष परिणामकारक ठरते या क्षेत्राबाबतची त्यांची विचारशक्ती आधिकच प्रगल्भ होते. भाषेवर जास्तच प्रभुत्व येते.
जन्मतारीख 9, 18 वा 27 यांपैकी कोणतीही असेल किंवा सप्टेंबर माहिन्यात ज्यांचा जन्म असेल त्यांनी हे नऊमुखी रूद्राक्ष धारण केले असता ते हितकारक ठरते.
लहान मुलांना संरक्षणकवच म्हणून हे रुद्राक्ष जास्तच परिणामकारक ठरते. लहान मुलांवर येणार्या संकटांपासून मुक्ति मिळते. परदेशी किंवा लांब गावी जर मुलं नोकरीनिमित्ताने असतील तर त्यांना संरक्षण म्हणून नऊमुखी रुद्राक्षधारणा करावी.
वैद्यकिय दृष्ट्याः-
ज्यांना अति उच्च रक्त दाबाचा विकार आहे त्यांनी, त्याचप्रमाणे ज्यांची रक्त गोठण्याची प्रक्रिया अतिशय मंद असल्यामुळे जास्त रक्तस्त्राव होतो त्यांनाही हे नऊमुखी रूद्राक्ष विशेष लाभदायक आहे. छातीतील धडधड थांबवणे, रक्ताभिसरण नियमित करणे, फुफ्फुसांचा दाह थांबवणे या व्याधीवर हे रूद्राक्ष औषधी आहे. नऊमुखी रूद्राक्ष हे अंगावर येणार्या कोडावरही औषधी आहे.
आण्णा
(गृप ॲडमिन)
Hello I am vedic Astrologer.